सुsssपर! बॉक्सऑफिसवर कल्ला करणारा पुष्पाचं हिंदी वर्जन OTTवर पुढच्या आठवड्यात रिलीज होतंय?
पुष्पा सिनेमाचे स्ट्रिमिंग राईट्स तगड्या अमाऊंटमध्ये विकले गेले आहेत. सध्या तरी सिनेमानं बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातलंय. इतर प्रादेशिक भाषांसाठीही पुष्पानं एक मैलाचा दगड गाठला असल्याची भावना व्यक्त होतेय.
मुंबई : बॉक्सऑफिसवर जोरदार कल्ला केलेल्या आणि जबरदस्त गल्ला जमवलेल्या अल्लू अर्जुनचा पुष्पा द राईज हा सिनेमा गाजतोय. कमाईचे रोज नवनवे उच्चांक हा सिनेमा गाठतोय. मात्र आता कोरोनाच्या सावटात थिएटर्स आणखी किती दिवस सुरु राहतील, अशी शंका अनेकांनी घेतली आहे. त्यामुळे अनेकजण ‘ओटीटीवर आला की बघू’, असं म्हणत घरातच थांबले आहेत. अशा सगळ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पुढच्या आठवड्यातच पुष्पा ओटीटीवर रिलीज केला जाणार असल्याची कुजबूज सगळीकडे सुरु झाली आहे. खासकरुन सिनेमांबाबत अपटूडेट माहिती देणाऱ्या तरण आदर्श यांनीही याबाबत खास माहिती दिल्यानं चर्चांना उधाण आलंय. अशावेळी चाहत्यांचं लक्ष पुष्पाच्या ओटीटी रिलीजवर नसेल, असं होणं शक्यच नाही.
पण येतोय का ओटीटीवर?
सिनेमांचा अभ्यास करणारे आणि त्याची वेळोवेळी माहिती देणारे तरण आदर्श यांनी म्हटलंय की लवकरच हिंदी डिजिटल प्रीमियर होणार आहे. पण त्याची तारीख अजून सांगण्यात आलेली नाही आहे. पण असाही एक दावा केला जातो आहे, की लवकरच किंवा कदाचित येत्या आठवड्यातच याबाबतची तारीख नक्की केली जाऊ शकेल.
तरण यांनी ट्वीट करत म्हटलंय की,
पुष्पाचं हिंदी डिजिटल प्रिमियर होणार आहे. पण तो कधी होणार, याची तारीख अजून निश्चित झालेली नाही. सध्या असं बोललं जातंय की येत्या आठवड्यात तो होऊ शकतो. पण ते चूक आहे. अजून तारीख निश्चित झालेली नाही. जेव्हा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवरील कमाईत मागे पडू लागले, तेव्हाच डिजिटल रिलीज होण्याची शक्यता आहे.
कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर दिसणार?
पुष्पा सिनेमाचे स्ट्रिमिंग राईट्स तगड्या अमाऊंटमध्ये विकले गेले आहेत. सध्या तरी सिनेमानं बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातलंय. इतर प्रादेशिक भाषांसाठीही पुष्पानं एक मैलाचा दगड गाठला असल्याची भावना व्यक्त होतेय. खरंतर पुष्पाच्या हिंदी वर्जनं अनेक बॉलिवूड सिनेमांना कमाईच्या बाबतीत केव्हाच पछाडलंय. तर अॅमेझॉनला मोठ्या रक्कमेत पुष्पाचे स्ट्रिमिंग राईट्स विकण्यात आले आहेत. 5 जानेवारीलाच याबाबतची घोषणा केली होती. इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार तब्बल 27 ते 30 कोटी रुपयांमध्ये पुष्पा सिनेमा अॅमेझॉनला विकण्यात आला आहे. दरम्यान, सॅटेलाईट राईट्सची किंमत ही तर ओटीटी पेक्षाही जास्त देण्यात आल्याचं बोललं जातंय.
‘PUSHPA’ HINDI DIGITAL PREMIERE: NO DATE FIXED YET… There’s talk that #Pushpa #Hindi version will premiere on a digital platform next week… FALSE… No date has been decided yet… A date will be decided once the theatrical revenue starts slowing. #PushpaHindi pic.twitter.com/pEQAibG2jC
— taran adarsh (@taran_adarsh) January 6, 2022
इतर बातम्या –
Divorce | 9 वर्ष संसार, 9 महिन्यांपूर्वीच काडीमोड! आमीर-संजीदाची कुणालाच कानोकान खबर कशी नाही?