Bigg Boss OTT | अंतिम फेरीच्या जवळ पोहचून नेहा भसीन झाली बेघर, ‘या’ पाच स्पर्धकांमध्ये होणार तगडी टक्कर!

बिग बॉसच्या प्रत्येक सीझनचा शेवट जवळ आला की, एका किंवा दुसऱ्या स्पर्धकाला हा शो सोडावा लागतो. प्रत्येक हंगामाप्रमाणे, बिग बॉस ओटीटीमध्ये ‘मिडनाईट इव्हिक्शन’ झाली. ज्यात बिग बॉसने त्याच्या मुख्य गेटसमोर दुसरा गेट बसवला, जो शोमधून बाहेर जाणाऱ्या स्पर्धकांसाठी होता.

Bigg Boss OTT | अंतिम फेरीच्या जवळ पोहचून नेहा भसीन झाली बेघर, ‘या’ पाच स्पर्धकांमध्ये होणार तगडी टक्कर!
Pratik-Neha
Follow us
| Updated on: Sep 16, 2021 | 11:32 AM

मुंबई :बिग बॉस ओटीटी’चा (Bigg Boss OTT) हा शेवटचा आठवडा आहे, त्यामुळे बिग बॉसच्या घरामध्ये फक्त सहा सदस्य शिल्लक आहेत. अंतिम फेरीच्या इतक्या जवळ आल्यानंतर ‘बिग बॉस’ची ट्रॉफी आपल्या नावावर करणे हे प्रत्येक स्पर्धकाचे स्वप्न आहे. पण हे बिग बॉसचे घर आहे. या घरात सर्व काही इतके सहजतेने होऊ शकत नाही. प्रत्येक सीझनप्रमाणे अंतिम फेरीच्या चार दिवस आधी, या सीझनमध्ये देखील एक मोठा ट्विस्ट आला आहे. अंतिम फेरीच्या इतक्या जवळ पोहोचल्यावर एका स्पर्धकाचे ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले आणि त्याला शोला निरोप घ्यावा लागला.

बिग बॉसच्या प्रत्येक सीझनचा शेवट जवळ आला की, एका किंवा दुसऱ्या स्पर्धकाला हा शो सोडावा लागतो. प्रत्येक हंगामाप्रमाणे, बिग बॉस ओटीटीमध्ये ‘मिडनाईट इव्हिक्शन’ झाली. ज्यात बिग बॉसने त्याच्या मुख्य गेटसमोर दुसरा गेट बसवला, जो शोमधून बाहेर जाणाऱ्या स्पर्धकांसाठी होता. सरतेशेवटी, जेव्हा नेहा भसीन आणि राकेश बापट या दोघांनाही बेदखल होण्यासाठी गेटच्या मागे पाठवण्यात आले, जिथून राकेश घरात शिरला पण नेहा भसीनचा प्रवास बिग बॉसमध्ये इथेच संपला.

उरलेयत केवळ पाच स्पर्धक

नेहा भसीन बेघर झाल्यानंतर अंतिम फेरीत आता केवळ पाच कॅन्टेस्टेंट शो उरले आहेत. ज्यामध्ये घरात सुरक्षित राहणारे पहिले स्पर्धक दिव्या अग्रवाल, त्यानंतर निशांत भट्ट, शमिता शेट्टी, प्रतीक सहजपाल आणि राकेश बापट आहेत. घरातील हे उर्वरित पाच सदस्य आता अंतिम फेरीत एकमेकांशी स्पर्धा करताना दिसतील. तीन दिवसानंतर, प्रेक्षक त्यांच्या मतांच्या आधारे बिग बॉस ओटीटीचा विजेता निवडतील.

नेहाच्या जाण्यामुळे प्रतीक सहजपाल धक्का

‘बिग बॉस ओटीटी’च्या घरात, जिथे बाकीचे चार स्पर्धक त्यांच्या सुरक्षेने खूप आनंदी दिसत होते, दुसरीकडे नेहा भसीनच्या जाण्याने प्रतीक सहजपाल पूर्णपणे तुटला होता आणि अश्रू ढाळत होता. ‘बिग बॉस’ने स्पर्धकांना त्यांचे कनेक्शन तोडण्याची आणि घरातील इतरांशी संबंध जोडण्याची संधी दिली, तेव्हापासून नेहा आणि प्रतीकने आपापले कनेक्शन अक्षरा आणि मिलिंदशी सोडून एकमेकांशी कनेक्शन केले होते.

नेहा भसीन आणि प्रतीक सहजपाल या कनेक्शनपासून ते प्रवासात एकत्र होते ते दोघेही गेममध्ये एकत्र होते. बिग बॉसने कनेक्शनमधील बंध तोडले, परंतु काळाच्या ओघात त्यांची मैत्री घट्ट होत गेली. प्रेम असो किंवा भांडण, ते प्रत्येक वेळी एकमेकांच्या पाठीशी उभे राहिले आणि एकमेकांना साथ दिली.

बिग बॉसच्या घरात नेहमी मोकळेपणाने बोलणाऱ्या नेहा भसीनच्या संयमाचा बांध अंतिम फेरीच्या वेळेस मात्र मोडला. नेहमी भांडण आणि हाणामारीवर उतरून आपले मत सांगणारी नेहा बिग बॉसच्या घरात लोकांचे वर्तन पाहून रडताना दिसली. यासह, ती असेही म्हणताना दिसली की, बिग बॉसमध्ये तिच्यासोबत जे काही घडले ते आता तिच्या मनातून जात नाहीय.

हेही वाचा :

Raj Kundra Case | मुंबई गुन्हे शाखेने राज कुंद्राविरोधात दाखल केले आरोपपत्र, शिल्पा शेट्टी होणार साक्षीदार, 1500 पानांत लेखाजोखा…

आमीर खानच्या बॉडीगार्डचा तगडा पगार, आमदार-खासदार ते IAS-IPS पेक्षाही बक्कळ कमाई

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.