Bigg Boss OTT Promo : ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरातील हंगाम्याला भोजपुरी तडका लागणार, ‘या’ अभिनेत्रीची ग्रँड एंट्री होणार!

टीव्हीचा सर्वात लोकप्रिय शो 'बिग बॉस' च्या (Bigg Boss OTT) या हंगामातील दुसऱ्या स्पर्धकाचे नाव निश्चित झाले आहे. बऱ्याच दिवसांपासून चर्चा होती की, यावेळी भोजपुरी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री अक्षरा सिंह (Akshara Singh) या शोमध्ये एंट्री घेणार आहे.

Bigg Boss OTT Promo : ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरातील हंगाम्याला भोजपुरी तडका लागणार, ‘या’ अभिनेत्रीची ग्रँड एंट्री होणार!
Bigg Boss OTT
Follow us
| Updated on: Aug 06, 2021 | 12:10 PM

मुंबई : टीव्हीचा सर्वात लोकप्रिय शो ‘बिग बॉस’ च्या (Bigg Boss OTT) या हंगामातील दुसऱ्या स्पर्धकाचे नाव निश्चित झाले आहे. बऱ्याच दिवसांपासून चर्चा होती की, यावेळी भोजपुरी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री अक्षरा सिंह (Akshara Singh) या शोमध्ये एंट्री घेणार आहे. तर, आता या बातमीला पुष्टी मिळाली आहे की, अक्षरा सिंह करण जोहर होस्ट करत असलेल्या ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये सहभागी होणार आहे. अक्षरा सिंहचा प्रोमो समोर आला आहे, ज्यात ती तिची स्टाईल दाखवत आहे आणि स्टेजवर प्रवेश करत आहे.

अक्षराचा चेहरा प्रोमोमध्ये दाखवला नाही, पण एक हलकी झलक नक्कीच दाखवली आहे. व्हिडीओमध्ये अक्षरा म्हणते की, ‘जे लोक आमच्या भोजपुरी मनोरंजन विश्वाचे नाव खराब करतात, त्या सर्वांना गप्प करण्यासाठी येत आहे. जरी मी जबरदस्ती रोमान्स करण्यासाठी ओळखले जात असले, तरी पण जर गरज पडली तर मी तितकीच अॅक्शनही करेन.’ यानंतर अभिनेत्री रंगमंचावर दमल डान्स करताना दिसते.

पाहा प्रोमो :

View this post on Instagram

A post shared by BIGGBOSS? (@biggboss_media)

‘या’ स्पर्धकांचीही नावे चर्चेत!

भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंह व्यतिरिक्त, टीव्ही, चित्रपट आणि संगीत जगतातील अनेक बडे कलाकार देखील ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये दिसतील. त्यात दिव्या अग्रवाल, रिद्धिमा पंडित, नेहा भसीन आणि नेहा मर्दा यांच्या नावांचा समावेश आहे. या सर्वांनी हे पुष्टी केले आहे की, ते या वादग्रस्त शोचा एक भाग बनणार आहेत. अशीही बातमी आहे की शिल्पा शेट्टीची बहीण शमिता देखील करण जोहरच्या शोमध्ये भाग घेऊ शकते. याशिवाय टीव्ही कलाकार झीशान खान, करण नाथ, निशा रावल, अनुष्का दांडेकर देखील शोमध्ये दिसू शकतात.

या वेळी हा शो नेहमीप्रमाणे थेट टीव्हीवर प्रसारित केला जाणार नाही, तर प्रथम ओटीटी प्लॅटफॉर्म वूट वर प्रसारित केला जाणार आहे. माध्यम अहवालानुसार, बिग बॉसचे पहिले 6 आठवडे वूटवर प्रसारित केले जातील, त्यानंतर पुढील भाग टीव्हीवर प्रसारित केले जातील जे सलमान खान होस्ट करेल.

करण जोहर होस्ट करणार शो

करण जोहर ‘बिग बॉस’चा ओटीटी व्हर्जन होस्ट करणार आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन त्याने याबाबत माहिती दिली आहे. रिपोर्ट्सनुसार, प्रथम सिद्धार्थ शुक्ला हा ओटीटी व्हर्जन होस्ट करणार होते, पण त्यानंतर करण जोहरच्या नावाची घोषणा झाली.

‘बिग बॉस 13’ फेम शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्लासुद्धा या कार्यक्रमाचा एक भाग होऊ शकतात. ते खास पाहुणे म्हणून या शोमध्ये येऊ शकतात. जर अहवालांवर विश्वास ठेवला गेला, तर निर्माते या दोघांशी चर्चा करत आहेत. दोघांनी शोमध्ये येण्यासाठी हो म्हटलं तर चाहत्यांना पुन्हा एकदा ‘सिदनाज’ एकत्र धमाल करताना पाहायला मिळतील.

(Bigg Boss OTT Promo Bhojpuri actress Akshara Singh will enter in BB house)

हेही वाचा :

‘देवमाणूस’च्या अजित कुमारचं काम वाढलं म्हणून बज्याने आणला नवा असिस्टंट, पाहा कलाकारांचा धमाल व्हिडीओ

Bigg Boss OTT | करण जोहरला ‘या’ गोष्टीचा फोमो’, म्हणूनच जाणार नाही ‘बिग बॉस’च्या घरात!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.