Bigg Boss OTT 2 : सलमान खान याचा ‘बिग बॉस ओटीटी 2’ आजपासून; कधी आणि कुठे लाईव्ह शो पाहणार?

ओटीटी प्लॅटफॉर्मवर आजपासून बिग बॉसचा दुसरा सीजन सुरू होणार आहे. अभिनेता सलमान खान ओटीटीवरही बिग बॉसचं होस्टिंग करणार आहे. या शोमध्ये अनेक नावाजलेले टीव्ही स्टार भाग घेणार आहे. त्यात एका प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नीही भाग घेणार आहे.

Bigg Boss OTT 2 : सलमान खान याचा 'बिग बॉस ओटीटी 2' आजपासून; कधी आणि कुठे लाईव्ह शो पाहणार?
salman khan Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 17, 2023 | 6:56 AM

मुंबई : बिग बॉस ओटीटीचा दुसरा सीजन सुरू होण्यासाठी अवघे काही तास बाकी आहेत. या सीजनची पूर्वीपेक्षाही अधिक क्रेझ वाढली आहे. त्याचं कारण म्हणजे या शोचे होस्ट अभिनेता सलमान खान. छोट्या पड्याद्यावर बिग बॉसला हिट केल्यानंतर आता सलमान खान ओटीटीवरील बिग बॉसलाही हिट करण्याच्या तयारीत आहे. सलमानने या शोची संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. बिग बॉस आणि सलमान खान हे एक समीकरण झालं आहे. सलमानला होस्ट करताना पाहणं ही त्याच्या चाहत्यांसाठी पर्वणीच असते. त्यामुळेच आता निर्मात्यांनी सलमान खानला ओटीटीवर आणलं आहे. सलमान खानच्या या ओटीटीवरील बिग बॉसला पाहण्यासाठी त्याचे चाहतेही प्रचंड उत्सुक झाले आहेत.

हे सुद्धा वाचा

ओटीटीवरील बिग बॉसच्या कंटेस्टन्ट्सच्या नावाचा खुलासा झाला आहे. ‘बिग बॉस ओटीटी 2’ कुठे आणि कधी बघावा याबाबत जर तुमचा संभ्रम असेल तर आम्ही तुमच्या प्रश्नाचं उत्तर देत आहोत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज 17 जूनपासून हा दुसरा सीजन सुरू होत आहे. आता बिग बॉस ओटीटीवर आहे तर ओटीटीवर कसा पाहावा? हा प्रश्न तुमच्या मनात रेंगाळत असेल. तर त्याचं उत्तरही साधं आणि सोपं आहे. हा शो तुम्ही जियो सिनेमावर पाहू शकता.

संपूर्ण सीजन फुकटात

आज शनिवारी रात्री 9 वाजता या शोचा ग्रँड प्रीमियर जियो सिनेमावर स्ट्रीम होणार आहे. त्याशिवाय तुम्ही हा संपूर्ण सीजन फुकट पाहू शकता. त्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या मोबाईलमध्ये जियो सिनेमा डाऊनलोड करावा लागणार आहे. त्यानंतर तुम्ही हा शो जियोवर आरामात पाहू शकता. सलमान खानची होस्टिंग एन्जॉय करण्यासाठी तुम्हाला एक नवा पैसाही खर्च करण्याचा गरज पडणार नाही.

हे आहेत स्पर्धक

आता राहिली कंटेस्टंटची बारी. या शोमधील स्पर्धक कोण आहेत? असा सवाल तुम्हाला पडल्या वाचून राहणार नाही. या सीजनमध्ये टीव्ही स्टारची मांदियाळी पाहायला मिळणार आहे. या शिवाय भावा बहिणीची जोडीही पाहायला मिळणार आहे. तसेच या शोमध्ये एक एक्स कपलही पाहायला मिळणार आहे. या शोमध्ये शीजान खान आणि त्याची बहीण फलक नाजही येणार असल्याचं सांगितलं जात आहे.

त्यात आणखी एक नाव अधिक चर्चेत आहे. ते म्हणजे प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलिया सिद्दीकी. तीही या शोमध्ये भाग घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. नवाजुद्दीन आणि त्याची पत्नी आलिया यांच्यातील वाद चांगलाच रंगला होता. हे प्रकरण कोर्टापर्यंत गेलं होतं. त्यामुळे आलिया या शोमध्ये येत असल्याने नवाजच्या चाहत्यांचीही उत्सुकता ताणली गेली आहे.

'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’.
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं.