AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chhorii Trailer Release | ‘लपाछपी’चा हिंदी रिमेक, नुसरत भरुचा अभिनित भयपट ‘छोरी’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला!

‘छोरी’ हा या पुरस्कार विजेत्या व समीक्षकांनी गौरवलेल्या ‘लपाछपी’ या मराठी चित्रपटाचा रिमेक आहे. हा चित्रपट अमेझॉन प्राईम व्हिडीओवर भारतासहित अन्य 240 देशा-प्रदेशांमध्ये 26 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

Chhorii Trailer Release | ‘लपाछपी’चा हिंदी रिमेक, नुसरत भरुचा अभिनित भयपट ‘छोरी'चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला!
Chhorii
| Edited By: | Updated on: Nov 17, 2021 | 2:57 PM
Share

मुंबई : ‘छोरी’ या बहुचर्चित अमेझॉन ओरिजिनल चित्रपटाचा ट्रेलर अमेझॉन प्राईम व्हिडीओने आज प्रदर्शित केला. विशाल फुरीया दिग्दर्शित ‘छोरी’ हा चित्रपट भूषण कुमार, कृष्णन कुमार, विक्रम मल्होत्रा, जॅक डेव्हीस आणि शिखा शर्मा यांनी एकत्रित रीत्या निर्माण केलेला असून, त्यामध्ये नुसरत भरुचा, मिता वशिष्ठ, राजेश जैस, यानिया भारद्वाज आणि सौरभ गोयल यांच्या मुख्य भूमिका आहेत.

‘छोरी’ हा या पुरस्कार विजेत्या व समीक्षकांनी गौरवलेल्या ‘लपाछपी’ या मराठी चित्रपटाचा रिमेक आहे. हा चित्रपट अमेझॉन प्राईम व्हिडीओवर भारतासहित अन्य 240 देशा-प्रदेशांमध्ये 26 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

या ट्रेलर मध्ये आपल्याला साक्षीशी (नुसरत भरुचा) संबंधित छोरी या पिशाच्च जगाची एक झलक आणि बरेच काही पहायला मिळणार असून, प्रत्येक दृश्यागणिक प्रेक्षकांच्या मनावरचा ताण वाढत जाणार आहे. यातील थरार प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. ‘साक्षी स्वत:ला वाचवू शकेल का?, ती तिच्या गर्भातील बाळाला वाचवू शकेल का?’ प्रेक्षकांना पडणाऱ्या या प्रश्नांची उत्तरे चित्रपटात मिळणार आहेत.

ही केवळ झलक!

चित्रपटाविषयी सांगताना नुसरत भरुचा म्हणाली की, ‘भयपटासारख्या नव्या प्रकारच्या चित्रपटात काम करणे एकाचवेळी घाबरवणारे व उत्साहवर्धक आहे. भय उत्पन्न करणाऱ्या या चित्रपटात प्रेक्षकांना बांधून ठेवेल असा आणखी एक दृष्टीकोन आहे. हा ट्रेलर म्हणजे एका प्रचंड मोठ्या रहस्याची केवळ एक झलक आहे. आम्ही या चित्रपटासाठी घेतलेले कष्ट प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील, अशी मला आशा आहे. मी प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यास उत्सुक आहे.’

दिग्दर्शक विशाल फुरीया म्हणाले की, ‘छोरी हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला हवा. ‘छोरी’मार्फत आम्ही एक भयकथा जगभरातील लोकांपर्यंत घेऊन जात आहोत व प्रेक्षकांना कधीही न पाहिलेल्या भयपटाचा आनंद मिळवून देत आहोत. क्रीप्ट टीव्ही, टी सिरीज आणि अबेंडाटिया एंटरटेंमेंट यांच्याबरोबर भागीदारी केल्याचा मला मनस्वी आनंद आहे. आणि जगभर चित्रपट घेऊन जाणाऱ्या प्राईम व्हिडीओबरोबर आम्ही काम करत आहोत याचा मला आनंद आहे.’

पाहा ट्रेलर :

काय आहे कथानक?

शहरातील घराबाहेर काढले गेलेले एक तरुण जोडपे उसाच्या शेतामध्ये असलेल्या एका थरारक घरात आसरा घेते. आठ महिन्याची गरोदर गृहिणी तिच्या बाळाच्या मागे लागलेल्या पिशाच्च शक्तींपासून तिच्या गर्भातील बाळाचे संरक्षण करण्यासाठी निकराचे प्रयत्न करते.

‘छोरी’ हा विशाल फुरीया दिग्दर्शित व भूषण कुमार, कृष्णन कुमार, विक्रम मल्होत्रा, जॅक डेव्हीस आणि शिखा शर्मा निर्मित आगामी भयपट आहे. हा चित्रपट लपाछपी या मराठी चित्रपटाचा रिमेक असून त्यामध्ये नुसरत भरुचा यांची मुख्य भूमिका व मिता वशिष्ठ, राजेश जैस, यानिया भारद्वाज आणि सौरभ गोयल यांच्यादेखील भूमिका आहेत.

हेही वाचा :

Ranveer-Deepika Wedding Anniversary | ‘रब ने बनादी जोडी’, रोमँटिक अंदाजात रणवीर-दीपिकाने साजरा केला लग्नाचा वाढदिवस!

Salman Khan:”सलमान खानसारख्या अभिनेत्यांनी मुस्लिमांना लसीकरणसाठी प्रोत्साहन दिले पाहिजे”- महापौर किशोरी पेडणेकर

इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार.