Money Heist 5 | क्राईम थ्रिलर ड्रामा ‘मनी हाईस्ट 5’ प्रेक्षकांच्या भेटीला, पाहा कथेत आतापर्यंत काय काय घडलं…
बऱ्याच काळापासून ‘मनी हाईस्ट 5’बद्दल (Money Heist 5) चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. ट्रेलर रिलीज झाल्यापासून ही सीरीज कधी सादर होणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. ‘मनी हाईस्ट सीझन 5’ अखेर आज म्हणजेच 3 सप्टेंबर 2021 रोजी रिलीज होणार आहे.
मुंबई : बऱ्याच काळापासून ‘मनी हाईस्ट 5’बद्दल (Money Heist 5) चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. ट्रेलर रिलीज झाल्यापासून ही सीरीज कधी सादर होणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. ‘मनी हाईस्ट सीझन 5’ अखेर आज म्हणजेच 3 सप्टेंबर 2021 रोजी रिलीज होणार आहे.
‘मनी हाईस्ट सीझन 5’ आज नेटफ्लिक्सवर 12.30च्या आसपास रिलीज होईल. ‘मनी हाईस्ट’ ही या क्षणी इंग्रजी नसलेली दुसरी सर्वात लोकप्रिय मालिका आहे. मनी हाईस्टचा हा शेवटचा सीझन दोन भागांमध्ये चाहत्यांसमोर सादर केला जाईल. चला तर जाणून घेऊया आतापर्यंत या कथानकात काय-काय घडलं…
मनी हाईस्ट सीझन 1
या प्रसिद्ध सीरीजच्या सीझनच्या पहिल्या भागात, चाहत्यांनी आठ मास्क घातलेल्या चोरांना स्पेनच्या रॉयल मिंटमध्ये लॉक झालेले पाहिले. या संपूर्ण घटनेत त्यांचा मास्टरमाईंड प्रोफेसर पोलिसांना चकमा देताना त्याच्या सहकाऱ्यांना पैसे लुटण्यात मदत करतो. भाग 1 “टोकियो” नावाच्या एका महिलेच्या कथनाने सुरू होतो. या कथेचे नायक प्रोफेसर आणि आठ दरोडेखोर आहेत ज्यांची नावे वेगवेगळ्या शहरांनुसार आहेत. या चोरी दरम्यान, प्रोफेसर काही नियम बनवतात, ज्या अंतर्गत त्यांना कोणत्याही रक्तपात न करता ही दरोडा पूर्ण करावा लागतो आणि हे करत असताना हे दरोडेखोर एकमेकांवर प्रेम करू शकत नाहीत. हा पहिला सीझन प्रेक्षकांना खूप आवडला.
मनी हाईस्ट सीझन 2
दुसऱ्या सीझनमध्ये मिंटमध्ये अडकलेले दरोडेखोर प्रोफेसरच्या नियमांचे पालन करण्यात अपयशी ठरतात. कारण या दरोड्यात त्यांना ओलिसांच्या बंडाला सामोरे जावे लागते. टोकियो व्हॉईस-ओव्हरद्वारे त्यांना या संपूर्ण घटनेची माहिती देतो. जेव्हा पोलीस प्रोफेसरची ओळख पटवण्याच्या जवळ असतात, तेव्हा मिंट टीममध्ये समन्वयाचा अभाव बंडखोरीला कारणीभूत ठरतो आणि एक दरोडेखोर पोलिसांच्या हाती लागतो. मात्र, या सगळ्यात आपल्या साथीदाराला सोडवून ते चोरी करण्यात यशस्वी ठरतात. तर चोरीच्या सुमारे एक वर्षानंतर, रकेलने नोकरी सोडून प्रोफेसरने दिलेल्या पोस्टकार्डच्या आधारे त्याला भेटते.
मनी हाईस्ट सीझन 3
मनी हाईस्टचा सीझन 3 खूप प्रसिद्ध होता, या मालिकेत देखील तीच कथा पुढे नेण्यात आली होती की, सर्व चोर एकमेकांपासून दूर वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या जीवनाचा आनंद घेताना दिसतात. तथापि, इंटरपोलने रियोला इंटरसेप्टेड फोनमुळे पकडले आणि पुन्हा प्रोफेसरने त्याच्या सोबत्याला वाचवण्याची योजना आखली आहे. रिओला वाचवण्यासाठी प्रोफेसर आणि त्यांची टीम पुन्हा एकत्र आली आहे. यावेळी एक धाडसी आणि धोकादायक नवीन योजनेसह ‘बँक ऑफ स्पेन’ त्याच्या निशाण्यावर आहे. सीझन 3 मध्ये प्रोफेसर आणि त्याचा भाऊ बर्लिनची अनेक फ्लॅशबॅक दृश्ये आहेत, ज्यात ते दरोड्याची योजना आखताना दिसतात. भाग 3 चे वैशिष्ट्य असे की शेवटी लिस्बन स्वतः पोलिसांसमोर शरण गेली आहे. टोकियो म्हणते की, प्रोफेसर आता स्वतःच्या जाळ्यात अडकला आहे आणि खरे युद्ध सुरू झाले आहे.
मनी हाईस्ट सीझन 4
आता मालिकेच्या शेवटच्या भागाबद्दल, म्हणजे चौथ्या भागाबद्दल बोलूया. प्रोफेसरची योजना मनी हाईस्टच्या सीझन 4 मध्ये सुरू होते. मग अनेकांचे जीव धोक्यात येतात. या वेळी प्रोफेसर आणि चोरांना बँक ऑफ स्पेनच्या आत आणि बाहेर दोन्ही बाजूच्या शत्रूंचा सामना करावा लागतो. सीझन 4च्या सुरुवातीला प्रोफेसरला वाटते की, लिस्बन मारली गेली आहे. दुसरीकडे, रियो आणि टोकियो रागाच्या भरात सैन्याचे टँक उडवतात आणि नैरोबी देखील या सीझनमध्ये मृत्यूशी संघर्ष करताना दिसत आहे. प्रोफेसरच्या टीमसाठी हा सर्वात कठीण काळ आहे. आता प्रेक्षकांना भाग 5मध्ये कळेल की, ही चोरी कशी पूर्ण होते किंवा हे सर्व कसे संपते.