Money Heist Season 5 Part 2 | प्रतीक्षा संपली! ‘मनी हाईस्ट’चा शेवटचा भाग थोड्याच वेळात प्रेक्षकांच्या भेटीला, जाणून घ्या कसा आणि कुठे पाहाल?
नेटफ्लिक्सची लोकप्रिय थ्रिलर वेब सीरीज 'मनी हाईस्ट' (Money Heist) पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. Netflix च्या या लोकप्रिय सीरीजचा पाचवा आणि शेवटच्या सीझनचा शेवटचा भाग आज म्हणजेच 3 डिसेंबर रोजी स्ट्रीम केला जाणार आहे.

मुंबई : नेटफ्लिक्सची लोकप्रिय थ्रिलर वेब सीरीज ‘मनी हाईस्ट’ (Money Heist) पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. Netflix च्या या लोकप्रिय सीरीजचा पाचवा आणि शेवटच्या सीझनचा शेवटचा भाग आज म्हणजेच 3 डिसेंबर रोजी स्ट्रीम केला जाणार आहे. त्यामुळे चाहत्यांची प्रदीर्घ प्रतीक्षा आता संपणार आहे. शेवटच्या भागात सर्व काही स्पष्ट होणार आहे. प्रोफेसर आणि त्यांच्या टीमचे पुढे काय होणार? ते बँक ऑफ स्पेनमधून सोने चोरण्यात यशस्वी होतील का? किंवा पोलीस त्यांना पकडण्यात यशस्वी होतील का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज प्रेक्षकांना मिळणार आहेत. चला तर, जाणून घेऊया भारतात कधी आणि कोणत्या वेळी हा शो तुम्ही पाहू शकता…
कधी होणार रिलीज?
‘मनी हाईस्ट’ सीझन 5 चा दुसरा आणि अंतिम खंड शुक्रवारी (3 डिसेंबर) दुपारी 1:30 वाजता Netflix वर स्ट्रीम केला जाईल.
कुठे पाहू शकता सीरीज?
जर तुमच्याकडे Netflix चे सदस्यत्व असेल, तर तुम्ही आज दुपारी 1.30 नंतर कधीही ही सीरीज पाहू शकता.
मनी हाईस्टचा शेवटचा सीझन दोन भागात विभागला गेला होता. पहिल्या भागात 5 भाग होते आणि शेवटच्या भागात देखील पाच भाग असणार आहेत. पहिला भाग 3 सप्टेंबरला नेटफ्लिक्सवरच रिलीज झाला होता. प्रोफेसर आणि त्यांच्या टीमचे उर्वरित सदस्य सध्या बँक ऑफ स्पेनमध्ये आहेत. आता पुढे काय होईल यासाठी दुपारी दीड वाजेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
नव्या सीझनची उत्सुकता!
गेल्या सीझनमध्ये जबरदस्त मनोरंजन करणाऱ्या या मालिकेच्या शेवटच्या सीझनबद्दल प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. यावेळी प्रोफेसरची टीम काय करते आणि प्रोफेसर आणि अॅलिसियाच्या भांडणात नेमका कोणाचा विजय होतो हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. Money Heist ही स्पॅनिश भाषेतील वेब सीरीज आहे. मनी हाईस्टच्या पाचव्या भागात उर्सुला कॉर्बेरो, अल्वारो मोर्टे, इत्झियार इटुनो, पेड्रो अलोन्सो, मिगुएल हेरन, जेम लॉरेन्टे, एस्थर एस्बो, एनरिक आर्से, डार्को पेरिक, होविक केचेरियन दिसणार आहेत.
