केवळ मनोरंजनच नाही तर व्यवसायाच्या नव्या कल्पनाही! ‘शार्क टॅंक इंडिया’ बिझनेस रियालिटी शो सर्वत्र चर्चा!
बदलत्या भारताच्या नव्या विचारसरणीला मिळत आहे एक नवीन मंच, जेथे उगवत्या उद्योजकांची स्वप्ने होतील साकार! ‘शार्क टॅंक इंडिया’ या जगातील नंबर 1 बिझनेस रियालिटी शोच्या भारतातील पहिल्या आवृत्तीच्या माध्यमातून सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन भारतातील वाढत्या उद्योजकतेच्या इकोसिस्टमला प्रोत्साहन आणि होतकरू व्यवसायिकांना एक नवा कोरा अनुभव देत आहे.
मुंबई : बदलत्या भारताच्या नव्या विचारसरणीला मिळत आहे एक नवीन मंच, जेथे उगवत्या उद्योजकांची स्वप्ने होतील साकार! ‘शार्क टॅंक इंडिया’ या जगातील नंबर 1 बिझनेस रियालिटी शोच्या भारतातील पहिल्या आवृत्तीच्या माध्यमातून सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन भारतातील वाढत्या उद्योजकतेच्या इकोसिस्टमला प्रोत्साहन आणि होतकरू व्यवसायिकांना एक नवा कोरा अनुभव देत आहे. हा क्रांतिकारी शो उगवत्या उद्योजकांना या शोमधील शार्क्स म्हणजे स्वकष्टाने पुढे आलेल्या नामवंत व्यवसायिकांपुढे आपल्या व्यवसाय कल्पना सादर करून त्यांच्याकडून गुंतवणूक मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची आणि व्यवसाय वाढवण्याची संधी देतो. या शार्क्सना प्रभावित करण्यासाठी स्पर्धकांना फक्त योग्य प्रकारे पिचिंग करावे लागेल.
शार्क टॅंक इंडियाच्या जगात बुडी मारून स्वप्नं सत्यात उतरताना बघा. हा शो 20 डिसेंबरपासून दर सोमवार ते शुक्रवार रात्री 9:00 वाजता प्रसारित करण्यात येणार आहे.
आपल्या महान भारतीय स्वप्नाचा पाठपुरावा करण्याची सुवर्णसंधी
आत्ताच्या अत्यंत चैतन्यशील व्यवसाय-वातावरणात भारतात अनेक नावीन्यपूर्ण व्यवसाय कल्पना जन्म घेत आहेत. देशातील स्टार्ट-अप इको-सिस्टमला रेटा देत, शार्क टॅंक इंडिया भारतातील होतकरू व्यावसायिकांना त्यांची उद्योजकतेची स्वप्ने प्रत्यक्षात उतरविण्यासाठी एक जबरदस्त मंच प्रदान करत आहे. या टॅंकमध्ये शार्क्सच्या समोर आल्यावर स्पर्धकांमधील चिकाटीची कसोटी होईल. शार्क्स स्पर्धकाच्या अंतिम ‘पिच’वरून त्यांची व्यवसाय कल्पना समजून घेतील, त्याचे मूल्यांकन करतील आणि योग्य वाटल्यास गुंतवणुकीची ऑफर देतील! शार्क्सना या पिचेसबद्दल आधीपासूनच माहिती असणार नाही. जर पिचर्स या शार्क्सना प्रभावित करू शकले, तर त्यांना त्यांच्याकडून तत्काळ एखादी ऑफर / गुंतवणूक मिळण्याची शक्यता आहे. ज्याची असेल कल्पना बेस्ट, त्याच्यात करतील शार्क्स इन्व्हेस्ट! हा करार आहे!’. खूप कष्ट केल्यानंतर टॅंकमध्ये शार्क्ससोबत एखादे डील झाले, तर त्या पिचरचा आनंद बघणे हे खरोखर अवर्णनीय असेल!
उद्योजकतेचा क्रॅश कोर्स मिळवा
शार्क टॅंकची भारतीय आवृत्ती प्रेक्षकांना नक्कीच बघायला आवडेल, कारण या पिचेसमधून प्रेक्षकांना हे बघायला मिळेल की, जेथे मोठमोठे सौदे होतात, तेथे बंद दरवाजांच्या मागे नक्की काय होते! प्रेक्षकांना मनोरंजनात्मक आणि शैक्षणिक अनुभव देणारे हे एपिसोड म्हणजे उद्योजकतेविषयीचे जणू क्रॅश कोर्सच असतील! कारण, यातून तुम्हाला गुंतवणूक करणे, पिचिंग करणे आणि उत्पादन विकसित करणे याविषयीची माहिती पिचेसवरून आणि शार्क्सच्या फीडबॅकवरून मिळेल. म्हणजे, काही एपिसोड झाल्यानंतर, व्यवसायातील काही युक्त्या प्रेक्षकांना व्यवस्थित समजू लागतील. शार्क टॅंक इंडियाच्या रूपाने एक आकर्षक डीलच तुमची वाट बघत आहे.
स्टार्ट-अप उद्योगातील दिग्गज शार्क्सच्या रूपात असणार
देशाच्या काना-कोपर्यातून आलेल्या तेजस्वी, होतकरू व्यावसायिकांना सक्षम करण्यासाठी शार्क्स सज्ज झाले आहेत. हे शार्क्स स्वतः यशस्वी उद्योजक आहेत. शार्क टॅंक इंडियाच्या पहिल्यावहिल्या आवृत्तीमधील अत्यंत प्रतिभावंत शार्क्स हे आहेत – अशनीर ग्रोव्हर (भारतपे चा संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक), विनीता सिंह (शुगर कॉस्मेटिक्सची CEO आणि सहसंस्थापक), पीयुष बन्सल (लेन्सकार्टचा संस्थापक आणि CEO), नमिता थापर (एमक्योर फार्मास्यूटिकल्सची कार्यकारी संचालक), अनुपम मित्तल (शादी.कॉम – पीपल ग्रुपचा संस्थापक आणि CEO), गझल अलग (ममाअर्थची सह-संस्थापक आणि मुख्य ममा) आणि अमन गुप्ता (बोट कंपनीचा सह-संस्थापक आणि मुख्य मार्केटिंग अधिकारी). या 7 शार्क्सच्या बोलण्यातून, संवादातून भरपूर नाट्य उलगडत जाईल. आपल्या नैपुण्याच्या क्षेत्रानुरूप ते अनोखे व्हिजन देतील आणि डील करण्याबाबत गंमतीशीर गोष्टी सांगतील. तर मग, आशास्पद उद्योजकांना अधिक सुजाण करण्यासाठी या अत्यंत चतुर गुंतवणूकदारांना आपल्या पैशाचा उपयोग करताना बघा.
शार्क टॅंक इंडियाचा पहिला होस्ट
या शो मधील शार्क्स भारतातील उद्योजकीय एकोसिस्टम विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील, तर धडाडीचा अभिनेता आणि तरुणांचा लाडका रणविजय सिंह या शोच्या पहिल्यावहिल्या आवृत्तीचा होस्ट असणार आहे. पिचर्स आणि प्रेक्षकांसाठी मार्गदर्शक म्हणून काम करताना रणविजय सिंह या नवीन संकल्पनेचा फॉरमॅट प्रेक्षकांना समजावून देईल, नावीन्यपूर्ण बिझनेस कल्पनांचा परिचय करून देईल आणि प्रेक्षकांना समजेल आशा सोप्या शब्दात व्यवसायाच्या बाबी / प्रक्रिया उलगडून सांगेल. शिवाय, पिचर्ससाठी तो जिवाभावाचा दोस्त असेल, कारण तो त्यांचे दडपण कमी करण्यात मदत करेल. त्यांचे पिचिंगच्या अगोदरचे आणि शार्क्स डेनमध्ये शार्क्स सोबतचे अनुभव त्यांच्याकडून काढून घेईल.
प्रेक्षकांना प्रेरित करणारी असामान्य पिचेस
शार्क टॅंकने जगभरातील लक्षावधी लोकांना उद्योजकतेविषयी सुशिक्षित केले आहे आणि आता भारतीय प्रेक्षकांना देखील उद्योजकतेबाबत अधिक सुजाण करण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. जे लोक उद्योजक बनण्याचे स्वप्न पाहतात, त्यांना ‘बदलत्या भारताच्या नव्या चित्रा’वर फोकस ठेवून हा शो आशा देतो. शार्क टॅंक इंडियामध्ये आपला व्यवसाय खूप वाढवण्याची स्वप्नं पाहणार्या होतकरू व्यावसायिकांकडून नावीन्यपूर्ण आणि भविष्यवेधी व्यवसाय कल्पना सादर करण्यात येतील. यातील काही भन्नाट पिचेस खालीलप्रमाणे आहेत:
- दिल्लीच्या रिया खट्टरची ‘हार्ट अप माय स्लीव्ह्ज’ ही कल्पना तुम्हाला या उत्पादनाच्या साधेपणाबाबत आणि क्षमतेबाबत विचार करायला लावेल. हा एक अनोखा ब्रॅंड आहे, जो डिटॅच होऊ शकणार्या स्टेटमेंट स्लीव्ह्जचा वापर करून मिनिमलिझम आणि टिकाऊपणाचा पुरस्कार करतो. ही कल्पना महामारीच्या काळात अक्षरशः कपाट आवरत असताना सुचलेली आहे. रिया खट्टरला मुलींना नेहमी सतावणार्या अगदी सामान्य समस्येवर जणू तोडगा सापडला. ही समस्या म्हणजे अनेक कपडे असूनही घालण्याजोगे कपडे नसणे. हा अनोखा ब्रॅंड डिटॅचेबल स्लीव्ह्ज बनवतो, ज्या कोणत्याही नीरस ड्रेसवर नवीन साज चढवतात.
- ब्लू पाइन फूड्स प्रा. लि.- 43-वर्षीय अदिती मदन म्हणजे मोमो मामीने स्थापन केलेला हा फ्रोझन आणि सोयिस्कर प्रोपरायटरी फूड प्रॉसेसिंगचा व्यवसाय आहे. दार्जिलिंगची अदिती वयाच्या अवघ्या 8व्या वर्षी मोमो बनवू लागली. आणि अनेक वर्षांच्या सरावानंतर तिने मोमोज बनवण्याची आपली ही आवड एका यशस्वी व्यवसाय कल्पनेत रूपांतरित केली. कारण प्रत्येकाने पौष्टिक आणि प्रिझर्व्हेटिव्ह-मुक्त, अस्सल दार्जिलिंग मोमोजचा आस्वाद घ्यावा ही तिची इच्छा होती.
- एक असे व्यवसाय पिच आहे, जे सिद्ध करते की, आपले उद्योजकतेचे स्वप्न साकार करण्यासाठी वयाचा अडसर असू शकत नाही. कल्पना झा आणि उमा कुमारी या नणंद-भावजयीच्या जबरदस्त जोडीने झा जी स्टोर्स या फूड ब्रॅंडची कल्पना मांडली. यात बिहारच्या मिथीलांचल येथील उन्हात वाळवलेली लोणची ही त्यांची खासियत आहे. अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्याच्या इराद्याने या दोघींनी झा जी स्टोर्स नावाने आपला व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले. ही खरोखर दमदार जोडी आहे!
- जयेश साहेबराव टोपे यांचे रीव्हॅम्प मोटो प्रा. लि.-टिकाऊ, अनुकूल सोल्युशन्स देऊन समाजाला सक्षम बनवण्याचे व्हिजन घेऊन हा व्यवसाय सुरू करण्यात आला. मॉड्यूलर EV बाईक्स आणि आपल्या वापरानुरूप स्वतःत बदल करून घेण्याची त्यांची क्षमता यावरून त्यांचे नाव रीव्हॅम्प मित्रा ठेवण्यात आले. पर्यावरण समस्येच्या या काळात EV बाईक्स म्हणजे बाईकिंग उद्योगासाठी एक वरदानच आहे.
- विशेष लक्ष द्यावे असे एक अत्यंत ‘LIT’ व्यवसाय पिच म्हणजे अनिश बसू रॉय आणि सागर भलोटिया यांचे टॅगZ फूड्स – हा एक जेनZ स्नॅक ब्रॅंड आहे, जो अनेक प्रकारचे ‘न तळलेले, न बेक केलेले’ पॉप्ड पोटॅटो चिप्स प्रदान करतो, ज्यांच्यात 50% कमी चरबी असते. पोषणाशी तडजोड न करता लोकांचे स्नॅकचे लाड पुरवणारा हा जेनZ ब्रॅंड आहे. आधुनिक पॉपिंग टेक्नॉलॉजीच्या मदतीने ते नावीन्यपूर्ण आणि आरोग्याच्या दृष्टीने अधिक चांगले स्नॅक बनवतात, जे पाहून तोंडाला पाणी सुटते. या पिढीइतकेच ते स्नॅकही हलकेफुलके आहेत.
शार्क टॅंक इंडियामध्ये विविध पार्श्वभूमीतून आलेल्या उद्योजकांना आपली उद्योजकीय स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आपल्या व्यवसायांची यथायोग्य माहिती देताना पाहणे नक्कीच खूप रोचक असेल. ‘शार्क टॅंक इंडिया’च्या सागरात उडी मारा, 20 डिसेंबरपासून दर सोमवार ते शुक्रवार रात्री 9.00 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर.
हेही वाचा :
Aishwarya Rai Bachchan | ‘बच्चन’ परिवार अडचणीत, ऐश्वर्या रायला ‘ईडी’चे समन्स! नेमकं प्रकरण काय?
Kajal Aggarwal | ‘सिंघम’ फेम अभिनेत्री काजल अग्रवालकडे ‘गुड न्यूज’? नव्या फोटोंमुळे चर्चेला उधाण!