काय? प्राजक्ता माळी हिची लेस्बियन पार्टनर बनायला ‘ही’ अभिनेत्री तयार?; ‘पटलं तर घ्या’मध्ये काय घडलंय?

हा प्रश्न ऐकल्यावर धाप लागावी तसा प्राजक्ताने श्वासच रोखून धरला. काही क्षण श्वास रोखून धरल्यानंतर तिनेही हसत हसत श्वास सोडला. पण या प्रश्नानंतर मंचावर काहीवेळ स्मशान शांतता पसरली होती. त्यानंतर लगेच ऋतुजाने तिला आपल्या लग्नाविषयी सांगितलं.

काय? प्राजक्ता माळी हिची लेस्बियन पार्टनर बनायला 'ही' अभिनेत्री तयार?; 'पटलं तर घ्या'मध्ये काय घडलंय?
prajakta maliImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 27, 2023 | 8:00 AM

मुंबई : अभिनेत्री प्राजक्ता माळी सतत कोणत्या ना कोणत्या चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून तर सोशल मीडियावर फक्त अन् फक्त प्राजक्ता माळीचीच चर्चा आहे. कारण ती नुकतीच बंगळुरूला श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात जाऊन आली. जाताना मी संन्यास घेत नाहीये असं तिने सांगितलं. तिने संन्यास घेत नसल्याचं सांगितलं तरी चर्चा रंगली नसती तर नवलच. झालंही तसं. चर्चा रंगलीच. त्यानंतर तिने श्री श्री रविशंकर यांना चक्क एक कळीचा प्रश्न विचारला. लग्न करणं कंपल्सरी आहे का? असं तिला विचारण्यात आलं. आता एका कार्यक्रमात प्राजक्ता आणि अभिनेत्री ऋतुजा बागवे दोघी होत्या. यावेळी ऋतुजाला तू प्राजक्ताची समलिंगी पार्टनर बनायला तयार असल्याची चर्चा आहे, असं विचारण्यात आलं. हा प्रश्न येताच प्राजक्ताचा श्वासच रोखला गेला… त्यामुळे आता या शोचीच नव्हे तर प्राजक्ता आणि ऋतुजाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

हे सुद्धा वाचा

प्लॅनेट मराठीच्या पटलं तर घ्या या ओटीटी शोमध्ये ऋतुजा बागवे आणि प्राजक्ता माळी आल्या होत्या. दोघीही जबरदस्त फॅन फॉलोइंग असणाऱ्या अभिनेत्री आहेत. दोघींमध्येही हटके बॉन्डिंग आहे. यावेळी दोघींना मुलाखतकर्तीने बिनधास्त आणि बोल्ड प्रश्न विचारले. या प्रश्नांना दोघींनीही तितक्याच बिनधास्तपणे आणि सहजतेने उत्तरे दिली.

प्राजक्ता फिमेल क्रश

आम्ही असं ऐकलंय ऋतुजा की, प्राजक्ता माळी ही तुझी फिमेल क्रश आहे. हा प्रश्न विचारल्यानंतर दोघींच्याही भुवया उंचावल्या. दोघींनीही एकमेकींकडे आश्चर्याने पाहिलं. त्यानंतर त्यांना पुढचा प्रश्न विचारण्यात आला. तू तिच्याबरोबर लेस्बियन पार्टनर व्हायला तयार झालीयस… असा प्रश्न विचारताच ऋतुजा बागवे दिलखुलास हसली. तिला काय बोलावं हे क्षणभर कळेनाच.

तर हा प्रश्न ऐकल्यावर धाप लागावी तसा प्राजक्ताने श्वासच रोखून धरला. काही क्षण श्वास रोखून धरल्यानंतर तिनेही हसत हसत श्वास सोडला. पण या प्रश्नानंतर मंचावर काहीवेळ स्मशान शांतता पसरली होती. त्यानंतर लगेच ऋतुजाने तिला आपल्या लग्नाविषयी सांगितलं. मी यावर्षी लग्न करतेय… असं ती म्हणाली. त्यावर प्राजक्ताने तिचं अभिनंदनही केलं.

गुटखा खायचीस?

‘रानबाजार’ या वेब सीरिजमधील रत्ना ही व्यक्तीरेखा साकारताना तू गुटखा खायचीस का? असा सवाल प्राजक्ताला करण्यात आला. त्यावर तिने नाही म्हणून सांगितलं. तीन दिवसांपूर्वी इन्स्टावर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्याला 2388 लाइक्स आहेत. चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊसही पाडला आहे.

आघाडीची अभिनेत्री

ऋतुजा बागवे ही मराठीतील एक दमदार अभिनेत्री आहे. नांदा सौख्य भरे, चंद्र आहे साक्षीला आदी मालिकांमधून तिने जबरदस्त अभिनय केला आहे. ऋतुजाने मालिका विश्वात आपली छाप सोडली आहे. मराठी सिनेमातही ती पाय रोवताना दिसत आहे.

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.