‘सेक्रेड गेम्स’चा थरार आता ‘स्टोरीटेल’वर अनुभवता येणार, कृणाल आळवे यांच्या आवाजात

'सेक्रेड गेम्स' या कादंबरीचा मराठी अनुवाद मृणाल काशीकर यांनी केला असून सुप्रसिद्ध वॉईस आर्टिस्ट कृणाल आळवे यांच्या आवाजात 'सेक्रेड गेम्स' भाग 1 व 2 ची लज्जतदार कहानी 'स्टोरीटेल'वर ऐकताना रसिकश्रोते रंगून जातात.

'सेक्रेड गेम्स'चा थरार आता 'स्टोरीटेल'वर अनुभवता येणार, कृणाल आळवे यांच्या आवाजात
सेक्रेड गेम्स
Follow us
| Updated on: Feb 25, 2022 | 10:58 AM

आयेशा सय्यद, मुंबई : श्राव्यसाहित्यात विश्वरूपी मानके निर्माण करणारी जगविख्यात ‘स्टोरीटेल’ नवं क्षितिज पेलण्यात अग्रेसर राहिली आहे. ‘सेक्रेड गेम्स(Sacred Games) या तुफान लोकप्रिय वेब मालिकेची मूळ कादंबरी आता ‘श्राव्यरूपात’ स्टोरीटेलने (Storytel) आपल्या रसिकांसाठी प्रकाशित केली आहे. यापूर्वी स्टोरीटेलने ‘वळू’ या प्रचंड लोकप्रिय चित्रपटाची रंजकदार पटकथा अभिनेते लेखक गिरीश कुलकर्णी (Girirsh Kulkarni) यांच्या आवाजात प्रकाशित केली होती. या प्रयोगाला मराठी रसिकांनी उदंड प्रतिसाद दिल्याने ‘सेक्रेड गेम्स’ची ऑडिओ निर्मिती करण्याचा उत्साह वाढला आहे. ‘सेक्रेड गेम्स’च्या ऑडिओबुकलाही रसिक पसंती देतील असा विश्वास स्टोरीटेलच्यावतीने प्रसाद मिरासदारांना वाटतो आहे. या कादंबरीचा मराठी अनुवाद मृणाल काशीकर (Mrunal Kashikar) यांनी केला असून सुप्रसिद्ध वॉईस आर्टिस्ट कृणाल आळवे (krunal Alawe) यांच्या आवाजात ‘सेक्रेड गेम्स’ भाग 1 व 2 ची लज्जतदार कहानी ऐकताना रसिकश्रोते रंगून जातात.

काटेकर ही व्यक्तिरेखा माहीत नाही, अशी व्यक्ती शोधून सापडणार नाही. मग तुम्ही ‘सेक्रेड गेम्स’ पाहिलेलं असो की नसो. ही सुप्रसिद्ध वेब सिरीज ज्या प्रसिद्ध कादंबरीवरून बनवण्यात आली, ती कादंबरी आता ‘स्टोरीटेल’ मराठीवर ऐकायला मिळणार आहे. या कादंबरीचा मराठी अनुवाद मृणाल काशीकर यांनी केला असून सुप्रसिद्ध वॉईस आर्टिस्ट कृणाल आळवे यांच्या आवाजात ‘सेक्रेड गेम्स’ भाग १ व २ ची लज्जतदार कहानी ऐकताना रसिकश्रोते रंगून जातात.

‘सेक्रेड गेम्स’ची नव्यानं ओळख करून द्यायला हवी का? हो, ही तीच ‘सेक्रेड गेम्स’ कादंबरी आहे, जी तुम्ही अतिशय गाजलेल्या वेब सीरिजच्या रुपात आतापर्यंत स्क्रीनवर पाहिली असेल. तुम्ही ‘सेक्रेड गेम्स’ ही वेब सिरीज पाहिलेली असली तरीही पुन्हा ऑडिओ रुपात ती ऐकण्याची एक वेगळीच मजा आहे. आणि जर तुम्ही ती पाहिलेली नसली, तर ‘स्टोरीटेलवर’ ऐकताना त्यातला एकूणएक प्रसंग तुमच्या डोळ्यासमोर तरंगणार आहे.

‘सेक्रेड गेम्स’चा हा भन्नाट ऑडिओ फॉर्म अगदी प्रवास करताना, ड्राईव्ह करतानाही आपण निवांत ऐकू शकता!  लेखक विक्रम चंद्रा यांची गाजलेली ‘सेक्रेड गेम्स’ ही क्राईम थ्रिलर कादंबरी ‘स्टोरीटेल’ मराठी ऑडिओबुक रुपात दोन भागांमध्ये प्रसिद्ध व्हाईस आर्टिस्ट कृणाल आळवे यांच्या आवाजात ऐकता येणार आहे.

Non Stop LIVE Update
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.