AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

The Family Man 2 | प्रतिक्षा संपली! काही वेळात ‘द फॅमिली मॅन 2’ रिलीज होणार! जाणून घ्या कधी आणि कुठे पाहू शकाल?

अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओची ओरिजिनल वेब सीरीज ‘द फॅमिली मॅन’ने प्रेक्षकांच्या मनात अशी काही छाप सोडली की, लोक आता त्याच्या दुसर्‍या सत्राची आतुरतेने वाट पाहत आहेत. मनोज बाजपेयी आणि समांथा अक्किनेनी अभिनित ही वेब सीरीज शुक्रवार, 4 जून 2021 रोजी रिलीज होणार आहे. मध्यरात्री म्हणजेच 12 वाजता अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर हा शो पाहता येणार आहे.

The Family Man 2 | प्रतिक्षा संपली! काही वेळात ‘द फॅमिली मॅन 2’ रिलीज होणार! जाणून घ्या कधी आणि कुठे पाहू शकाल?
मनोज बाजपेयी
| Edited By: | Updated on: Jun 03, 2021 | 6:50 PM
Share

मुंबई : अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओची ओरिजिनल वेब सीरीज ‘द फॅमिली मॅन’ने प्रेक्षकांच्या मनात अशी काही छाप सोडली की, लोक आता त्याच्या दुसर्‍या सत्राची आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रेक्षकांचा तोच उत्साह आणि प्रेम पाहून निर्मात्यांनी मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) अभिनीत सीरीज ‘द फॅमिली मॅन’ चा दुसरा सीझन जाहीर (The Family Man 2) केला, जो फेब्रुवारी 2021 मध्ये रिलीज होणार होता. पण, काही कारणास्तव तो ठरल्या वेळेत रिलीज होऊ शकला नाही (The Family Man 2 release date, time, cast, controversy all details here).

मात्र, आता मनोज बाजपेयी आणि समांथा अक्किनेनी अभिनित ही वेब सीरीज शुक्रवार, 4 जून 2021 रोजी रिलीज होणार आहे. मध्यरात्री म्हणजेच 12 वाजता अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर हा शो पाहता येणार आहे.

कुठे पाहाल?

‘द फॅमिली मॅन 2’ अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर रिलीज होत आहे. ही अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओची ओरिजिनल वेब सीरीज आहे. अशा परिस्थितीत, ती ऑनलाईन पाहण्याकरिता प्रथम आपल्याला अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओ अॅप डाऊनलोड करावे लागेल. यासह, प्राईम व्हिडीओ सबस्क्रिप्शन देखील घ्यावे लागेल. या सबस्क्रिप्शनसाठी आपल्याला 999 रुपये द्यावे लागेल. त्याची वैधता 1 वर्षांची आहे.

कलाकार कोण?

‘द फॅमिली मॅन 2’मध्ये मनोज बाजपेयी सिनिअर एजंट आणि विश्लेषक ‘श्रीकांत तिवारी’ यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्याच्याबरोबर अभिनेत्री समांथा अक्किनेनी दहशतवादी ‘राजलक्ष्मी’च्या भूमिकेत दिसणार आहे. या शोमध्ये अभिनेत्री प्रियामणि श्रीकांत तिवारी यांची पत्नी ‘सुचित्रा अय्यर तिवारी’ची भूमिका साकारली आहे. याशिवाय शोमध्ये शरिब हाश्मी ‘जेके तळपदे’ची भूमिका साकारत आहे. या मालिकेत दिवंगत अभिनेता असिफ बसरा समुपदेशकाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर, सीमा बिस्वास ‘पीएम बासू’च्या भूमिकेत दिसणार आहेत (The Family Man 2 release date, time, cast, controversy all details here).

काय आहे ‘द फॅमिली मॅन 2’ची कथा?

राज आणि डीके यांनीच ‘द फॅमिली मॅन 2’ चेही दिग्दर्शन केले आहे. यावेळी पुन्हा ‘श्रीकांत तिवारी’ कथेच्या मध्यभागी आहे. तो एनआयएची नोकरी सोडून एक साधी नोकरी करत आपले आयुष्य जगतोय. पण त्याचे मन मात्र अजूनही एनआयएमध्येच अडकले आहे. घरात त्याचे त्याच्या पत्नीबरोबरचे संबंध चांगले नाहीत, म्हणून ‘फॅमिली मॅन’ प्रमाणेच तो हे संबंध सुधारण्याचा प्रयत्न करताना दिसेल. परंतु यादरम्यान, देशाच्या दक्षिण भागात अतिशय शक्तिशाली आणि धोकादायक दहशतवाद्यांचा प्रभाव वाढत आहे. या तमिळ भाषिक संघटनेत राजी म्हणजेच ‘राजलक्ष्मी’ ही या दहशतवादी कारवाया करत आहेत. श्रीकांत तिवारी हे थांबवण्यासाठी एनआयएमध्ये परत आले आणि याची कथादेखील त्यासोबत पुढे सरकली.

‘द फॅमिली मॅन 2’बद्दल वाद का?

देशातील तामिळ भाषिक लोकांचा एक वर्ग ‘द फॅमिली मॅन 2’ च्या कथेवर संतापला आहे. त्यांचा असा आरोप आहे की, ही वेब सीरीज हिंदी भाषिक लोकांना लक्षात ठेवून तयार केली गेली आहे आणि यात तमिळ लोकांना दहशतवादी म्हणून दाखवले गेले आहे. यामुळे तमिळ भाषिकांची प्रतिमा मलीन होत आहे. म्हणूनच या मालिकेवर बंदी घालण्याची मागणीही लोकांनी केली होती. बर्‍याच तमिळ राजकीय पक्षांनीही वेब सीरीजला विरोध दर्शवला आहे (The Family Man 2 release date, time, cast, controversy all details here).

समांथाही झाली ट्रोल!

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा अक्किनेनी या वेब सीरीजच्या माध्यमातून डिजिटल प्लॅटफॉर्मवर डेब्यू करत आहे. यासह हा समांथाचा पहिला हिंदी प्रोजेक्ट आहे. यामध्ये ती एक दहशतवादी साकारते आहे. तर, तमिळ भाषिक लोकांना असे वाटत होते की, समांथाने ही सीरीज करू नये. इतक्या विरोधानंतरही समांथाने यात काम केल्यामुळे तिला ट्रोल देखील केले गेले. ट्विटरवर #ShameOnYouSamantha देखील ट्रेंड झाला होता.

मेकर्सच्या भावना…

‘द फॅमिली मॅन 2’ रिलीज व्हायला आता काही तासांचा अवधी उरला आहे. अशावेळी या सीरीजच्या निर्मात्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. याबद्दल बोलताना राज आणि डीके म्हणाले, ‘प्रत्येक चित्रपटाच्या निर्मात्याकडे प्रत्येक प्रोजेक्टच्या शेवटी एक कहाणी असते. आमच्यासाठी, फॅमिली मॅन सीझन 2 आतापर्यंतचा आमचा सर्वात आव्हानात्मक प्रकल्प असल्याचे सिद्ध झाले आहे. हा आपल्या सर्वांसाठी कठीण काळ आहे. आपल्यात असे कोणीही नाही की, ज्यांना याकाळात त्रास सहन करावा लागला नसेल. गमवलेल्या सहकाऱ्यांबद्दल शोक व्यक्त करत असतानच, फ्रंटलाईन वर्कर्स आणि प्रत्येकाला साहाय्य करण्यासाठी अथक परिश्रम घेतलेल्या प्रत्येकाच्या वीरता आणि धैर्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.

आमच्यासाठी देखील या काळात  सकारात्मक आणि आशावादी राहणे कदाचित सर्वात कठीण झाले होते. म मात्र, या सगळ्यात आपल्या सर्वांकडून प्राप्त होत असलेले प्रेम आणि कौतुक याने मला धीर दिला आहे. या साथीच्या आजारात आणि दोन लॉकडाऊनमध्ये आम्ही काम केले आहे. म्हणूनच आम्ही आमचे कलाकार, क्रू मेंबर आणि प्राईम व्हिडीओ कार्यसंघाचे ऋणी आहोत, ज्यांनी ही जबाबदारी यशस्वीपणे पेलली. ‘द फॅमिली मॅन 2’ आज मध्यरात्री तुमच्या भेटीला येतो आहे. तुमच्या प्रेमासाठी खूप खूप आभार!’

(The Family Man 2 release date, time, cast, controversy all details here)

हेही वाचा :

Must Watch Netflix Show | ‘फ्रेंड्स रियुनियन’ ते ‘ल्युसिफर’, नेटफ्लिक्सचे ‘हे’ वेब शो एकदा आवर्जून बघाच!

Samantha Akkineni : ‘द फॅमिली मॅन’मधील सामंथा अक्किनेनीचा दमदार अभिनय पाहण्याआधी जाणून घ्या ‘या’ गोष्टी!

नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.