Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘पद्मावत’ची ही अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकणार लग्नबंधनात? 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्याला करतेय डेट

सध्या लग्नाचा सिझनच आहे आणि त्यामुळे सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकजण आपल्या आयुष्याची नवी सुरुवात करत आहेत. गेल्या वर्षाच्या अखेरीस बॉलिवूडमधल्या काही सेलिब्रिटींनी लग्नगाठ बांधली. आता नवीन वर्षाच्या सुरुवातीला 'पद्मावत' फेम अभिनेत्रीच्या लग्नाची चर्चा सुरू आहे.

'पद्मावत'ची ही अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकणार लग्नबंधनात? 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्याला करतेय डेट
Aditi Rao HydariImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 03, 2024 | 10:40 AM

मुंबई : 3 जानेवारी 2024 | 2023 हे वर्ष सरता सरता अनेक सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकले. आता नवीन वर्षाच्या सुरुवातीलाही बरेच सेलिब्रिटी आपल्या आयुष्याची एक नवीन सुरुवात करणार आहेत. एकीकडे आमिर खानची मुलगी आयरा खानच्या लग्नाची धूम पहायला मिळतेय. तर दुसरीकडे बॉलिवूडमधल्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या दुसऱ्या लग्नाची चर्चा रंगली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला अभिनेत्री अदिती राव हैदरीने तिच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे. अदिती राव हैदरी ही गेल्या काही काळापासून ‘रंग दे बसंती’ फेम अभिनेता सिद्धार्थला डेट करतेय. नुकताच तिने सोशल मीडियावर सिद्धार्थसोबतचा रोमँटिक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये दोघांमधील जवळीकता स्पष्ट दिसून येतेय.

अदिती आणि सिद्धार्थच्या या फोटोवर चाहत्यांकडूनही प्रेमाचा वर्षाव होतोय. या दोघांनी आधी एकमेकांच्या वाढदिवसानिमित्त फोटो पोस्ट केले होते. मात्र डेटिंगविषयी त्यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. आता नवीन वर्षात अदितीने सिद्धार्थसोबतचा रोमँटिक फोटो पोस्ट करून रिलेशनशिपचा स्पष्ट इशारा दिला आहे. त्यामुळे लवकरच हे दोघं आयुष्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात करतील की काय, असाही प्रश्न अनेकांना पडला आहे. सिद्धार्थ हा अदितीपेक्षा सात वर्षांनी मोठा आहे. अदिती आता 37 वर्षांची आहे तर सिद्धार्थ 44 वर्षांचा आहे.

हे सुद्धा वाचा

अदिती आणि सिद्धार्थचं पहिलं लग्न अयशस्वी ठरलं. सिद्धार्थने 2003 मध्ये लग्न केलं होतं. मात्र हे लग्न फार काळ टिकलं नाही. 2007 मध्ये त्याने घटस्फोट घेतला. तर अदितीचं पहिलं लग्न सत्यदीप नावाच्या व्यक्तीशी झालं होतं. दोघांनी लग्नाची बातमी उघड केली नव्हती. मात्र घटस्फोटानंतर दोघांचं नातं सर्वांसमोर आलं होतं. 2021 मध्ये ‘महा समुद्रम’ या चित्रपटाच्या सेटवर अदिती आणि सिद्धार्थ एकमेकांच्या प्रेमात पडले. गेल्या वर्षी अदितीच्या 36 व्या वाढदिवशी, सिद्धार्थने तिच्यासोबतचा खास फोटो पोस्ट करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. ‘हृदयाच्या राजकुमारीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझे सर्व लहान, मोठे आणि न पाहिलेली स्वप्नंसुद्धा पूर्ण होवोत’, अशी पोस्ट त्याने लिहिली होती. सिद्धार्थचं नाव याआधी बऱ्याच अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होतं. समंथा रुथ प्रभू, सोहा अली खान आणि श्रुती हासन यांचंसुद्धा सिद्धार्थसोबत नाव जोडलं गेलं होतं.

मला टोप्या नका घालू, नुसता प्रेमाचा नमस्कार.., दादांचं मिश्कील वक्तव्य
मला टोप्या नका घालू, नुसता प्रेमाचा नमस्कार.., दादांचं मिश्कील वक्तव्य.
"औरंगजेब इथं गाडलाय...", राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर मनसेकडून बॅनरबाजी
चंद्राबाबू नायडूंचा वक्फ बोर्डाला पाठिंबा, पण घातली ही मोठी अट
चंद्राबाबू नायडूंचा वक्फ बोर्डाला पाठिंबा, पण घातली ही मोठी अट.
राज्यात अवकाळी पावसाचा कहर, 'या' जिल्ह्यांना IMD कडून अलर्ट?
राज्यात अवकाळी पावसाचा कहर, 'या' जिल्ह्यांना IMD कडून अलर्ट?.
पंकजा मुंडे यांच्या फाईली धनुभाऊंनीच नेल्या अंजली दमानियांच्या दारी?
पंकजा मुंडे यांच्या फाईली धनुभाऊंनीच नेल्या अंजली दमानियांच्या दारी?.
'त्यांना सांगायचं दादांना...', अजित पवार एसपी कॉवत यांच्यावर संतापले
'त्यांना सांगायचं दादांना...', अजित पवार एसपी कॉवत यांच्यावर संतापले.
कळंबच्या त्या महिलेच्या हत्येनंतर 'तो' दोन दिवस मृतदेहासोबत झोपला अन्
कळंबच्या त्या महिलेच्या हत्येनंतर 'तो' दोन दिवस मृतदेहासोबत झोपला अन्.
आधे इधर, आधे उधर... बीडमध्ये वाल्मिक कराडवर मेहरनजर?
आधे इधर, आधे उधर... बीडमध्ये वाल्मिक कराडवर मेहरनजर?.
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.