AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kangana Ranaut | ‘स्वतःच्या एक्स-बॉयफ्रेंडवर…’, ‘या’ अभिनेत्रीने सर्वांसमोर साधला कंगना रनौत हिच्यावर निशाणा

Kangana Ranaut | कंगनाच्या एक्स-बॉयफ्रेंडबद्दल असं का म्हणाली 'ही' अभिनेत्री? भेटल्यानंतर कानशिलात लगावणार असल्याची देखील कंगना हिला दिली धमकी... सध्या सर्वत्र कंगना रनौत हिची चर्चा...

Kangana Ranaut | 'स्वतःच्या एक्स-बॉयफ्रेंडवर...', 'या' अभिनेत्रीने सर्वांसमोर साधला कंगना रनौत हिच्यावर निशाणा
कंगना रनौत
| Updated on: Sep 06, 2023 | 8:41 AM
Share

मुंबई : 6 सप्टेंबर 2023 | अभिनेत्री कंगना रनौत हिच्यावर टीका करणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. तर कंगना देखील कायम अनेक सेलिब्रिटींवर निशाणा साधत असते. आता देखील कंगना हिच्यावर एका अभिनेत्रीने टीका केली आहे. पण आता कंगना हिचा विरोध करणारी अभिनेत्री बॉलिवूडमधील नसून पाकिस्तान येथील आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे पाकिस्तानी अभिनेत्रीने भेटल्यानंतर कंगना रनौत हिच्या कानशिलात लगावेल अशी इच्छा देखील व्यक्त केली आहे. कंगना हिच्यावर निशाणा साधणारी पाकिस्तानी अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री नौशीन शहा आहे. सध्या सर्वत्र नौशीन हिच्या वक्तव्याची चर्चा रंगत आहे.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत नौशीन हिने कंगना रनौत हिला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. पुढे शोच्या होस्ट यामागचं कारण विचारलं… यावर नौशीन म्हणाली, ‘कंगना एक अशी महिला आहे जिला मला भेटायचं आहे. ती भेटल्यानंतर पहिल्यांदा मी तिच्या कानशिलात लगावेल…’

पुढे नौशीन म्हणाली, ‘कंगना ज्याप्रमाणे माझ्या देशाबद्दल काहीही बोलत असते. देशाच्या सैनिकांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करत असते. तिच्या हिंमतीला सलाम… शुन्य ज्ञान आहे तिच्याकडे, पण दुसऱ्यांच्या देशाबद्दल काहीही बोलत असते… तिने स्वतःच्या देशावर लक्ष दिलं पाहिजे…’

‘स्वतःच्या सिनेमांकडे कंगनाने लक्ष केंद्रीत केलं पाहिजे. वाद आणि एक्स-बॉयफ्रेंडवर लक्ष दे… मला या अभिनेत्रीला भेटून विचारायचं आहे की, तुला आमच्या देशाबद्दल आणि आमच्या सैन्याबद्दल कसं काय माहिती आहे…’ सध्या सर्वत्र नौशीन शाह हिच्या वक्तव्याची चर्चा रंगत आहे.

नौशीन शाह पाकिस्तानातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ‘पाणी जैसा प्यार’, ‘दुआ और हम’, ‘टीव्ही की रिहाई यांसारख्या मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. शिवाय नौशीन शाह एक प्रसिद्ध मॅडेल देखील आहे. सोशल मीडियावर देखील नौशीन शाह हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

कंगना रनौत हिचे आगामी सिनेमे

कंगना सध्या तिच्या आगामी सिनेमांमुळे चर्चेत आहेत. कंगना ‘इमर्जन्सी’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात अभिनेत्री देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे. सिनेमाचं दिग्दर्शन स्वतः कंगना रनौत हिने केलं आहे. सिनेमात कंगना हिच्यासोबत, अनुपम खेर, महिमा चौधरी, विशाल नायर आणि श्रेयस तळपदे यांच्या महत्त्वची भूमिका असणार आहे.

‘इमर्जन्सी’ सिनेमासोबत कंगना ‘तेजस’ सिनेमाच्या माध्यमातून देखील चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. तर अभिनेत्रीचा ‘चंद्रमुखी २’ सिनेमा तुफान चर्चेत आहे. सोशल मीडियावर देखील कंगना हिच्या आगामी सिनेमांच्या चर्चा रंगत आहेत.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.