‘आता सीरियल पाहणारच नाही…’, प्रसिद्ध मालिकेतील पती-पत्नीच्या ‘त्या’ सीनवर नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त
प्रसिद्ध मालिकेतील पती-पत्नीमधील 'तो' सीन पाहिल्यानंतर प्रेक्षक भडकले... सीन पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केला संताप...
मुंबई : ‘तेरे बिन’ या पाकिस्तानी मालिकेची लोकप्रियता भारतात देखील मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे. मालिकेत अभिनेत्री युमना जैदी हिने ‘मीरब’ या भूमिकेला न्याय दिला आहे तर, अभिनेता वहाज अली याने ‘मुर्तसिम’ या भूमिकेला न्याय दिला आहे… दोघांच्या दमदार अभिनयाने चाहत्यांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे… मालिकेची कथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. पण मालिकेतील एका एपिसोडमध्ये असं काही दाखवण्यात आलं ज्यामुळे सोशल मीडियावर नेटकरी संताप व्यक्त करत आहे. मालिकेचे निर्माते आणि वहाज याच्या भूमिकेवर चाहते भडकले आहेत. सध्या सर्वत्र पाकिस्तानी मालिका ‘तेरे बिन’ची चर्चा रंगत आहे…
१८ मे रोजी ‘तेरे बिन’ मालिकेचा १४ वा एपिसोड यूट्यूबवर प्रदर्शित झाला. मालिकेत नक्की काय झालं हे जाणून घेण्याआधी मालिकेबद्दल जाणून घेवू… मीरब अशा कुटुंबात वाढली आहे, जेथे तिला आई-वडिलांचं भरभरुन प्रेम मिळालं. आई – वडिलांच्या घरी मरीब हिला स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पूर्ण स्वातंत्र आहे… पण मीरबच्या आयुष्यात चढ – उतार येतात जेव्हा तिचं लग्न मुर्कसिम याच्यासोबत होतं…
मीरब आणि मुर्तसिम एकमेकांना आवडत नसतात पण जेव्हा दोघे एकमेकांना ओळखू लागतात तेव्हा मीरब आणि मुर्तसिम यांच्यातील नातं घट्ट होतं. ऑनस्क्रिन दोघांची केमिस्ट्री देखील चाहत्यांना अवडते. मीरब आणि मुर्तसिम यांच्यातील नातं अधिक घट्ट व्हावं अशी चाहत्यांची इच्छा आहे… पण मालिकेत काही उलटंच घडतं.
Never thought I’d feel so disturbed watching these two in one frame.TereBin pic.twitter.com/UGpheUonvg
— ιηѕн ˢⁱᵈ (@hey_its_Insha_) May 18, 2023
पण शोचा आगामी प्रोमो पाहून चाहते हैराण झाले आहेत… प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं आहे की, मरीब बेडच्या बाजूला बसली आहे आणि तिची अवस्था काही ठिक नाही. एवढंच नाही तर, मुर्तसिम देखील त्याने केलेल्या कृत्यामुळे हैराण असल्याचं मालिकेत दाखवण्यात आलं आहे… मीरब आणि मुर्तसिम यांच्यामध्ये झालेल्या भांडणाचं कारण एक महिला आहे. तिचे नाव हया (सबीना फारूक) आहे…
शोचा एपिसोड पाहिल्यानंतर चाहते नाराज झाले आहेत. ‘मुर्तसिम याच्या भूमिकेला गालबोट लावलं असल्याचं…’ नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. दोघांमधील वादग्रस्त सीन पाहिल्यानंतर नेटकरी हैराण झाले आहेत. सोशल मीडियावर भावना व्यक्त करत नेटकरी संताप व्यक्त करत आहेत. एवढंच नाही तर ‘आता सीरियल पाहणारच नाही…’ अशं देखील नेटकरी म्हणाले आहेत.
सध्या ‘तेरे बिन’ मालिकेची चर्चा सर्वत्र तुफान रंगत आहे. मालिका यूट्यूब चॅनल ‘हर पल जियो’ वर बुधवार आणि गुरुवार रात्री 9 वाजता प्रसारित होते.. मालिकेच्या नुकताच प्रसारित झालेला एपिसोड यूट्यूब चॅनलवर १२ मिलियन लोकांनी पाहिला आहे. सध्या ‘तेरे बिन’ मालिका सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे.