AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रसिद्ध टिकटॉकरचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक; ‘या’ कारणामुळे मैत्रिणींनीच लीक केला बाथरुम Video

हरीम ही पाकिस्तानी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. टिकटॉकवर ती जास्त प्रसिद्ध आहे. 2019 मध्ये पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयातून तिने स्वत:चा व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यानंतर ती प्रकाशझोतात आली.

प्रसिद्ध टिकटॉकरचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक; 'या' कारणामुळे मैत्रिणींनीच लीक केला बाथरुम Video
Hareem ShahImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 03, 2023 | 3:05 PM
Share

लाहौर : पाकिस्तानातील प्रसिद्ध टिकटॉकर हरीम शाह पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. हरीमचा प्रायव्हेट व्हिडीओ ऑनलाइन लीक करण्यात आला आहे. 1 मार्च रोजी सोशल मीडियावर तिचा न्यूड व्हिडीओ लीक करण्यात आला. संदल खट्टक आणि आयेशा नाझ या दोघी मैत्रिणींनीच प्रायव्हेट व्हिडीओ लीक केल्याचा आरोप हरीमने केला आहे. मैत्रिणींसोबत झालेल्या वादानंतर त्यांनी ईर्ष्येमुळे हे पाऊल उचललं, असं ती म्हणाली. हरीमचा अंघोळ करतानाचा आणि एका व्यक्तीसोबत इंटिमेट होतानाचा हा व्हिडीओ ऑनलाइन लीक झाल्यानंतर ती चर्चेत आली आहे.

“माझ्या दोघी मैत्रिणींनी मला तो व्हिडीओ लीक करण्याची धमकी दिली होती. माझा पती बिलाल शाह याच्यासोबत भांडण लावण्यासाठी त्यांनी हे कृत्य केलं. आयेशा नाझविरोधात मी फेडरल इन्वेस्टिगेशन एजन्सीमध्ये तक्रार दाखल केली आहे. एफआयएनं तिच्याविरोधात कारवाई केली नाही, मात्र माझा संशय दाट आहे. आयेशाने माझ्या इतरही मैत्रिणींना याबाबत सांगितलं होतं की ती माझे व्हिडीओ लीक करणार आहे. पण मला त्या व्हिडीओची काही पर्वा नाही”, असं हरीम म्हणाली.

काही महिन्यांपूर्वीच हरीम शाहने बिलाल शाह यांच्याशी निकाह केला होता. बिलालने तिच्या प्रायव्हेट व्हिडीओ लीकप्रकरणी कायदेशीर कारवाई करणार असल्याची प्रतिक्रिया दिली.

कोण आहे हरीम शाह?

हरीम ही पाकिस्तानी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. टिकटॉकवर ती जास्त प्रसिद्ध आहे. 2019 मध्ये पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयातून तिने स्वत:चा व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यानंतर ती प्रकाशझोतात आली. सरकारी कार्यालयात तिला प्रवेश कसा मिळाला याविषयी पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान यांनी चौकशीचे आदेश दिले होते.

गेल्या काही वर्षांत हरीम विविध वादामुळे सतत चर्चेत आली होती. पाकिस्तानचे माजी गृहमंत्री शेख रशीद यांच्याबद्दल केलेल्या टिप्पणीमुळे तिच्यावर जोरदार टीका झाली होती. त्यांच्यासोबतच्या संभाषणाचा एक व्हिडीओ लीक झाला होता आणि या व्हिडीओने सोशल मीडियावर अनेकांचं लक्ष वेधलं होतं.

डिसेंबर 2019 मध्ये दुबईतील एका मॉलमध्ये उद्घाटन समारंभात तिचं शोषण झाल्याची तक्रार हरीमने केली होती. तर जानेवारी 2021 मध्ये तिने मुफ्ती कवी यांना अभद्र संभाषणावरून कानाखाली मारली होती. मुफ्ती कवी हे पाकिस्तानातील राजकीय क्षेत्रातील एक वादग्रस्त व्यक्तीमत्त्व आहे. मुफ्ती यांनी तिचा आणि तिच्या चुलत भावाचा शारीरिक छळ केला, असा आरोप हरीमने केला होता. मार्च 2021 मध्ये तिने तिच्या एका मित्राविरोधात हत्येचा प्रयत्न आणि शारीरिक छळ केल्याप्रकरणी एफआयआर दाखल केली होती.

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.