Palak Tiwari | आई श्वेता तिवारीच्या प्रेग्नंसीबद्दल कळताच अशी होती पलकची प्रतिक्रिया; म्हणाली “मला ते नकोच होतं”

आपल्या कुटुंबात चिमुकलं बाळ येणार हे पहिल्यांदा समजल्यावर पलक खुश नव्हती. मात्र आता तिच्या लहान भावासोबत तिचं खूप चांगलं नातं आहे. पलक एका आईप्रमाणेच तिच्या भावाची काळजी घेताना दिसते. रेयांश असं तिच्या भावाचं नाव आहे.

Palak Tiwari | आई श्वेता तिवारीच्या प्रेग्नंसीबद्दल कळताच अशी होती पलकची प्रतिक्रिया; म्हणाली मला ते नकोच होतं
Palak Tiwari and Shweta Tiwari Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 04, 2023 | 11:30 AM

मुंबई : टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी हिने नुकतंच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात तिने भूमिका साकारली आहे. पलकची आई श्वेता तिवारी हे टीव्ही इंडस्ट्रीतील मोठं नाव आहे. श्वेता तिच्या मालिकांसोबतच खासगी आयुष्यामुळे सर्वाधिक चर्चेत राहिली. श्वेताने दोनदा लग्न केलं. अभिनेता राजा चौधरीशी तिचं पहिलं लग्न झालं. याच लग्नातून तिला पलक ही मुलगी झाली. त्यानंतर दुसऱ्या लग्नातून श्वेताला एक मुलगा आहे. पलक जेव्हा 15 वर्षांची होती, तेव्हा श्वेता दुसऱ्यांदा गरोदर होती. आईने गरोदर असल्याचं सांगितलं तेव्हा पलकची पहिली प्रतिक्रिया काय होती, याविषयी ती नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत व्यक्त झाली.

पलक तिवारीची पहिली प्रतिक्रिया

श्वेताने जेव्हा पलकला गरोदर असल्याचं सांगितलं तेव्हा तिला आश्चर्याचा धक्काच बसला होता. “असं होऊ शकत नाही”, असं ती आईला म्हणाली. फिल्म कम्पॅनियनला दिलेल्या मुलाखतीत ती पुढे म्हणाली, “मला अजूनही आठवतंय तेव्हा वयाच्या 15 व्या वर्षी मला खूप मोठा धक्का बसला होता. आमच्या कुटुंबात आणखी एक बाळ येणार हे समजल्यावर मी हैराण झाले. जणू माझा आणि आईचा काहीतरी करार होता आणि तो करार तिने मोडला, असं मला वाटलं होतं.”

हे सुद्धा वाचा

पलकची प्रतिक्रिया पाहून श्वेतालाही धक्का बसला. पलक नेमकं काय म्हणतेय हे तिलाही समजत नव्हतं. “मी कुटुंबात एका नव्या सदस्याचं स्वागत करण्यासाठी तयारच नव्हते. मी नेमकं काय म्हणतेय हे मम्मीलाही कळत नव्हतं. मला या गोष्टीची आधीच कल्पना का दिली गेली नाही, असा सवाल मी तिला करत होते. कारण त्या गोष्टीसाठी मी तयारच नव्हते. हे माझ्या कॉन्ट्रॅक्टमध्ये नव्हतं, असं मी सतत मम्मीला बोलत होते. त्यावर ती म्हणाली की प्लीज ओव्हर-रिॲक्ट करू नकोस”, असं पलकने सांगितलं.

आपल्या कुटुंबात चिमुकलं बाळ येणार हे पहिल्यांदा समजल्यावर पलक खुश नव्हती. मात्र आता तिच्या लहान भावासोबत तिचं खूप चांगलं नातं आहे. पलक एका आईप्रमाणेच तिच्या भावाची काळजी घेताना दिसते. रेयांश असं तिच्या भावाचं नाव आहे. श्वेताने दुसरं लग्न अभिनव कोहलीशी केलं होतं. रेयांश हा अभिनव आणि श्वेताचा मुलगा आहे. श्वेता दुसऱ्या पतीपासून विभक्त झाल्यानंतर रेयांशचं संगोपन तिच करतेय.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.