Pankaj Tripathi | पंकज त्रिपाठी यांच्यावर कोसळला दु:खाचा डोंगर; वडिलांनी घेतला अखेरचा श्वास

पंकज त्रिपाठी यांचे वडील पंडीत बनारस तिवारी यांचं निधन झालं आहे. ते 98 वर्षांचे होते. त्यांनी गावी अखेरचा श्वास घेतला. वडिलांच्या अखेरच्या क्षणी पंकज त्रिपाठी त्यांच्यासोबत नव्हते. त्यांचं गाव बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यात असून आई-वडील बेलसंड नावाच्या गावी राहायचे.

Pankaj Tripathi | पंकज त्रिपाठी यांच्यावर कोसळला दु:खाचा डोंगर; वडिलांनी घेतला अखेरचा श्वास
Pankaj TripathiImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Aug 21, 2023 | 3:18 PM

मुंबई | 21 ऑगस्ट 2023 : ‘ओह माय गॉड 2’ या चित्रपटाच्या यशामुळे सध्या चर्चेत असलेले अभिनेते पंकज त्रिपाठी यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पंकज त्रिपाठी यांचे वडील पंडीत बनारस तिवारी यांचं निधन झालं आहे. ते 98 वर्षांचे होते. त्यांनी गावी अखेरचा श्वास घेतला. वडिलांच्या अखेरच्या क्षणी पंकज त्रिपाठी त्यांच्यासोबत नव्हते. त्यांचं गाव बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यात असून आई-वडील बेलसंड नावाच्या गावी राहायचे. पंकज त्रिपाठी हे याच गावी लहानाचे मोठे झाले. बेलसंड गावी त्यांच्या वडिलांनी अखेरचा श्वास घेतला आहे. वडिलांच्या निधनाचं वृत्त कळताच पंकज त्रिपाठी त्यांच्या गावी रवाना झाले आहेत.

पंकज त्रिपाठी यांची वडिलांशी फार जवळीक होती. ते मुंबईत कामासाठी स्थायिक झाले असले तरी आईवडिलांची भेट घेण्यासाठी ते सतत गावी जायचे. गावी गेल्यावर ते आवर्जून वडिलांसोबत वेळ घालवायचे. सोशल मीडियावरील पोस्टद्वारे किंवा विविध मुलाखतींमध्येही ते अनेकदा त्यांच्या आयुष्यातील आईवडिलांच्या योगदानाबद्दल व्यक्त व्हायचे. “जर माझ्या पालकांनी माझ्या निर्णयांचा आदर केला नसता तर आज मी इथे नसतो”, असं ते नेहमी म्हणतात.

हे सुद्धा वाचा

“माझे वडील इतके भोळे आहेत की त्यांना थिएटर आणि अभिनय याविषयी काहीच माहीत नाही. मी जेव्हा मुंबईत स्थायिक झालो आणि माझे वडील मला भेटायला इथे आले, तेव्हा उंच-उंच इमारती आणि गर्दी पाहून ते घाबरले. त्यांना इथलं राहणीमान अजिबात आवडलं नव्हतं. मुंबईहून गावी गेल्यानंतर ते पुन्हा कधीच इथे परतले नाहीत”, असं पंकज त्रिपाठी यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.

पंकज त्रिपाठी यांचा ‘ओह माय गॉड 2’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षक-समिक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. यातील पंकज त्रिपाठी यांच्या अभिनयाचं जोरदार कौतुक होत आहे. चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत असताना दुसरीकडे पंकज त्रिपाठी यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.