‘परदेशात भारताची प्रतिष्ठा…’, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल असं काय म्हणाली महिमा चौधरी?

अभिनेत्री महिमा चौधरी आता बॉलिवूडपासून दूर असली तरी, कोणत्या न कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असते.... नुकताच अभिनेत्रीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, परदेशात असलेली भारताची प्रतिष्ठा... तरुणांची मोदींकडून असलेली अपेक्षा यावर मोठं वक्तव्य केलं आहे.

'परदेशात भारताची प्रतिष्ठा...', पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल असं काय म्हणाली महिमा चौधरी?
Follow us
| Updated on: Mar 18, 2024 | 8:16 AM

मुंबई | 18 मार्च 2024 : अभिनेता शाहरुख खान स्टारर ‘परदेस’ सिनेमातील अभिनेत्री महिमा चौधरी हिने नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं. शिवाय जनतेने कोणाला मत द्यायला हवं याबद्दल देखील महिमाने स्वतःची भूमिका स्पष्ट केली आहे. अभिनेत्री म्हणाली, ‘तुम्हाला निर्णय घ्यायला हवाय. शेवट पर्यंत प्रतीक्षा करायला नको. देश प्रगतीच्या मार्गावर आहे. त्यामुळे कोणाला मत द्यायला हवं… तुम्ही ठरवा…’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक करत अभिनेत्री म्हणाली, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाती प्रतिष्ठा वाढवली आहे. सन्मान वाढवला आहे. पूर्वी आंतरराष्ट्रीय स्तरावर काही घडलं की लोक अमेरिकेकडे बघायचे, पण आता प्रत्येकाची नजर भारताकडे असते. देश आर्थिकदृष्ट्या मजबूत होत आहे, देशातील तरुणांना मोदींकडून अपेक्षा आहेत.’

‘इतर देशांमध्ये सतत वाद सुरु आहे. शेजारच्या राष्ट्रांसोबत अनेक देशांचे वाद सुरु आहेत. पण भारतात आणि शांतीने स्वतःचं काम करत आहोत. ही फार मोठी गोष्ट आहेत… या गोष्टीचं श्रेय फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी यांना जातं. त्यांना पाहिल्यानंतर लोकांना प्रेरणा मिळत आहे. ते कुठून आले आणि आता कुठे पोहोचले आहेत…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

मोदी 24 तास करतात काम

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी देश चालवत आहेत. 24 तास काम करत आहेत. ते थकत नाहीत. त्यांना किती अडचणी येत असतील. मी माझं घर चालवते तर थकून जाते. मी खूप प्रवास करते. अनेक ठिकाणी छोट्या – मोठ्या कार्यक्रमांसाठी जाते.’ एवढंच नाहीतर, महिमाने ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’ योजनेबद्दल देखील वक्तव्य केलं. मोदी यांच्या एका नाऱ्यांना लोकांना विचार करण्यासाठी प्रवृत्त केलं आहे. विशेषतः छोट्या शहरांमध्ये…’

महिमा चौधरी…

महिमा चौधरी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, ‘परदेश’ सिनेमात झळकल्यामुळे अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीमध्ये मोठी वाढ झाली. महिनाने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची  भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आता अभिनेत्री बॉलिवूडपासून दूर असली तरी, कोणत्या न कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असते. महिमा हिला बॉलिवूडमध्ये यश मिळालं पण खासगी आयुष्यात अभिनेत्रीला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. आता अभिनेत्री मुलीचा ‘सिंगल मदर’ म्हणून सांभाळ करत आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.