Parineeti – Raghav | सिंदूर, हातात चुडा… लग्नानंतर परिणीती चोप्राचा पहिला फोटो समोर

Parineeti - Raghav | साध्या लूकमध्ये देखील नवरी म्हणून प्रचंड सुंदर दिसतेय परिणीती चोप्रा... सिंदूर आणि हातातील चुड्यामुळे वाढलं अभिनेत्रीचं सौंदर्य... परिणीती - राघव अडकले विवाहबंधनात... सोशल मीडियावर परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचे फोटो होत आहेत व्हायरल... सर्वत्र दोघांच्या फोटोंची चर्चा...

Parineeti - Raghav | सिंदूर, हातात चुडा... लग्नानंतर परिणीती चोप्राचा पहिला फोटो समोर
Follow us
| Updated on: Sep 25, 2023 | 7:41 AM

मुंबई : 25 सप्टेंबर 2023 | २४ सप्टेंबर २०२२३ हा दिवस अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि APP पक्षाचे नेते राघव चड्ढा यांच्यासाठी प्रचंड खास असणार आहे. कारण याच दिवशी दोघे विवाहबंधनात अडकले.. गेल्या अनेक दिवसांपासून परिणीती – राघव यांच्या नात्याची चर्चा सुरु होती. दोघांना एकत्र हॉटेलमध्ये स्पॉट केल्यानंतर त्यांच्या नात्याची चर्चा रंगू लागली. पण तेव्हा दोघांनी देखील त्यांच्या नात्याबद्दल काहीही सांगितलं नाही. अखेर साखरपुड्यानंतर परिणीती – राघव यांच्या त्यांच्या नात्याचा स्वीकार सर्वांसमोर केला. दोघांचा साखरपुडा देखील मोठ्या थाटात असून, उदयपूर याठिकाणी परिणीती – राघव विवाहबंधनात अडकले. आता त्यांच्या लग्नाचे फोटो देखील समोर आले आहेत.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त परिणीती – राघव यांच्या लग्नाच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. सध्या समोर आलेला फोटो परिणीती – राघव यांच्या रिसेप्शन पार्टीचा असल्याचं सांगण्यात येत आहे. फोटोमध्ये परिणीती हिच्या हातावर मेंहदी दिसत आहे. अभिनेत्रीच्या हातात असलेल्या चुड्यामुळे अभिनेत्रीचं सौंदर्य अधिक वाढलं आहे.

हे सुद्धा वाचा

गुलाबी रंगाच्या साडीत परिणीती हिचं सौंदर्य फुलून दिसत आहे. तर ब्लॅक ऍन्ड व्हाईट थ्री पीसमध्ये राघव चड्ढा देखील रुबाबदार दिसत आहेत. चाहत्यांना देखील परिणीती – राघव याच्या लूक प्रचंड आवडला आहे. सध्या लूकमध्ये देखील परिणीती हिचं सौंदर्य फुलून दिसत आहे. चाहते दोघांच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

परिणीती – राघव यांच्या लग्नानंतरत्या पहिल्या फोटोवर चाहते कमेंटच्या माध्यमातून नव्या जोडप्याला नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत. सोशल मीडियावर सर्वत्र दोघांच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. दरम्यान, परिणीती – राघव यांच्या लग्नादरम्यान सुरक्षेची काळजी घेण्यात आली होती.

लग्नात कोणालाही फोटो किंवा व्हिडीओ काढण्यास मनाई होती. म्हणून हॉटेल स्टाफ आणि इतरांच्या फोनवर लाल रंगाची पट्टी लावण्यात आली होती. लग्नापूर्वी देखील परिणीती – राघव त्यांच्या नात्यामुळे चर्चेत होते. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर परिणीती – राघव विवाहबंधनात अडकले आहेत.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.