परिणीती चोप्रा – राघव चड्ढा यांच्या लग्नापूर्वीच्या विधींना पुढच्या महिन्यात होणार सुरुवात? आणखी एक व्हिडीओ समोर

खासदार राघव चड्ढा होणार चोप्रा कुटुंबाचे जावई; लग्नापूर्वीच्या तयारीला सुरुवात? अभिनेत्रीचा आणखी एक व्हिडीओ समोर.. चाहत्यांना लवकरच मिळणार 'गुडन्यूज'?

परिणीती चोप्रा - राघव चड्ढा यांच्या लग्नापूर्वीच्या विधींना पुढच्या महिन्यात होणार सुरुवात? आणखी एक व्हिडीओ समोर
Follow us
| Updated on: Mar 27, 2023 | 10:33 AM

मुंबई : सध्या बॉलिवूडमध्ये लग्नाचे वारे वाहत आहेत. अनेक सेलिब्रीटी लग्नबंधनात अडकल्यानंतर आता नंबर कोणाचा? अशी चर्चा चाहत्यांमध्ये रंगलेली असते. अशात अभिनेत्री परिणीती चोप्रा हिच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला आहे. जेव्हा अभिनेत्रीला आदमी पक्षाचे पंजाबचे खासदार राघव चड्ढा यांच्यासोबत स्पॉट करण्यात आलं तेव्हा पासून परिणीती आणि राघव यांच्या नात्याची चर्चा तुफान रंगत आहे. पण याबद्दल अद्याप अभिनेत्रीने कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. पण नुकताच समोर आलेल्या परिणीतीच्या एका व्हिडीओमुळे चर्चा आणखी रंगल्या आहेत. परिणीतीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

दरम्यान, परिणीतीला बॉलिवूडचा प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा याच्या घरी स्पॉट करण्यात आलं. रविवारी अभिनेत्री मनीष मल्होत्रा यांच्या घरी पोहोचली होती. यावेळी परिणीतीने काळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर परिणीतीच्या लग्नाच्या कपड्यांची जबाबदारी मनीषवर असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अभिनेत्रीच्या व्हिडीओवर चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत.

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या नात्याबद्दल आणखी एक महत्त्वीची माहिती समोर येत आहे. पुढच्या महिन्यात परिणीती आणि राघव रोका म्हणजे लग्नापूर्वी असलेली एक विधी पार पाडणार आसल्याची देखील चर्चा रंगत आहे. अभिनेत्रीने लग्नाची तयारी देखील सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. पण रंगणाऱ्या चर्चांमागे नक्की सत्य काय आहे? हे परिणीती आणि राघव यांच्या वक्तव्यानंतर स्पष्ट होणार आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, संसदेतून बाहेर आल्यानंतर राघव त्यांच्या कारच्या दिशेने जात होते. तेव्हा पत्रकारांनी त्यांनी अभिनेत्रीसोबतच्या नात्याबद्दल विचारले. परिणीती चोप्रासोबतच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओ आणि फोटोंनंतर राघव यांना प्रश्न विचारण्यात आला. राघव यांना परिणीतीसोबत लग्न करणार का? असा प्रश्न देखील विचारण्यात आला. तेव्हा चड्ढा हसत म्हणाले, ‘ तुम्ही मला राजकारणाबद्दल प्रश्न विचारा, परिणीतीबद्दल विचारू नका.’

राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये एकत्र शिक्षण घेतलं आहे. त्यामुळे त्यांची ओळख महाविद्यालयापासून आहे. फोटो व्हायरल झाल्यानंतर देखील राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांनी त्यांच्या नात्याचं स्पष्टीकरण दिलेलं नाही. पण दोघे फक्त चांगले मित्र असल्याची माहिती समोर येत आहे.

म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....