‘या’ दिवशी परिणीती चोप्रा – राघव चड्ढा उरकणार साखरपुडा; ‘का’ लाजली अभिनेत्री?

परिणीती चोप्रा - राघव चड्ढा यांच्या रिलेशनशिपच्या सर्वत्र चर्चा; 'या' दिवशी साखरपुडा झाल्यानंतर कधी अडकणार विवाहबंधनात?

'या' दिवशी परिणीती चोप्रा - राघव चड्ढा उरकणार साखरपुडा; 'का' लाजली अभिनेत्री?
Follow us
| Updated on: Apr 06, 2023 | 12:22 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांच्या नात्याच्या चर्चांनी सध्या तुफान जोर धरला आहे. हॉटेलबाहेर दोघांना एकत्र पाहिल्यानंतर परिणीती – राघव चड्ढा यांच्या नात्याची चर्चा रंगली. पण अद्याप दोघांनी देखील त्यांच्या नात्याबद्दल मौन बाळगलं आहे. शिवाय दोघांच्या कुटुंबाने देखील कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. पण जेव्हा परिणीतीला लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात येतो, तेव्हा अभिनेत्री लाजते. सध्या परिणीती सतत मुंबई ते दिल्ली असा प्रवास करत आहे. गेल्या काही दिवसांपासून परिणीती दिल्लीमध्ये होती.

याचदरम्यान, अभिनेत्री प्रियांका चोप्रा देखील कुटुंबासोबत मुंबईत आली आहे. त्यामुळे परिणीती आणि राघव दोघे लवकरच लग्नबंधनात अडकतील अशी चर्चा रंगत आहे. मिळालेल्या माहितीनुसार परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा १० एप्रिल रोजी साखरपुडा करणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत.

हे सुद्धा वाचा

दिल्ली विमानतळावर जेव्हा अभिनेत्रीला लग्नाबद्दल विचारण्यात आलं, तेव्हा परिणीती लाजली आणि पुढे गेली. रिपोर्टनुसार परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा १० एप्रिल रोजी साखरपुडा उरकणार आहेत, दोघांच्या साखरपुड्यात फक्त कुटुंब आणि मित्र-परिवार उपस्थित राहणार आहेत.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘लवकरच परिणीती – राघव साखरपुडा करण्याची शक्यता आहे. अत्यंत खासगी पद्धतीत दोघांचा साखरपुडा पार पडणार आहे. या सोहळ्यात मित्र परिवार आणि कुटुंब सहभागी होणार आहे.’ पण याबद्दल चोप्रा आणि चड्ढा कुटुंबियांकडून अधिकृत माहिती मिळालेली नाही.

राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये एकत्र शिक्षण घेतलं आहे. त्यामुळे त्यांची ओळख महाविद्यालयापासून आहे. दरम्यान, आम आदमी पक्षाचे खासदार संजीव आरोरा यांनी ट्विट करत दोघांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केलं आणि आता दोघांच्या साखरपुड्याची चर्चा रंगत आहे.

परिणीती हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. शिवाय परिणीती अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिची बहीण देखील आहे. परिणीताने फार कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम केलं आहे. सध्या परिणीती तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.

परिणीता हिने अनेक सिनेमांमध्ये भूमिका बजावत चाहत्यांच्या मनात घर केलं. परिणीताने २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लेडीज vs रिक्की’ सिनेमातून करियरला सुरुवात केली. त्यानंतर अभिनेत्रीने कधीही मागे वळून पाहिलं नाही. चाहते कायम परिणीताच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत असतात.

म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....