AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Parineeti Chopra | ब्रेकअपनंतर परिणीतीची झाली होती वाईट अवस्था; देवाचे आभार मानत अभिनेत्री म्हणाली…

Parineeti Chopra | राघव चड्ढा यांच्यासोबत लग्नापूर्वी परिणीती हिने ४ सेलिब्रिटींना केलं डेट? ब्रेकअपनंतर अभिनेत्रीची झाली होती अत्यंत वाईट अवस्था... सध्या सर्वत्र परिणीती हिच्या खासगी आयुष्याची चर्चा... २४ सप्टेंबर रोजी परिणीती करणार नव्या आयुष्याला सुरुवात...

Parineeti Chopra | ब्रेकअपनंतर परिणीतीची झाली होती वाईट अवस्था; देवाचे आभार मानत अभिनेत्री म्हणाली...
| Updated on: Sep 22, 2023 | 3:24 PM
Share

मुंबई : 22 सप्टेंबर 2023 | अभिनेत्री परिणीती चोप्रा गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत आहे. अभिनेत्री २४ सप्टेंबर रोजी AAP चे नेते राघव चड्ढा यांच्यासोबत विवाहबंधनात अडकणार आहे. सध्या अभिनेत्रीच्या लग्नापूर्वीच्या विधींनी सुरुवात झाली आहे. दरम्यान परिणीती हिला नवरीच्या रुपात पाहण्यासाठी चाहते देखील उत्सुक आहेत. राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा ही जोडी देखील चाहत्यांना प्रचंड आवडली आहे. सध्या फक्त आणि फक्त परिणीती चोप्रा हिची चर्चा सुरु आहे. पण राघव चड्ढा यांच्यासोबत लग्न करण्यापूर्वी अभिनेत्रीने अनेक सेलिब्रिटींना डेट केलं आहे. पण कोणासोबतही अभिनेत्रीचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. पण आता अभिनेत्रीच्या आयुष्यात खऱ्या प्रेमाची एन्ट्री झाली आहे.

राघव चड्ढा यांच्या रुपात परिणीती चोप्रा हिच्या आयु्ष्यात आनंद आणि प्रेमाची एन्ट्री झाली आहे. पण एक काळ असा होता, जेव्हा अभिनेत्री प्रेमात आलेल्या अपयशामुळे पूर्णपणे खचली होती. एका मुलाखती दरम्यान अभिनेत्री आयुष्यातील वाईट काळाबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. तेव्हा देखील परिणीती तुफान चर्चेत आली होती.

ब्रेकअपनंतर अभिनेत्री एका मुलाखतीत म्हणाली, ‘एकाने अत्यंत वाईट प्रकारे माझं मन दुखावलं होतं. मला असं वाटतं ते पहिल्यांदा आणि शेवटचं असेल… ती वेळ माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट होती. कारण त्याआधी मी कधीही नकाराचा सामना केलेला नव्हता. तेव्हा मला माझ्या कुटुंबाची सर्वात जास्त गरज होती…’

‘त्या अनुभवानंतर माझ्यात अनेक बदल झाले… मी आणखी समजदार झाले. म्हणून मी देवाचे आभार मानते.’ असं देखील परिणीती चोप्रा एका मुलाखतीत म्हणाली होती. परिणीती चोप्रा सोशल मीडियावर देखील तिच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

परिणीती चोप्रा हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर अभिनेत्रीचं नाव अर्जुन कपूर, उदय चोप्रा, आदित्य रॉय कपूर यांसारख्या प्रसिद्ध सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं आहे. २०१८ मध्ये परिणीती चोप्रा हिचं नाव दिग्दर्शक चरित देसाई याच्यासोबत जोडण्यात आलं होतं. अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिच्या लग्नात दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं.

चरित आणि परिणीती यांच्या लग्नाच्या चर्चा देखील तुफान रंगल्या होत्या. पण परिणीती हिने रंगणाऱ्या चर्चा फक्त अफवा असल्याचं सांगितलं होतं. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त परिणीती आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या आहेत.

इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार.