Parineeti Chopra | परिणीती-राघवच्या हळदीचा व्हिडीओ समोर; अभिनेत्रीचा खास आऊटफिट चर्चेत
लग्नानंतर काही दिवस सासरी थांबल्यानंतर परिणीती पुन्हा एकदा तिच्या कामाला सुरुवात करणार आहे. त्याचप्रमाणे राघव चड्ढासुद्धा संसदेच्या हिवाळी अधिवेशनामुळे व्यग्र होणार आहेत. उदयपूरमध्ये लग्न झाल्यानंतर ही जोडी थेट दिल्लीला रवाना झाली होती.
मुंबई | 29 सप्टेंबर 2023 : अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा हे 24 सप्टेंबर रोजी उदयपूरमधल्या ‘द लीला पॅलेस’मध्ये लग्नबंधनात अडकले. रविवार लग्न पार पडल्यानंतर सोमवारी परिणीती आणि राघव यांनी सोशल मीडियावर लग्नाचे फोटो पोस्ट केले. या दोघांच्या मेहंदी आणि हळद कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडीओ पाहण्यासाठीही चाहते उत्सुक आहेत. लग्नापूर्वीचे कार्यक्रमसुद्धा उदयपूरमध्येच पार पडले. आता सोशल मीडियावर परिणीती आणि राघवच्या हळदीच्या कार्यक्रमातील व्हिडीओ समोर आला आहे.
सोशल मीडियावरील या व्हिडीओमध्ये परिणीती आणि राघव हे हळदीच्या कार्यक्रमात एका पाहुण्यासोबत फोटोसाठी पोझ देत आहेत. हळदीच्या कार्यक्रमात परिणीतीने गुलाबी रंगाचा ड्रेस आणि राघवने पांढरा कुर्ता परिधान केल्याचं पहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये दोघांच्या चेहऱ्यावरील आनंद सहज पहायला मिळत आहे. उदयपूरमध्ये डेस्टिनेशन वेडिंग केल्यानंतर जवळच्या मित्रपरिवारासाठी हे दोघं रिसेप्शनचं आयोजन करणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र आता मुंबईत पार्टीचं आयोजन करण्यात येणार, अशी माहिती समोर येत आहे.
पहा व्हिडीओ
View this post on Instagram
परिणीतीने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिलं होतं, ‘नाश्त्याच्या टेबलवरील पहिल्या गप्पांपासूनच आम्हाला माहीत होतं की आम्ही एकमेकांसाठीच आहोत. या दिवसाची प्रतीक्षा आम्ही खूप काळापासून केली. अखेर आम्ही मिस्टर आणि मिसेस झालो आहोत. आम्ही एकमेकांशिवाय राहू शकलो नसतो. इथपासून आमच्या आयुष्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात झाली.’ तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून आणि इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला.
राघव आणि परिणीती हे एकमेकांना युकेमध्ये असल्यापासून ओळखतात. परिणीतीने मँचेस्टर बिझनेस स्कूलमध्ये शिक्षण घेतलंय. तर राघवने लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधून शिक्षण पूर्ण केलंय. परिणीतीने 2011 मध्ये ‘लेडीज व्हर्सेस रिकी बहल’ या चित्रपटात सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका साकारून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचं प्रेक्षक-समिक्षकांकडून कौतुक झालं. त्यानंतर ती ‘इशकजादे’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकली. अर्जुन कपूरसोबत तिची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडली. परिणीतीने ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘हसी तो फसी’, ‘दावत ए इश्क’, ‘किल दिल’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.