Pathaan |’पठाण’ने पहिल्याच दिवशी KGF 2, RRR ला टाकलं मागे; शाहरुखचं धमाकेदार कमबॅक
हा चित्रपट हिंदीसोबतच तमिळ आणि तेलुगू भाषांमध्येही प्रदर्शित झाला आहे. यशराज फिल्म्स निर्मित या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केलं आहे. यामध्ये शाहरुखसोबतच दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा यांच्या भूमिका आहेत.
मुंबई: अभिनेता शाहरुख खानने बॉलिवूडचा ‘किंग’ असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध केलं. त्याचा बहुचर्चित ‘पठाण’ हा चित्रपट बुधवारी (25 जानेवारी) प्रदर्शित झाला आणि पहिल्याच दिवशी या चित्रपटाने कमाईचे नवे विक्रम रचले आहेत. ‘पठाण’ने पहिल्याच दिवशी जवळपास 54 कोटी रुपयांचा गल्ला जमवल्याची माहिती समोर येत आहे. हा चित्रपट हिंदीसोबतच तमिळ आणि तेलुगू भाषांमध्येही प्रदर्शित झाला आहे. यशराज फिल्म्स निर्मित या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केलं आहे. यामध्ये शाहरुखसोबतच दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा यांच्या भूमिका आहेत.
‘पठाण’ने पहिल्या दिवसाच्या कमाईच्या बाबतीत एस. एस. राजामौली यांच्या ‘बाहुबली’ आणि कन्नड सुपरहिट चित्रपट ‘केजीएफ 2’लाही मागे टाकलं आहे. बुधवारी संध्याकाळपर्यंत ‘पठाण’ने 25.05 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. ही कमाई हृतिक रोशनच्या ‘वॉर’पेक्षाही अधिक आहे. प्रदर्शनापूर्वीही ‘पठाण’नेही ॲडव्हान्स बुकिंगचा विक्रम मोडला होता.
#Pathaan at national chains… Day 1… Update: 8.15 pm.#PVR: 11.40 cr#INOX: 8.75 cr#Cinepolis 4.90 cr Total: ₹ 25.05 cr SUPERB.
Note: Better than #War [₹ 19.67 cr], #TOH [₹ 18 cr] and #KGF [₹ 22.15 cr] – *entire day* numbers at multiplex chains. pic.twitter.com/bHmdT5Qd46
— taran adarsh (@taran_adarsh) January 25, 2023
गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूडला लागलेलं ग्रहण ‘पठाण’च्या निमित्ताने सुटणार असल्याचा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषक वर्तवत आहेत. शाहरुखने तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर मुख्य भूमिकेतून कमबॅक केलं आहे. त्यामुळे या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.
सर्वाधिक ओपनिंग कमाई करणारे बॉलिवूड चित्रपट
- वॉर- 53.35 कोटी रुपये
- ठग्स ऑफ हिंदोस्तान- 52.25 कोटी रुपये
- हॅपी न्यू इअर- 44-97 कोटी रुपये
- भारत- 42.30 कोटी रुपये
- प्रेम रतन धन पायो- 40.35 कोटी रुपये
ट्विटरवर नेटकऱ्यांकडून पठाणवर विविध प्रतिक्रिया येत आहेत. पठाण ही दोन विविध आइडिओलॉजीची कहाणी आहे. एक देशासाठी सर्वकाही पणाला लावणारा रॉ एजंट आहे तर दुसरा आपल्याच देशाविरोधात जाऊन शत्रूंशी हातमिळवणी करणारा जिम आहे. या दोघांची कथा फारच मनोरंजक आहे, मात्र काही त्यातील काही ॲक्शन सीन्स हे रिॲलिटीपासून दूर फक्त ड्रामा वाटू लागतात, असंही काहींनी म्हटलंय.