Pathaan: ‘बेशर्म रंग’ गाण्यावर प्लस साइज मॉडेलचा डान्स; व्हिडीओने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

बेशर्म रंग गाण्यावर प्लस साइज मॉडेलने केलेला 'हा' डान्स पाहिलात का?

Pathaan: 'बेशर्म रंग' गाण्यावर प्लस साइज मॉडेलचा डान्स; व्हिडीओने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष
Pathaan: 'बेशर्म रंग' गाण्यावर प्लस साइज मॉडेलचा डान्सImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 05, 2023 | 12:32 PM

मुंबई: शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘पठाण’ हा चित्रपट सध्या जोरदार चर्चेत आहे. या चित्रपटातील ‘बेशर्म रंग’ हे पहिलं गाणं प्रदर्शित झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. या गाण्यात दीपिकाचा आतापर्यंतचा सर्वांत बोल्ड अंदाज पहायला मिळतोय. सर्वसामान्यांपासून अनेक सेलिब्रिटींनीही त्यावर डान्स करत सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केले. यादरम्यान आता एका प्लस साइज मॉडेलच्या व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तन्वी गीता रविशंकर हिचा thechubbytwierl या नावाने इन्स्टाग्राम अकाऊंट आहे. या अकाऊंटला जवळपास दीड लाखांहून अधिक नेटकरी फॉलो करतात. तन्वी सोशल मीडियावर तिचे ग्लॅमरस फोटो अनेकदा शेअर करत असते. अनेकदा ती बॉडी शेमिंग मुद्द्यावरही बेधडकपणे मतं मांडताना दिसली.

हे सुद्धा वाचा

तन्वी एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ती ‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशर्म रंग’ या गाण्यावर थिरकताना दिसतेय. तन्वीने दीपिकाचे सिझलिंग मूव्स कॉपी केले आहेत. तिच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.

‘तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही करत असाल तर बेशर्म रहा. तुम्ही तुमचे आवडते कपडे परिधान करत असाल आणि आपल्या मर्जीने आयुष्य जगत असाल.. हे सर्व जर कोणाच्या नजरेत तुम्हाला ‘बेशर्म’ बनवत असेल तर यात काय समस्या आहे. आपण 2023 मध्ये आहोत आणि या जगात बेशर्म लोकच दिसणार आहेत’, असं कॅप्शन देत तिने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. तन्वीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

‘बेशर्म रंग’ या गाण्यावरून वाद झाल्यानंतर सेन्सॉर बोर्डाने आता त्यातील काही दृश्यांवर कात्री चालवली आहे.

‘बेशर्म रंग’ या गाण्यातील दीपिकाचे अंगप्रदर्शन करणारे काही सीन्स बदलण्यास सांगण्यात आले आहेत. यातील दीपिकाचे साईड पोझचे शॉट्स (पार्शिअल न्युडिटी), ‘बहुत तंग किया’ हे बोल सुरु असताना तिचा डान्स बदलण्यात येणार आहे. मात्र ज्या भगव्या बिकिनीवरून एवढा मोठा वाद झाला, त्यावर सेन्सॉर बोर्डाची कात्री चालली की नाही, हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.