Pathaan Trailer: ‘पठाण’च्या ट्रेलरमध्येही दीपिकाच्या अंगावर दिसला भगवा रंग; होणार नवा वाद?

फक्त गाण्यातच नाही तर चित्रपटातही भगव्या रंगाचे कपडे; 'पठाण' ट्रेलरमधील दीपिकाच्या 'त्या' दृश्याची चर्चा

Pathaan Trailer: 'पठाण'च्या ट्रेलरमध्येही दीपिकाच्या अंगावर दिसला भगवा रंग; होणार नवा वाद?
PathaanImage Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Jan 10, 2023 | 11:59 AM

मुंबई: अभिनेता शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या ‘पठाण’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरची प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता होती. अखेर किंग खानच्या ॲक्शन पॅक्ड चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर चाहत्यांनी त्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. या चित्रपटातील ‘बेशर्म रंग’ गाण्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. या गाण्यातील एका दृश्यात दीपिकाने भगव्या रंगाची बिकिनी परिधान केली होती. भगव्या रंगाची बिकिनी घालून बोल्ड दृश्ये देत दीपिकाने सनातन धर्माचा अपमान केला, असा आरोप काही हिंदू संघटनांनी केला. इतकंच नव्हे तर त्यांनी चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. आता पठाणच्या ट्रेलरमध्ये पुन्हा एकदा दीपिकाच्या अंगावर भगवा रंग दिसला आहे.

जवळपास अडीत मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये ॲक्शनचा भरणा पहायला मिळतो. शाहरुख आणि दीपिका यामध्ये सैनिकांच्या भूमिकेत आहेत. देशाला वाचवण्यासाठी या दोघांकडे एक मिशन सोपवण्यात आलं आहे. या ट्रेलरमध्ये दीपिकाची एण्ट्री झाल्यानंतर एका दृश्यात ती भगव्या रंगाच्या स्कर्टमध्ये पहायला मिळते.

दीपिकाचा हा ड्रेस ‘बेशर्म रंग’ गाण्यातील भगव्या ड्रेसची मिळताजुळताच आहे. भगव्या रंगाचा हाय स्लीट स्कर्ट आणि त्यावर पांढऱ्या रंगाचा क्रॉप टॉप तिने घातला आहे. त्यामुळे आता या दृश्यावरूनही वाद होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा

सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटातील 10 दृश्यांवर कात्री चालवली आहे. यात ‘बेशर्म रंग’ गाण्यातील काही दृश्यांचा समावेश होता. त्याचसोबत काही डायलॉग्स बदलण्यास सांगितले आहेत. मात्र ‘बेशर्म रंग’ या गाण्यातील ज्या दृश्यावरून एवढा मोठा वाद झाला, ते दृश्य चित्रपटात तसंच राहणार असल्याचं म्हटलं जात आहे. भगव्या बिकिनीबाबत सेन्सॉर बोर्डाने कोणताच कट सुचवला नसल्याचं कळतंय.

पठाण या चित्रपटात शाहरुख आणि दीपिकासोबत जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.