Pathaan: दीपिकाच्या भगव्या बिकीनीवरून हंगामा; इतक्या लाखांचा आहे शाहरुखचा लूक, शर्ट-शूजची किंमत तर पहा!

'बेशर्म रंग' गाण्यातील किंग खानच्या लूकवर लाखो रुपये खर्च; ऑनलाइन साइट्सवरून शर्ट झाला आऊट ऑफ स्टॉक

Pathaan: दीपिकाच्या भगव्या बिकीनीवरून हंगामा; इतक्या लाखांचा आहे शाहरुखचा लूक, शर्ट-शूजची किंमत तर पहा!
PathaanImage Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Dec 16, 2022 | 3:05 PM

मुंबई: शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणच्या ‘पठाण’ या चित्रपटातील ‘बेशर्म रंग’ गाण्यावरून दररोज नवा वाद समोर येतोय. या गाण्यातील दीपिकाच्या भगव्या बिकिनीवरून सोशल मीडियावर नेटकरी दोन वर्गात विभागले गेले आहेत. काही जण या गाण्यातील दृश्याविरोधात आहेत, तर काहींना हा वादच विनाकारण वाटतोय. एकीकडे दीपिकाच्या भगव्या बिकिनीची जोरदार चर्चा असताना या गाण्यात शाहरुखच्या लूकवर किती पैसे खर्च केले, त्याचा आकडा समोर आला आहे.

बेशर्म रंग या गाण्यातील ज्या दृश्यावरून इतका वाद निर्माण झाला आहे, त्या एका दृश्यासाठी शाहरुखच्या लूकवर चांगलाच पैसा खर्च करण्यात आला आहे. त्या सीनमध्ये शाहरुखने 8,194.83 रुपयांचा शर्ट घातला आहे.

काळ्या रंगाचा हा फ्लोरल प्रिंटचा शर्ट AllSaints या ब्रँडचा आहे. हा शर्ट तुम्हाला ऑनलाइन मिळू शकतो, मात्र गाणं प्रदर्शित होताच तो आऊट ऑफ स्टॉक झाला आहे.

हे सुद्धा वाचा

या सीनमध्ये काळ्या रंगाच्या या शर्टासोबत किंग खानने पांढऱ्या रंगाचे Dsquared 2 Basket mid-top स्नीकर्स घातले आहेत. या स्नीकर्सची किंमत 1,10,677.60 रुपये इतकी आहे.

या लूकला साजेसे असे सनग्लासेससुद्धा त्याने घातले आहेत. Eyevan 7285 Model 163(800) Titanium Frame चे हे सनग्लासेस आहेत. या सनग्लासेसची किंमत जवळपास 500 डॉलर्स म्हणजेच 41,210 रुपये आहे. शाहरुखला किंग खान का म्हटलं जातं, याचा अंदाज तुम्हाला या किंमती पाहून आलाच असेल.

पठाण या चित्रपटातून शाहरुख चार वर्षांनंतर मुख्य भूमिकेत कमबॅक करतोय. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच त्यातील गाणं वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या गाण्यात दीपिकाचा आतापर्यंतचा सर्वांत बोल्ड अंदाज पहायला मिळतोय.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.