Pavitra Rishta मालिकेनंतर पूर्णपणे बदललं सुशांतच्या ऑनस्क्रिन बहिणीचं आयुष्य, आता काय करते वंदिता?
'पवित्र रिश्ता' मालिकेत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या बहिणीच्या भूमिकेत झळकलेली वंदिता आता करते तरी काय? मालिकेनंतर अभिनेत्रीचं आयुष्यच बदललं
मुंबई : ‘पवित्र रिश्ता’ ही मालिका चाहते आजही विसरु शकलेले नाही. मालिकेला प्रदर्शित होवून १४ वर्ष झाली आहेत. ज्यामुळे सर्वत्र मालिका आणि मालिकेतील कलाकारांची चर्चा रंगत आहे. मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसलेले कलाकार आज त्यांच्या आयुष्यात आनंदी आहेत. सोशल मीडियावर सध्या फक्त आणि फक्त ‘पवित्र रिश्ता’ मालिकेची चर्चा रंगत आहे. मालिकेत मानव ही भूमिका साकारणार अभिनेता सुशांत सिंह राजपूत आज चाहत्यांमध्ये नसला तरी, त्याच्या आठवणी मात्र आजही अनेकांच्या मनात आहेत. पण आता मालिकेत सुशांतच्या ऑनस्क्रिन बहिणीची भूमिका साकारणारी वंदिता म्हणजे अभिनेत्री यामिनी ठाकुर हिच्याबद्दल अनेक चर्चा रंगत आहेत.
मालिकेतील यामिनीच्या भूमिकेला देखील चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. पण सुशांतची ऑनस्क्रिन बहीण म्हणजे यामिनी सध्या काय करते, ती कुठे आहे? अशा अनेक चर्चा चाहत्यांमध्ये रंगत आहेत. यामिनी हिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. यामिनी हिने अभिनयाला राम राम ठोकला आहे. मालिकेनंतर अभिनेत्रीचं पूर्ण आयुष्य बदललं.
पवित्र रिश्ता मालिकेत मानवची धाकटी बहीण वंदिता म्हणजेच अभिनेत्री यामिनी ठाकूर हिने दामोदर आणि सविताच्या मुलीची भूमिका साकारली होती. यामिनीने पवित्र रिश्ता नंतर पवित्र बंधन मालिकेतही काम केले. मात्र, तिला टीव्हीविश्वात स्वतःची ओळख निर्माण करता आली नाही. पण पवित्र रिश्ता मालिकेमुळे अभिनेत्री चर्चेत आहे..
View this post on Instagram
टीव्ही विश्वापासून अभिनेत्री आता वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत आहे. यामिनी आता पत्नी आणि आईचं कर्तव्य पार पाडत आहे. २७ वर्षीय यामिनी अभिनय क्षेत्रात सक्रिय नसली तरी, अभिनेत्री सोशल मीडियावर मात्र कायम सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर यामिकी कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.
पवित्र रिश्ता मालिकेबद्दल सांगायचं झालं तर, मालिका २००९ साली सुरु झाली होती. मालिकेने चाहत्यांचं भरभरुन मनोरंजन केलं. मालिकेतील अर्चना आणि मानव यांची जोडी चाहत्यांना आवडली. आजही मानव आणि अर्चना यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मालिके दरम्यान सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे यांच्यामध्ये प्रेम देखील बहरलं. पण त्यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. अंकिता आज पती विकी जैन याच्यासोबत वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत आहे.