Video : शिल्पा शेट्टी हिच्या पतीला बघताच लोक हैराण, राज कुंद्रा याने चक्क…
शिल्पा शेट्टी हिने एक मोठा काळ बाॅलिवूड चित्रपटांमध्ये गाजवलाय. शिल्पा शेट्टी ही कायमच चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याच्यावर काही दिवसांपूर्वीच अत्यंत गंभीर आरोप हे करण्यात आले.

मुंबई : शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. राज कुंद्रा याचा यूटी 69 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. विशेष म्हणजे नुकताच या चित्रपटाचे ट्रेलर लाॅन्च (Trailer launch) झाले. या चित्रपटातून राज कुंद्रा हा जेलमधील 69 दिवसांबद्दल खुलासा करताना दिसणार आहे. जेलमध्ये त्याला कशाप्रकारे राहवे लागले याबद्दल चित्रपटात (Movie) बघायला मिळेल. राज कुंद्रा याच्यावर काही दिवसांपूर्वी अत्यंत गंभीर आरोप झाले.
यानंतर अनेकांनी शिल्पा शेट्टी हिला देखील टार्गेट केले. राज कुंद्रा हा ट्रेलर लाॅन्च वेळी अत्यंत भावूक झाल्याचे देखील बघायला मिळाले. राज कुंद्रा थेट म्हणाला की, तुम्हाला जे काही बोलायचे आहे ते फक्त मला बोला माझ्या पत्नीला आणि मुलांना नको, त्यांनी तुमचे काही बिघडवले नाहीये. यावेळी थेट ढसाढसा रडताना देखील शिल्पा शेट्टी हिचा पती दिसला. याचे काही व्हिडीओ तूफान व्हायरल झाले.
राज कुंद्रा याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. जेलमधून बाहेर आल्यानंतर पहिल्यांदाच राज कुंद्रा हा मास्क न लावता घराबाहेर पडल्याचे दिसतंय. राज कुंद्रा याच्यावर झालेल्या आरोपांपासून तो सतत चेहऱ्याला मास्क लावून फिरताना दिसला. राज कुंद्रा याला पाॅर्न किंग देखील म्हटले गेले.’
View this post on Instagram
राज कुंद्रा याला मास्क न लावता पाहिल्यावर सर्वांनाच मोठा धक्का बसला. कारण हे अनेक वर्षांनंतर बघायला मिळाले. राज कुंद्रा याचा हाच व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. यावेळी पापाराझी म्हणाले, शेवटी मास्क काढले गेले…यावर राज कुंद्रा याने प्रतिक्रिया देत म्हटले की, होय…शेवटी ताजी हवा मिळाली…
राज कुंद्रा याच्या या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर लोक हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. राज कुंद्रा याने खुलासा केला की, मी ज्यावेळी शिल्पाला या चित्रपटाबद्दल सांगितले त्यावेळी ती खूप जास्त खुश झाली. पुढे राज कुंद्रा म्हणाला, शिल्पा शेट्टी हिने मला प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट केला आहे, ती कायमच माझ्या पाठीशी उभी असते.