Urfi Javed : उर्फीचा हा ड्रेस पाहून लोकांनी केले ट्रोल, तुम्हीही डोक्याला हात मारुन घ्याल
Urfi javed : उर्फी जावेद पुन्हा एकदा तिच्या कपड्यांमुळे चर्चेत आली आहे. या ड्रेसमध्ये तिने पुढे दोन नकली हात लावले आहेत. तिचा हा नवीन ड्रेस पाहून अनेक युजर तिला सोशल मीडियावर ट्रोल करत आहे. एकाने तर तिला पृथ्वीरचा विचित्र प्राणी असं देखील म्हटले आहे. पाहा उर्फीचा हा नवीन व्हिडिओ.
मुंबई : टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेद आपल्या विचित्र कपड्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. उर्फी तिच्या लूकने लोकांना नेहमीच आश्चर्यचकित करत असते. ज्यामुळे ती अनेकदा ट्रोल ही होते. तिने पुन्हा एकदा असा लूक केला आहे ज्यामुळे ती सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. उर्फीचा नवीन पोशाख पाहून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.
उर्फी जावेद कधी सायकलची चैन, कधी काचेचे तुकडे किंवा अजून वेगवेगळ्या वस्तूंपासून बनवलेल्या कपड्यांमध्ये पाहिले असेल. यावेळी अभिनेत्री अशा ड्रेसमध्ये दिसली, जो परिधान केल्यानंतर तिला चार हात दिसत आहेत. उर्फीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
उर्फी जावेदने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा नवा व्हिडिओ शेअर केला आहे. अभिनेत्री डेनिम जीन्ससोबत एक विचित्र टॉप घातलेली दिसत आहे, जी तुम्ही कधीच पाहिली नसेल. उर्फी जावेदच्या काळ्या रंगाच्या टॉपला दोन हात आहेत. व्हिडिओमध्ये अभिनेत्री त्या हातात पाण्याचा ग्लास धरताना दिसत आहे. ती मांजर पकडण्याचाही प्रयत्न करते.
उर्फी जावेदचा हा टॉप टीव्ही अभिनेत्री बनलेल्या डिजिटल निर्मात्या श्वेता महाडिकने बनवला आहे. श्वेता डिझायनर पर्स किंवा नवीन लुक रीक्रिएट करताना दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. नवीन लूकमधील व्हिडिओ आणि फोटो शेअर करताना उर्फीने श्वेताचे वर्णन खूप प्रतिभावान असल्याचे केले आहे.
View this post on Instagram
लोकांनी केले चांगलेच ट्रोल
एका युजरने म्हटले की, “भीक मागण्याचे नवीन तंत्र.” एका यूजरने म्हटले की, काय फॅशन आहे बाबा. “माझ्याकडे शब्द नाहीत. मला माफ करा,”. एकाने लिहिले”ते सर्व ठीक आहे, पण मला तुमच्याकडून स्वस्त कट्टाप्पा वाइब्स का मिळत आहेत.” एकाने टिप्पणी केली, “चार हात करून काय उपयोग, जेव्हा ना मांजर धरले जाते ना पाण्याचा ग्लास धरला जात असेल. एकाने उर्फीला पृथ्वीवरील सर्वात विचित्र प्राणी म्हणून वर्णन केले.