Gadar 2 सिनेमा पाहण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा जागीच मृत्यू; निधनाचं धक्कादायक कारण समोर

Gadar 2 | सनी देओल स्टारर 'गदर २' सिनेमा पाहण्यासाठी आलेल्या व्यक्तीच्या निधनाने सर्वत्र खळबळ; निधनाचं धक्कादायक कारण समोर... सध्या सर्वत्र धक्कादायक घटनेची चर्चा

Gadar 2 सिनेमा पाहण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा जागीच मृत्यू; निधनाचं धक्कादायक कारण समोर
Follow us
| Updated on: Aug 28, 2023 | 7:48 AM

मुंबई | 28 ऑगस्ट 2023 : गेल्या काही दिवसांमध्ये चित्रपटगृहात अनेक सिनेमे प्रदर्शित झाले, पण प्रेक्षकांनी अभिनेत सनी देओल स्टारर ‘गदर २’ सिनेमा पाहण्यासाठी मोठी गर्दी केली. सिनेमा बॉक्स ऑफिसवर देखील तुफान कमाई करताना दिसत आहे. सलग १७ दिवस सिनेमाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. दरम्यान, एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ‘गदर २’ सिनेमा पाहण्यासाठी चित्रपटगृहात आलेल्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर सर्वत्र तरुणाच्या निधनाबद्दल सर्वांना कळलं…

‘गदर २’ सिनेमा पाहण्याच्या चित्रपटगृहात आलेल्या व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झालं आहे. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेश येथील लखीमपूर येथील आहे. ही दुर्दैवी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हिडीओमध्ये तरुण अचानक जमीनीवर कोसळतो. व्यक्ती जमीनीवर कोसळल्यानंतर आजू-बाजूला असलेल्या लोकांना देखील धक्का बसला..

ज्याव्यक्तीचं दुर्दैवी निधन झालं तो व्यक्ती ३२ वर्षांचा असून त्याचं नाव अष्टक तिवारी होतं. अष्टक तिवारी रात्री आठ वाजता ‘गदर २’ सिनेमा पाहण्यासाठी चित्रपटगृहात आला होता. पण त्याच्या नशिबात मात्र वेगळंच काही लिहिलेलं होतं. वयाच्या ३२ व्या वर्षी अष्टक तिवारी याचं निधन झाल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.

सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमाचा पहिला भार २००१ साली प्रदर्शित झाला होता. ‘गदर’ सिनेमाला देखील चाहत्यांनी डोक्यावर घेतलं होतं. ‘गदर २’ ला देखील प्रेक्षक भरभरुन प्रेम देत आहेत. दोन आठवड्यात सिनेमाने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. आता सिनेमा अभिनेता शाहरुख खान स्टारर ‘पठाण’ सिनेमाचा रेकॉर्ड मोडू शकतो की नाही, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

‘गदर 2’ बद्दल सांगायचं झालं त, 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर’ सिनेमाचा सिक्वेल आहे. गदरची फक्त स्टारकास्ट त्याच्या सिक्वेलमध्ये दिसली आहे. सनी देओल, अमिषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा सिनेमात मुख्य भूमिकेत दिसले आहेत. सिनेमाचं दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केलं आहे. ‘गदर 2’ हा तिसरा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी सिनेमा ठरला आहे. या सिनेमाने जगभरात 500 कोटींहून अधिक कमाई केली आहे. सध्या सर्वत्र ‘गदर 2’ सिनेमाची चर्चा…

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.