ऐश्वर्या राय आणि अभिषेकला एकत्र पाहताच श्वेता बच्चनच्या कपाळावर आठ्या, ‘ते’ फोटो पाहताच..

Aishwarya Rai and Abhishek Bachchan : ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे कायमच चर्चेत असतात. मात्र, यावेळी ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे त्यांच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहेत. ऐश्वर्या राय ही बाॅलिवूडच्या टाॅप अभिनेत्रींपैकी एक आहे. विशेष म्हणजे ऐश्वर्या राय ही आज कोट्यवधी संपत्तीची मालकीन देखील आहे.

ऐश्वर्या राय आणि अभिषेकला एकत्र पाहताच श्वेता बच्चनच्या कपाळावर आठ्या, 'ते' फोटो पाहताच..
Follow us
| Updated on: Feb 16, 2024 | 11:26 AM

मुंबई : ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन हे सतत चर्चेत आहेत. हेच नाही तर ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा या सातत्याने रंगताना दिसत आहेत. मात्र, यावर अजूनही कोणीही काहीही भाष्य केले नाहीये. सतत ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे मुलगी आराध्या हिच्या शाळेच्या एक प्रोग्राममध्ये वेगवेगळ्या गाड्यांमध्ये पोहचले. ज्याचे व्हिडीओ व्हायरल झाले. यानंतर ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चन याचे घर सोडल्याची जोरदार चर्चा सुरू झाली.

काही दिवसांपूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये श्वेता बच्चन ही ऐश्वर्या राय हिच्या वाईट सवयींबद्दल बोलताना दिसली. श्वेता बच्चन हिचे हे बोलणे ऐकून लोक हैराण झाल्याचे बघायला मिळाले. सतत चर्चा आहे की, ऐश्वर्या राय आणि श्वेता बच्चन यांच्यामध्ये अजिबातच जमत नाही. हेच नाही तर दोघी नेहमीच एकसोबत एखाद्या शोमध्ये येणे देखील टाळतात. कधीच या एकसोबत स्पाॅट देखील होत नाहीत.

सध्या सोशल मीडियावर एका रेड कार्पेटमधील व्हिडीओ आणि काही फोटो हे व्हायरल होताना दिसत आहेत. हे फोटो तूफान चर्चेत आहेत. यावेळी अमिताभ बच्चन आणि आणि श्वेता बच्चन हे फोटोसाठी खास पोझ देताना दिसत आहेत. मात्र, त्याचवेळी तिथे ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन ही तिथे पोहचले. ऐश्वर्या राय हिला तिथे बघून श्वेता बच्चन हिच्या चेहऱ्यावरील हावभाव थेट बदलताना दिसत आहेत.

हेच नाही तर ऐश्वर्या राय हिला पाहून थेट निघून जाताना देखील श्वेता बच्चन ही दिसत आहे. तसे हे फोटो जुनेच आहेत. मात्र, ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान हे चांगलेच चर्चेत आल्याचे बघायला मिळतंय. ऐश्वर्या राय आणि श्वेता बच्चन यांच्यात फार जास्त चांगलेच रिलेशन नसल्याचे सातत्याने सांगितले जाते.

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्याबद्दल सातत्याने उलटसुलट चर्चा या रंगताना दिसत आहेत. यामध्ये आता सोशल मीडियावर श्वेता बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचे हे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. श्वेता बच्चन हिचा मुलगा अगस्त्य नंदा याने बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. मात्र, त्याच्या पहिल्याच चित्रपटाला म्हणावा तसा धमाका करण्यात अजिबातच यश मिळाले नाही.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.