कंगनाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल, ट्विटर अकाऊंट निलंबित करण्याची मागणी

कंगनाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात आणखी एक याचिका दाखल करण्यात आली आहे.

कंगनाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल, ट्विटर अकाऊंट निलंबित करण्याची मागणी
Follow us
| Updated on: Dec 03, 2020 | 10:58 PM

नवी दिल्ली : गुरुवारी ट्विटरवर अभिनेत्री कंगना रनौत (kangana ranaut) आणि दिलजीत दोसांझ यांच्यातील ट्विटर (twitter) वॉर चर्चेचा विषय ठरला आहे. या वॉरमुळे ट्विटरवर अनेक हॅशटॅगही ट्रेंड करत होते. आता नुकत्याच हाती मिळालेल्या माहितीनुसार, कंगनाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात आणखी एक याचिका दाखल करण्यात आली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कंगनाचं ट्विटर अकाउंट निलंबित करण्याची मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे. याबद्दल कंगनानेही सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. (plea against kangana ranaut filed in bombay high court to suspend twitter account)

कंगना तिच्या ट्विटर अकाऊंटवरून वारंवार तिरस्कार, वैमनस्य पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचं सदर याचिकेत म्हटलं आहे. या याचिकेवर कंगनाने पुन्हा एक ट्विट केलं आहे. ‘मी रोज अखंड भारताबद्दल बोलत आहे. रोज मी तुकडे-तुकडे टोळीशी लढत आहे. तरीही माझ्यावरच देशाचं विभाजन केल्याचा आरोप होत आहे. व्वा! तरीही, माझ्यासाठी ट्विटर हे एकमेव प्लॅटफॉर्म नाही. एका इशाऱ्यात हजारो कॅमेरे माझ्याकडे इंटरव्ह्यू घेण्यासाठी येतील हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. माझा आवाज दाबण्यासाठी तुम्हाला मला मारावं लागेल. पण त्यानंतर मी प्रत्येक भारतीयांच्या माध्यमातून बोलेन आणि हेच माझं स्वप्न आहे. तुम्ही काहीही केलं तरी माझं स्वप्न आणि ध्येय साकार होईल. म्हणूनच मला खलनायक आवडतात.’ असं कंगनाने ट्वीट केलं आहे. यामुळे सोशल मीडियावर हा ट्विटर वॉर आणखी वाढल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी कंगनाने शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या एका वृद्ध महिलेला बिलकिस बानो म्हणत त्यांची खिल्ली उडविली होती. त्यावर दिलजित दोसांझ याने ‘कोणी इतकेही आंधळे असू नये’, अशी टिप्पणी केली होती.

त्यावर कंगना रानौत हिने नेहमीप्रमाणे अद्वातद्वा बोलत दिलजित दोसांझवर टीका केली. तिने दिलजितला करण जोहरचा ‘पाळीव कुत्रा’ म्हटले. तू रोज ज्यांची चाटून काम मिळवतोस मी त्यांची रोज वाजवते. त्यामुळे जास्त उडू नकोस. मी कंगना रानौत आहे, तुझ्यासारखी चमची नाही, अशा अत्यंत खालच्या भाषेत कंगनाने दिलजितवर टीका केली. (plea against kangana ranaut filed in bombay high court to suspend twitter account)

कंगनाच्या या ट्विटला दिलजित दोसांझ यानेही सडेतोड प्रत्युत्तर दिले. तू आजपर्यंत जितक्या जणांबरोबर चित्रपट केलेस, त्यांची तू पाळीव आहेस का? मग तर ही यादी वाढतच जाईल. आम्ही बॉलिवूडवाले नाही तर पंजाबवाले आहोत. खोटं बोलून लोकांना चिथवणे आणि भावनांशी खेळणे तुला चांगले जमते, असे दिलजितने आपल्या ट्विटमध्ये म्हटले. त्यामुळे आता आगामी काळात दिलजित आणि कंगनातील हे ट्विटर वॉर आणखीनच भडकण्याची चिन्हे दिसत आहेत.

इतर बातम्या – 

Kangana Ranaut | कंगना रनौतची वांद्रे पोलीस ठाण्यातील FIR रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका

Kangana Ranuat | ‘तुम्हाला निलंबित केले पाहिजे’, कंगना रनौत महिला आयपीएस अधिकाऱ्यावर संतापली!

(plea against kangana ranaut filed in bombay high court to suspend twitter account)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.