Satish Kaushik यांच्या मृत्यूचं सत्य समोर! २० जणांनी पोलिसांना सांगितली ‘ही’ गोष्ट?

सतीश कौशिक यांच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ; फार्म हाऊसच्या मालकावर गंभीर आरोप केल्यानंतर २० जणांनी पोलिसांना सांगितली 'ही' गोष्ट

Satish Kaushik यांच्या मृत्यूचं सत्य समोर! २० जणांनी पोलिसांना सांगितली 'ही' गोष्ट?
Follow us
| Updated on: Mar 14, 2023 | 3:52 PM

मुंबई : दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. होळीची पार्टी झाल्यानंतर सतीश यांची प्रकृती खालावली होती. त्यानंतर कौशिक यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सतीश कौशिक यांचं निधन हृदय विकाराच्या झटक्याने झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. पण आता सतीश कौशिक यांच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. सतीश कौशिक यांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी फार्म हाऊसचे मालक विकास मालू यांच्यासोबत २० जणांची चौकशी केली आहे. सध्या सतीश कौशिक प्रकरण तुफान चर्चेत आलं आहे.

पोलिसांनी सोमवारी सकाळी ११ वाजता सान्वी मालू यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी नोटीस पाठवली होती. पण तपास अधिकारी बदलण्याची मागणी करत सान्वी यांनी चौकशीसाठी येण्यास नकार दिला. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार सान्वी यांना पुन्हा नोटीस पाठवून चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगणार आहेत.

सतीश कौशिक मृत्यू प्रकरणी पोलिसांनी अनेक प्रश्न तयार केले आहेत. सर्व प्रश्न सान्वी यांने केलेल्या आरोपांवर आधारित असणार आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, फार्म हाऊसची तपासणी केल्यानंतर, तेथून महत्त्वाच्या गोष्टी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. विकास मालू यांच्या फार्म हाऊसमध्ये सतीश कौशिक पार्टी करण्यासाठी थांबले होते. पण पार्टी झाल्यानंतर रात्री सतीश कौशिक यांच्या छातीत दुखू लागलं.

हे सुद्धा वाचा

सतीश कौशिक यांची प्रकृती खालावल्यानंतर मॅनेजर संतोष रॉय यांनी अभिनेत्याला रुग्णायलात दाखल केलं आहे. आता सतीश मृत्यू प्रकरणी पोलिसांनी पार्टीमध्ये उपस्थित असलेल्या २० जणांची चौकशी केली आहे. आता पोलीस याबद्दल काय सांगतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

एवढंच नाही तर पोलिसांनी सतीश कौशिक यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी दीन दयाल उपाध्याय रुग्णालयाच्या पॅथोलॉजी लॅबमध्ये पाठवून दिले आहेत. त्यांच्या रक्ताचे नमुने एफएसएल चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

सतीश कौशिक मृत्यू प्रकरणी सान्वी मालू यांची चौकशी केल्यानंतर पुन्हा विकास मालू यांची चौकशी करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सतीश कौशिक मृत्यू प्रकरणी अनेक गोष्टी समोर येत असताना अभिनेत्याच्या कुटुंबाना कोणावरही कोणतेही आरोप केलेले नाहीत.

अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. सतीश याचं निधन नाही तर हत्या झाल्याचा दावा सन्वी मालू यांनी केला आहे. सान्वी मालू अभिनेते सतीश कौशिक यांचे मित्र विकास मालू यांच्या पत्नी आहेत. सतीश कौशिक यांच्या मृत्यूप्रकरणी सान्वी यांनी पती विकास मालू यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. आता या प्रकरणी काय समोर येणार हे महत्त्वाचं ठरणार आहे.

महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....