Ponniyin Selvan I: ऐश्वर्याचा जबरदस्त कमबॅक; ‘पोन्नियिन सेल्वन 1’ ठरतोय ब्लॉकबस्टर

पहिल्याच वीकेंडला PS- 1 ची दमदार कमाई

Ponniyin Selvan I: ऐश्वर्याचा जबरदस्त कमबॅक; 'पोन्नियिन सेल्वन 1' ठरतोय ब्लॉकबस्टर
Ponniyin Selvan IImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 03, 2022 | 1:45 PM

मुंबई- दिग्दर्शक मणिरत्नम (Mani Ratnam) यांचा ‘पोन्नियिन सेल्वन 1’ (Ponniyin Selvan I) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. पहिल्या वीकेंडला या चित्रपटाने जगभरात तब्बल 230 कोटींची कमाई केली आहे. तर भारतात या चित्रपटाने 100 कोटींचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाला केवळ भारतातच नाही तर भारताबाहेरही खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. अमेरिकेत सर्वोत्कृष्ट ओपनिंग मिळालेला हा पहिला तमिळ चित्रपट ठरला आहे. ऐश्वर्या रायच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर (Box Office) नवीन विक्रम रचले आहेत.

‘पीएस- 1’ हा चित्रपट या वीकेंडला जगभरात सर्वाधिक कमाई करणारा तिसरा चित्रपट ठरला आहे. तब्बल 29 दशलक्ष डॉलर्सची कमाई या चित्रपटाची झाली आहे. या यादीत पहिल्या स्थानावर ‘होम कमिंग’ (58 दशलक्ष डॉलर्स) हा चायनिज चित्रपट आहे. तर दुसऱ्या स्थानावर ‘स्माइल’ (36 दशलक्ष डॉलर्स) हा सस्पेन्स-थ्रिलर चित्रपट आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक रमेश बाला यांनी ही माहिती दिली.

हे सुद्धा वाचा

कल्की यांच्या ‘पोन्नियिन सेल्वन’ या कादंबरीवर आधारित ‘पीएस- 1’ हा चित्रपट आहे. तमिळ, हिंदी, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड अशा पाच भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. पोन्नियिन सेल्वन हा मणिरत्नम यांचा असा पहिला चित्रपट आहे, ज्याने बॉक्स ऑफिसवर 100 आणि 200 कोटींचा टप्पा पार केला आहे.

पोन्नियिन सेल्वन 1 मध्ये जयम रवी, विक्रम, कार्ती, ऐश्वर्या राय, त्रिशा, सोभिता धुलिपाला, ऐश्वर्या लक्ष्मी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. जवळपास दहा वर्षांनंतर ऐश्वर्याने तमिळ चित्रपटातून कमबॅक केलं आहे. या चित्रपटात तिने दुहेरी भूमिका साकारल्या आहेत. ऐश्वर्याच्या दमदार अभिनयाचं प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे.

'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....