Pooja Batra | ‘हिने खरंच काही घातलं नाही का’; स्विमिंग पूलमधील पूजा बत्राच्या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव

पूजा बत्राने 2019 मध्ये नवाब शाहशी लग्न केलं. दिल्लीतील आर्य समाजमध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली. फेमिना मिस इंडिया या सौंदर्यस्पर्धेची रनरअप ठरलेली पूजाने 1993 मध्ये फेमिना मिस इंडिया इंटरनॅशनलचा किताब जिंकला होता.

Pooja Batra | 'हिने खरंच काही घातलं नाही का'; स्विमिंग पूलमधील पूजा बत्राच्या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव
Pooja BatraImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 06, 2023 | 12:59 PM

मुंबई : 80-90 च्या दशकात इंडस्ट्री गाजवणारी अभिनेत्री पूजा बत्रा सध्या चित्रपटांपासून दूर आहे. मात्र सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. इन्स्टाग्रामवर ती बऱ्यापैकी सक्रीय असून चाहत्यांसोबत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. पूजाने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमधील तिच्या बोल्ड अंदाजाने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. अक्षय कुमार, गोविंदा, संजय दत्त यांसारख्या मोठ्या कलाकारांसोबत काम केलेली पूजा वयाची चाळीशी ओलांडल्यानंतरही तितकीच सुंदर आणि फिट असल्याचं पहायला मिळतंय. इन्स्टाग्रामवरील या व्हिडीओमध्ये पूजाने ट्रान्सपरंट ड्रेस घातला असून त्यावरून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

स्विमिंग पूलमध्ये फोटोशूट करतानाचा तिचा हा व्हिडीओ आहे. मात्र या व्हिडीओमधील तिच्या हटके ड्रेसने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. ‘एका क्षणासाठी वाटलं की ती न्यूड आहे, पण तिने ट्रान्सपरंट ड्रेस घातला आहे’, असं एकाने लिहिलं आहे. तर ‘तिच्या ड्रेसचा काहीतरी प्रॉब्लेम नक्कीच आहे,’ असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. काहींनी पूजाच्या या ड्रेसची तुलना उर्फी जावेदशीही केली आहे. तर काहींनी या फोटोशूटसाठी पूजाच्या हिंमतीची दाद दिली आहे.

हे सुद्धा वाचा

दिल्लीतील आर्य समाजमध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली. फेमिना मिस इंडिया या सौंदर्यस्पर्धेची रनरअप ठरलेली पूजाने 1993 मध्ये फेमिना मिस इंडिया इंटरनॅशनलचा किताब जिंकला होता. तर 1993 च्या मिस इंटरनॅशनल सौंदर्यस्पर्धेत तिने भारताचं प्रतिनिधीत्व केलं होतं. 2021 मध्ये ती ‘स्क्वॉड’ या चित्रपटात झळकली होती. पूजा बत्राने 2019 मध्ये नवाब शाहशी लग्न केलं. पूजा बत्राने 2002 मध्ये सर्जन सोनू अहलुवालिया यांच्याशी पहिले लग्न केले आणि अमेरिकेत शिफ्ट झाली, परंतु तिचं लग्न फार काळ टिकू शकलं नाही. आठ वर्षांनंतर सोनू आणि पूजाचा घटस्फोट झाला.

पहा व्हिडीओ

पूजा आता मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी एक काळ असा होता जेव्हा तिची गणना बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये केली जात होती. पूजा बत्राने बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम करून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. तिने जाहिरातींमध्येही दीर्घकाळ काम केलं होतं. ‘हेड अँड शोल्डर्स’ या अमेरिकन शॅम्पूच्या जाहिरातीसाठी ती पहिली भारतीय चेहरा ठरली होती. प्रदीर्घ काळ जाहिरातींमध्ये काम केल्यानंतर तिने चित्रपटांकडे वळण्याचा निर्णय घेतला होता.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.