Pooja Bhatt | वडिलांसोबत ‘वादग्रस्त लिपलॉक’वर पूजा भट्ट हिने सोडलं मौन, सत्य समोर

Pooja Bhatt | महेश भट्ट आणि लेक पूजा भट्ट यांच्या 'वादग्रस्त लिपलॉक'वर एकेकाळी माजली होती खळबळ... अनेक वर्षांनंतर अभिनेत्रीने सांगितलं सत्य... सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या वक्तव्याची चर्चा

Pooja Bhatt | वडिलांसोबत 'वादग्रस्त लिपलॉक'वर पूजा भट्ट हिने सोडलं मौन, सत्य समोर
Follow us
| Updated on: Sep 11, 2023 | 8:32 AM

मुंबई : ११ सप्टेंबर 2023 | अभिनेत्री पूजा भट्ट (Pooja Bhatt) बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. नुकताच अभिनेत्री ‘बिग बॉस ओटीटी २’ मध्ये दिसली. प्रेक्षकांनी देखील दमदार स्पर्धक म्हणून पूजा हिला साथ दिला. कोणत्याही मुद्द्यावर परखड मत आणि सकारात्मक विचारांमुळे पूजा भट्ट तुफान चर्चेत आली. ‘बिग बॉस’च्या घरात अभिनेत्रीने खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल अनेक गोष्टींचा खुलासा केला. ज्यामुळे तुफान चर्चा रंगली. आता ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर आल्यानंतर देखील पूजा तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल अनेक गोष्टी सांगत असते. आता देखील पूजा भट्ट हिने मोठा खुलासा केला आहे.

१९९० मध्ये पूजा भट्ट सर्वत्र चर्चेत आली होती. रंगणाऱ्या चर्चांमागे कारण देखील तसं होतं. पूजा भट्ट हिने वडील महेश भट्ट यांना लिपकिस केलं होतं. दोघांचा लिपलॉक करताना फोटो मॅगझीनवर छापून आला होता. एवढंच नाही तर तेव्हा इंटरनेटवर दोघांचा फोटो तुफान व्हायरल झाला होता. त्या गोष्टीला अनेक वर्ष झाली आहेत. पण तरी देखील आजही सोशल मीडियावर पूजा भट्ट – महेश भट्ट यांचा फोटो तुफान व्हायरल होत असतो.

१९९० मध्ये वडिलांसोबत केलेल्या लिपलॉकवर अभिनेत्रीने अनेक वर्षांनंतर मौन सोडलं आहे. ‘ज्या गोष्टी घडत असतात, त्यांना चांगली – वाईट अशा दोन्ही बाजू असतात. शाहरुख खान याने मला एकदा सांगितलं होतं मुली लहान असतात तेव्हा आई – वडिलांना सांगत असतात मला किस करा… मी आजही स्वतःला लहान मुलगी समजते…’ (father mahesh bhatt )

हे सुद्धा वाचा

पुढे पूजा भट्ट म्हणाली, ‘आयुष्याच्या या टप्प्यावर देखील मी वडिलांसाठी लहानच आहे. माझे वडील देखील माझ्यासाठी तेच व्यक्ती राहतील. माझ्यासाठी तो फक्त एक क्षण होता, जो उत्तम प्रकारे कॅमेऱ्यात कैद झाला होता… लोकांनी ते वाचलं, पाहिलं… ते कायम असं करत राहतील.. मी त्यावर पांघरुण घालायला बसली नाही..’

‘जर लोकं वडील आणि मुलीच्या नात्याला वेगळ्या नजरेने पाहत असतील तर त्याला आपण काहीही करु शकत नाही….’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. सांगायचं झालं तर दोघांचा लिपलॉकचा फोटो व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र खळबळ माजली होती. आजही पूजा लिपलॉकच्या फोटोमुळे चर्चेत असतो. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त पूजा भट्ट हिच्या वक्तव्याची चर्चा रंगत आहे.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.