Bigg Boss OTT 2 | रातोरात बिग बॉसच्या घरातून पूजा भट्टचा पत्ता कट; मोठं कारण आलं समोर

बिग बॉस ओटीटीचा दुसरा सिझन सुरू होऊन फक्त चार आठवडे झाले आहेत. या सिझनची लोकप्रियता पाहता निर्मात्यांनी हा शो आणखी दोन आठवड्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यातील स्पर्धक आणि त्यांच्या कारनाम्यांमुळे हा शो सोशल मीडियावर दररोज चर्चेत असतो.

Bigg Boss OTT 2 | रातोरात बिग बॉसच्या घरातून पूजा भट्टचा पत्ता कट; मोठं कारण आलं समोर
Pooja Bhatt Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 25, 2023 | 11:40 AM

मुंबई | 25 जुलै 2023 : सलमान खानचा ‘बिग बॉस ओटीटी 2’ हा शो प्रेक्षकांसाठी फारच मनोरंजक ठरतोय. या शोमध्ये दररोज नवीन ड्रामा पहायला मिळतो. बिग बॉसच्या घरात प्रत्येक दिवसानुसार स्पर्धकांमधील नाती बदलताना दिसतायत. नुकतंच ‘वीकेंड का वार’ एपिसोडमध्ये फलक नाज घराबाहेर पडली. त्यानंतर आता प्रेक्षकांची आवडती स्पर्धक पूजा भट्ट अचानक या शोमधून बाहेर पडली आहे. बिग बॉसच्या घरातील इतर स्पर्धकांसाठी आणि प्रेक्षकांसाठीही ही बाब आश्चर्यकारक आहे. पूजाने अचानक हा शो सोडला असून ती पुन्हा घरात एण्ट्री करणार की नाही याबद्दल काहीच स्पष्टता नाही. मात्र तिने मधेच हा शो का सोडला, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या सिझनमध्ये पूजा भट्ट ही सर्वांत स्ट्राँग स्पर्धक मानली जात होती. घरात कोणत्याही मुद्द्यावर चर्चा असो किंवा स्पर्धकांमधील वाद, पूजाने प्रत्येक आव्हान स्वीकारलं. पूजाने आरोग्याच्या कारणामुळे हा शो मध्येच सोडल्याचं म्हटलं जात आहे. तिच्या एग्झिटचा सर्वांत मोठा धक्का बेबिका धुर्वेला बसला आहे. बिग बॉसच्या घरात नेहमीच मोठा वाद करणाऱ्या बेबिकाला पूजाच शांत करायची. तिच्या मागे पूजा खंबीरपणे उभी राहायची. पूजा सध्या बिग बॉसच्या घराबाहेर पडली असली तरी काही वैद्यकीय चाचण्या झाल्यानंतर ती पुन्हा घरात येणार असल्याचं कळतंय.

याआधी पूजाबद्दल अशीही चर्चा होती की तिने बिग बॉस या शोसोबत फक्त काही दिवसांचा करार केला होता. त्यानुसार ती घराबाहेर पडली. मात्र तिच्या जाण्यामागच्या कारणाबद्दल निर्मात्यांकडून अद्याप कोणतीच अधिकृत माहिती समोर आली नाही. काही दिवसांपूर्वी सायरस ब्रोचासुद्धा बिग बॉसच्या घराबाहेर पडला होता. वीकेंड का वार एपिसोडमध्ये सर्वांत कमी मतं मिळाल्याने फलक नाज घराबाहेर पडली. ती बाहेर जाताच अविनाश सचदेव आणि जिया शंकर यांच्यातील जवळीक वाढल्याचं पहायला मिळालं.

हे सुद्धा वाचा

या स्पर्धकाला मिळतायत सर्वाधिक मतं

बिग बॉस ओटीटीचा दुसरा सिझन सुरू होऊन फक्त चार आठवडे झाले आहेत. या सिझनची लोकप्रियता पाहता निर्मात्यांनी हा शो आणखी दोन आठवड्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यातील स्पर्धक आणि त्यांच्या कारनाम्यांमुळे हा शो सोशल मीडियावर दररोज चर्चेत असतो. एल्विश यादव आणि आशिका भाटिया यांच्या वाइल्ड कार्ड एण्ट्रीमुळे शो आणखीनच रंजक बनला आहे. सोशल मीडियावर ‘बिग बॉस ओटीटी 2’च्या एका स्पर्धकाला भरभरून प्रेम मिळतंय. जवळपास एक दशलक्षांहून अधिक युजर्सनी या स्पर्धकाला आधीच विजेता म्हणून घोषित केलं आहे. हा लोकप्रिय स्पर्धक दुसरा-तिसरा कोणी नसून सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि युट्यूबर एल्विश यादव आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.