Bigg Boss OTT 2 | “लोक मला दारुडी म्हणायचे”; व्यसनाबाबत पूजा भट्टने केला खुलासा

सायरस ब्रोचा आणि घरातील इतर स्पर्धकांसोबत गप्पा मारताना पूजा म्हणाली, "मला दारुचं व्यसन होतं. ही बाब मी स्वत: स्वीकारली आणि त्यातून बाहेर पडण्यासाठीही प्रयत्न केले. अखेर वयाच्या 44 व्या वर्षी मला त्यातून बाहेर पडता आलं."

Bigg Boss OTT 2 | लोक मला दारुडी म्हणायचे; व्यसनाबाबत पूजा भट्टने केला खुलासा
Pooja BhattImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 19, 2023 | 1:22 PM

मुंबई : सलमान खान सूत्रसंचालन करत असलेला ‘बिग बॉस ओटीटी’चा दुसरा सिझन 17 जूनपासून सुरू झाला. या दुसऱ्या सिझनमध्ये टीव्ही स्टार्सपासून, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सपर्यंत बऱ्याच सेलिब्रिटींनी भाग घेतला आहे. प्रीमिअर एपिसोडपासूनच या शोने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. या पहिल्या एपिसोडमध्येच अभिनेत्री पूजा भट्टने तिच्या खासगी आयुष्याविषयी खुलासा केला. वयाच्या 44 व्या वर्षी दारुच्या व्यसनातून बाहेर पडण्याला यश मिळालं, असं तिने सांगितलं. “मला दारुचं खूप व्यसन होतं”, ही बाब तिने सर्वांसमोर स्वीकारली.

“मला दारुचं व्यसन होतं”

सायरस ब्रोचा आणि घरातील इतर स्पर्धकांसोबत गप्पा मारताना पूजा म्हणाली, “मला दारुचं व्यसन होतं. ही बाब मी स्वत: स्वीकारली आणि त्यातून बाहेर पडण्यासाठीही प्रयत्न केले. अखेर वयाच्या 44 व्या वर्षी मला त्यातून बाहेर पडता आलं. समाजाने पुरुषांना जणू लायसन्सचं दिला आहे आणि त्यामुळे फक्त तेच दारुच्या व्यसनाबद्दल बोलताना दिसतात. पण महिला पुरुषांप्रमाणे खुलेपणानं मद्यपान करत नाहीत आणि त्यामुळेच त्यांना व्यसनातून बाहेर पडायलाही कठीण जातं. मी सर्वांसमोर मद्यपान करायचे, त्यामुळे त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्नसुद्धा सर्वांसमोरच केले.”

“लोक मला दारुडी म्हणायचे”

“लोक मला दारुडी म्हणायचे. तेव्हा मी त्यांना सांगायचे की मी दारुच्या व्यसनातून बाहेर पडतेय”, असं तिने पुढे सांगितलं. वयाच्या 44 व्या वर्षी दारुच्या व्यसनातून बाहेर पडल्याचा खुलासा पूजा भट्टने या शोमध्ये केला. बिग बॉस ओटीटी 2 च्या प्रीमिअर एपिसोडमध्ये दिबांग, अजय जडेजा, सनी लिओनी, पूजा भट्ट, मुकेश छाबडा, एमसी स्टॅन यांच्यासह बरेच सेलिब्रिटी पॅनलिस्टच्या रुपात दिसले. तर बिग बॉसच्या घरात सहभागी झालेल्या 13 स्पर्धकांमध्ये अविनाश सचदेव, पलक पुरसवानी, बेबिका धुर्वे, जिया शंकर, आलिया सिद्दिकी, फलक नाज, आकांक्षा पुरी, जद हदिद, सायरल ब्रोचा, मनिषा राणी, अभिषेक मल्हान, पुनीत सुपरस्टार यांचा समावेश आहे.

हे सुद्धा वाचा

2016 मध्ये पूजा भट्टने दारूचं व्यसन सोडलं होतं. “2 वर्षे आणि 10 महिन्यांनंतर, आपल्या भूतकाळाला प्रतिबिंबित करण्याची आणि आत्मसात करण्याची वेळ आली आहे. जर तुमच्यापैकी कोणीही तुमच्या वाईट सवयींशी झगडत असेल तर समजून घ्या की यामध्ये तुम्ही एकटे नाही आहात. मी हे करू शकलो तर तुम्हीही करू शकता. जर हे तुम्हाला त्रास देत असेल तर, धीर सोडू नका आणि पुढे जा.” असं तिने म्हटलं होतं

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.