Pooja Hegde हिच्या जीवाला धोका? परदेशात नक्की काय घडलं, चाहत्यांकडून चिंता व्यक्त

Pooja Hegde : सलमान खान याच्या अभिनेत्रीच्या जीवाला धोका, नक्की काय आहे प्रकरण? चाहत्यांनी व्यक्त केली चिंता.., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त पूजा हेगडे हिची चर्चा... अभिनेत्रीच्या टीमने सांगितलं नक्की काय आहे प्रकरण...

Pooja Hegde हिच्या जीवाला धोका? परदेशात नक्की काय घडलं, चाहत्यांकडून चिंता व्यक्त
Follow us
| Updated on: Dec 14, 2023 | 10:55 AM

मुंबई| 14 डिसेंबर 2023 : ‘किसी का भाई किसी की जान’ फेम अभिनेत्री पूजा हेगडे हिने अभिनेता सलमान खान याच्यासोबत स्क्रिन शेअर केल्यामुळे प्रसिद्धी झोतात आली होती. दोघांच्या जोडीला देखील चाहत्यांनी डोक्यावर घेतले. पण आता अभिनेत्रीबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे. पूजा हिच्या जीवाला धोका असल्याची माहिती मिळत आहे. पूजा हेगडेला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याची माहिती समोर येत आहे. परदेशातून पूजा हिच्या जीवला धोका असल्याची चर्चा रंगत आहे. तर संपूर्ण प्रकरण नक्की काय आहे याचा खुलासा पूजा हेगडे हिच्या टीमने केला आहे. पण अभिनेत्रीने याप्रकरणी अद्याप मौन धरलं आहे.

पूजा हेडगे हिला मिळाली जीवे मारण्याची धमकी

पूजा हेगडे हिला जीवे मारण्याच्या धमकी बुधवारी दुपारपासून चर्चेत आहेत. विरल भयानी यांच्या एका पापाराझीने याबद्दल चर्चा केल्यामुळे पूजा हिच्या जीवाला धोका असल्याची बातमी सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली. पूजा एका क्लबच्या उद्घाटनासाठी दुबई याठिकाणी गेली होती. तेव्हा तेथील लोकांसोबत वाद झाल्यामुळे पूजा हिला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याची माहिती समोर आली होती.

पूजा हिला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती मिळताच चाहत्यांनी चिंता व्यक्त करण्यास सुरुवात केली. रंगणाऱ्या चर्चांदरम्यान, पूजा हेगडे हिच्या चाहत्यांसाठी एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. पूजा हेगडेच्या टीमने अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे स्पष्ट केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘ही फेक न्यूज कोणी सुरू केली हे आम्हाला माहित नाही. हे पूर्णपणे खोटं आहे. विरल भयानी यांची पोस्टही डिलीट करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

पूजा हेगडे हिचे आगामी सिनेमे

पूजा हेगडे हिचे सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री सलमान खान स्टारर ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस आली होती. सिनेमात पूजा हिने सलमानच्या गर्लफ्रेंडच्या भूमिकेला न्याय दिला होता. सिनेमात वेंकटेश दग्गुबाती, शहनाज गिल, राघव जुयाल, पलक तिवारी, जस्सी गिल, सिद्धार्थ निगम, विनाली भटनागर आणि विजेंदर सिंह यांनी देखील महत्त्वाची भूमिका दिली होती. आता पूजा अभिनेता शाहीद कपूर याच्यासोबत ‘देवा’ सिनेमात दिसणार आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.