Mangal Dhillon | वाढदिवसाच्या आठवडाभरापूर्वी दिग्गज अभिनेत्याचं निधन; कॅन्सरशी झुंज अपयशी

टीव्ही इंडस्ट्रीत काम करत असताना त्यांना चित्रपटांचे ऑफर्स मिळू लागले होते. 1988 मध्ये त्यांनी 'खून भरी मांग' या चित्रपटात पहिल्यांदा भूमिका साकारली होती. यामध्ये ते वकिलाच्या भूमिकेत झळकले होते.

Mangal Dhillon | वाढदिवसाच्या आठवडाभरापूर्वी दिग्गज अभिनेत्याचं निधन; कॅन्सरशी झुंज अपयशी
मंगल ढिल्लनImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jun 11, 2023 | 9:40 AM

लुधियाना : मालिका आणि चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारलेले अभिनेते मंगल ढिल्लन यांचं आज (रविवार) निधन झालं. गेल्या काही काळापासून ते कॅन्सरशी झुंज देत होते. जवळपास महिनाभरापासून ते लुधियाना इथल्या एका रुग्णालयात दाखल होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती आणखी खालावली. अखेर रविवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बॉलिवूड अभिनेते यशपाल शर्मा यांनी त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला. फेसबुकवर पोस्ट लिहित त्यांनी मंगल ढिल्लन यांच्या निधनाची माहिती दिली आहे. वाढदिवस अवघ्या आठवडाभरावर असताना मंगल यांची प्राणज्योत मालवली.

मंगल ढिल्लन हे पंजाबी फिल्म इंडस्ट्रीत प्रसिद्ध होते. त्यांनी बऱ्याच पंजाबी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. इतकंच नव्हे तर त्यांनी चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शनही केलं आहे. ते मूळचे पंजाबमधील फरीदकोट इथले होते. त्यांचा जन्म पंजाबमधील फरीदकोट जिल्ह्यातील वांडर जटाना गावातील एका शीख कुटुंबात झाला. चौथीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते वडिलांसोबत उत्तरप्रदेशला गेले. तिथे शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते पुन्हा पंजाबला परतले. पदवीनंतर मंगल यांनी दिल्लीत थिएटरमध्ये काम केलं.

मंगल ढिल्लन यांना 1986 मध्ये पहिला ब्रेक मिळाला. कथा सागर या टीव्ही मालिकेत त्यांनी काम केलं. पण त्याचवर्षी प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ‘बुनियाद’ या मालिकेमुळे त्यांना लोकप्रियता मिळाली. यानंतर त्यांनी किस्मत, द ग्रेट मराठा, मुजरिम हाजीर, नूरजहाँ यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. टीव्ही इंडस्ट्रीत काम करत असताना त्यांना चित्रपटांचे ऑफर्स मिळू लागले होते. 1988 मध्ये त्यांनी ‘खून भरी मांग’ या चित्रपटात पहिल्यांदा भूमिका साकारली होती. यामध्ये ते वकिलाच्या भूमिकेत झळकले होते.

हे सुद्धा वाचा

याशिवाय घायल महिला, दयाबान, आझाद देश के गुलाम, प्यार का देवता, अकेला, दिल तेरा आशिक, दलाल, विश्वात्मा, निशाना यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी दमदार भूमिका साकारल्या आहेत. बहुतांश चित्रपटांमध्ये त्यांनी खलनायकाच्या भूमिका केल्या आहेत. 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तुफान सिंग’ या चित्रपटात ते शेवटचे झळकले होते.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.