प्रसिद्ध अभिनेत्याचा हॉटेलच्या खाली कारमध्ये मृतदेह आढळला, घातपात की…? तपास सुरू

प्रसिद्ध अभिनेत्याचं वयाच्या 45 व्या हृदयद्रावक निधन... हॉटेलच्या खाली कारमध्ये आढळला मृतदेह, निधनाचं कारण...; अभिनेत्याच्या निधनामुळे सर्वत्र खळबळ... पोलिसांकडून कसून चौकशी सुरू... अभिनेत्याच्या निधनाची बातमी समोर येताच चाहते, कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

प्रसिद्ध अभिनेत्याचा हॉटेलच्या खाली कारमध्ये मृतदेह आढळला, घातपात की...? तपास सुरू
Follow us
| Updated on: Nov 19, 2023 | 10:09 AM

मुंबई | 19 नोव्हेंबर 2023 : झगमगत्या विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका प्रसिद्ध अभिनेत्याचं हृदयद्रावक निधन झालं आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. अभिनेत्याचं निधन नक्की कोणत्या कारणामुळे झालं… याची चौकशी सध्या पोलीस करत आहेत. प्रसिद्ध मल्याळम चित्रपट अभिनेते विनोद थॉमस यांचं निधन झालं आहे. हॉटेल खाली उभ्या असलेल्या एका कार जवळ अभिनेत्याचा मृतदेह पोलिसांना आढळला होता. याप्रकरणी पोलीस सध्या कसून चौकशी करत असून, अभिनेत्यानं निधन नक्की कोणत्या कारणामुळे झालं याचा तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेलच्या पार्किंगमध्ये कार उभी होती. कारमध्ये एक व्यक्ती असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. उशीरापर्यंत व्यक्ती कारमधून बाहेत येत नसल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. तेव्हा घटनास्थळी जाऊन पोलिसांनी पाहिलं आणि अभिनेत्याला कारमधून बाहेर काढलं.

अभिनेत्याला बाहेर काढल्यानंतर पोलीसांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. पण तेव्हापर्यंत फार उशीर झाला होता. रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी अभिनेत्याला मृत घोषित केलं. अभिनेत्याच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ माजली असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

हे सुद्धा वाचा

मिळालेल्या माहितीनुसार

अभिनेते विनोद थॉमस यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. अद्याप विनोद थॉमस याचं निधन नक्की का झालं.. याचं कारण समोर आलेलं नाही. विनोद थॉमस यांच्या मृत्यू प्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहेत. विनोद थॉमस यांच्या निधनामुळे चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहेत विनोद थॉमस यांच्या निधनानंतर दुःख व्यक्त करत आहेत. विनोद थॉमस यांच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी ‘अय्यप्पनम कोश्युम’, ‘नाथोली ओरु चेरिया मीनल्ला’, ‘ओरु मुराई वन्थ पथाया’, ‘हॅप्पी वेडिंग’ आणि ‘जून’ यांसारख्या सिनेमामध्ये मुख्य भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.

दरम्यान, अभिनेत्याच्या निधनाचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पण विनोद यांच्या मृतदेह हॉटेल खाली आढळल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. अशाच अभिनेत्याचं निधन झालं आहे की, हत्या करण्यात आली? असा प्रश्न याठिकाणी उपस्थित होत आहे. आता तपासात काय माहिती समोर येत आहे.. याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.