प्रसिद्ध गायकाच्या निधनानंतर सिनेविश्वात खळबळ; मृत्यूचं कारण जाणून व्हाल हैराण

अत्यंत धक्कादायक ! अवघ्या ४० व्या वर्षी प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, निधनाचं धक्कादायक कारणसमोर; सिनेक्षेत्रात खळबळ... . गायकाच्या निधनामुळे चाहत्यांना आणि कुटुंबियांना मोठा धक्का

प्रसिद्ध गायकाच्या निधनानंतर सिनेविश्वात खळबळ; मृत्यूचं कारण जाणून व्हाल हैराण
Follow us
| Updated on: Aug 22, 2023 | 10:13 AM

मुंबई | 22 ऑगस्ट 2023 : सिनेविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक सेलिब्रिटींनी अखेरचा श्वास घेतला. आता देखील एका प्रसिद्ध गायकाचं निधन झलं आहे. वयाच्या ४० व्या वर्षी गायकाने अखेरचा श्वास घेतला. गायकाच्या निधनामुळे चाहत्यांना आणि कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. हरियाणा येथील प्रसिद्ध गायक राजू पंजाबी याचं निधन झालं आहे. मंगळवारी गायकाने अखेरचा श्वास घेतला. एका रुग्णालयात गायकावर उपचार सुरु होते. पण उपचारादरम्यान राजू पंजाबी याचं निधन झालं आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.

प्रकृती खालवल्यामुळे राजू पंजाबी याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण मंगळवारी पहाटे चार वाजता गायकाने अखेरचा श्वास घेतला. ‘देसी-देसी ना बोल्याकर’ गाण्यामुळे गायकाला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं होतं. राजू पंजबी उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध गायक होता. पण आता गायकाने जगाचा अखेरचा निरोप घेतला आहे.

राजू पंजाबी ४० वर्षांचा होते. गेल्या अनेक दिवसांपासून गायकाची प्रकृती खालावली होती. राजूला काविळीचा त्रास होता, त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊन त्याला घरी देखील पाठवण्यात आलं होतं, मात्र त्यानंतर अचानक प्रकृती बिघडल्याने गायकाला पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

हरियाणातील पंजाबी गायकाच्या आकस्मिक निधनाने कुटुंबिय आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. राजू यांच्या पश्चात पत्नी व तीन मुली असा परिवार आहे. राजूच्या मृत्यूची बातमी मिळताच त्यांचे नातेवाईक आणि चाहते गायकाच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचले आहेत. आज राजू पंजाबी याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

धक्कादायक गोष्ट म्हणदे, राजू पंजाबी याने स्वतःचं शेवटचं गाणं १२ ऑगस्ट रोजी रिलीज केलं. रुग्णालयात दाखल असूनही त्याने स्वतःचे गाणं रिलीज केले. राजू पंजाबीच्या शेवटच्या गाण्याचे बोल होते ‘आपसे मिलके यारा हमको अच्छा लगा था’. हे गाणं तयार करण्यासाठी गायकाला तब्बल दोन वर्ष लागली. पण गायकाच्या आयुष्यातील हे शेवटचं गाण असेल हे कोणाला ठाऊक होतं. सध्या सर्वत्र गायकाच्या निधनामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.