Adipurush सिनेमाकडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ; ७ व्या दिवशी फक्त इतक्याच रुपयांची कमाई
प्रभास - क्रिती सनॉन स्टारर 'आदिपुरुष' सिनेमाच्या कमाईला ब्रेक; वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या सिनेमाकडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ... ७ व्या दिवशी मंदावला कमाईचा वेग
मुंबई | अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री क्रिती सनॉन स्टारर ‘आदिपुरुष’ सिनेमा गेल्या काही दिवसांपासून तुफान चर्चेत आहे. सिनेमा प्रदर्शित होवून एक आठवडा पूर्ण झाला आहे. प्रदर्शनानंतर काही दिवस सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला पाहायला मिळाला पण आता सिनेमाच्या कमाईला ब्रेक लागला आहे. सिनेमा प्रदर्शनानंतर सतत वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. ज्यामुळे निर्माते, दिर्गर्शक आणि लेखकांना उत्तरं द्यावी लागत आहेत. सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला असताना देखील बॉक्स ऑफिसवर ‘आदिपुरुष’ने मोठी कमाई केली. पण आता सिनेमाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. सिनेमाच्या कमाईचा वेग आता मंदावताना दिसत आहे.
‘रामायणा’वर आधारित असलेला सिनेमा डायलॉग आणि इतर कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकल्यामुळे ‘आदिपुरुष’ सिनेमाला प्रेक्षकांनी प्रतिसाद दिलेला नाही. सिनेमात निर्मात्यांनी मोठे बदल करण्याचा निर्णय घेतल्यानंतर देखील सिनेमाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. सिनेमाच्या डायलॉगवरून अनेक वाद झाला होता.
‘आदिपुरुष’ सिनेमाच्या डायलॉगमध्ये अनेक बदल केल्यानंतर देखील कमाईला मोठा ब्रेक लागला आहे. दिग्दर्शत ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ सिनेमाने गुरुवारी फक्त ५.५ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. आतापर्यंत भारतात सिनेमाने २६०.५५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर जगभरात सिनेमाने ४०० कोटी रुपयांपर्यंत मजल मारली आहे..
‘आदिपुरुष’ सिनेमाच्या कमाईला ब्रेक लागला आहे असून सिनेमाला बनवण्यासाठी तब्बल ५०० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला होता. अशात सिनेमा येत्या काही दिवसांत किती रुपयांपर्यंत मजल मारू शकतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री क्रिती सनॉन स्टारर ‘आदिपुरुष’ सिनेमा १६ जून रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित करण्यात आला आहे.. सिनेमा देशभरात तब्बल ६ हजार २०० पेक्षा अधिक स्क्रिनवर प्रदर्शित करण्यात आला आहे. ज्यामध्ये ४ हजारांपेक्षा जास्त स्क्रिनवर सिनेमा हिंदी भाषेत प्रदर्शित करण्यात आला आहे..
सध्या सर्वत्र आदिपुरुष सिनेमाची चर्चा रंगली आहे. सिनेमा पाहिल्यानंतर प्रेक्षक देखील नाराजी जाहिर करत आहेत. तर सिनेमातील डायलॉगवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. अशात सिनेमा आणखी किती कोटी रुपयांपर्यंत मजल मारेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.