Prabhu Deva च्या घरात नव्या पाहु्ण्याचं आगमन; वयाच्या ५० व्या वर्षी डान्सर झाला बाबा

प्रभू देवा आणि दुसऱ्या पत्नीच्या आयुष्यात नव्या पाहुण्याची एन्ट्री... वयाच्या ५० व्या वर्षी डान्सर झाला चौथ्यांदा बाबा... सध्या सर्वत्र सेलिब्रिटीच्या खासगी आयुष्यची चर्चा..

Prabhu Deva च्या घरात नव्या पाहु्ण्याचं आगमन; वयाच्या ५० व्या वर्षी डान्सर झाला बाबा
Follow us
| Updated on: Jun 12, 2023 | 3:43 PM

मुंबई | प्रसिद्ध कोरियोग्राफर, दिग्दर्शक आणि अभिनेता प्रभू देवा याच्या घरात नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. वयाच्या ५० व्या वर्षी प्रभू देवा बाबा झाला आहे. प्रभू देवा याची दुसरी पत्नी हिमानी हिने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. मुलीच्या जन्मानंतर प्रभू देवा चौथ्यांदा बाबा झाला आहे. मुलीच्या जन्मामुळे प्रभू देवाच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. खुद्द प्रभू देवा याने बाबा झाल्याची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. सध्या सर्वत्र प्रभू देवा याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगत आहे. घरी गोंडस मुलीचं आगमन झाल्यामुळे चाहत्यांनी देखील प्रभू देवा आणि पत्नीवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

प्रभू देवा तीन मुलांचा बाबा आहे. आता कुटुंबात चौथ्या मुलीचं आगमन झाल्यामुळे प्रभू देवा आनंदी आहे. कुटुंबात मुलीचं आगमन झाल्यानंतर आनंद व्यक्त करत प्रभू देवा म्हणाला, ‘मी बाबा झालोय हे सत्य आहे.. या वयात बाबा झाल्यामुळे मी आनंदी आहे. कुटुंब पूर्ण झाल्याचा आनंद फार वेगळा आहे..’ असं देखील प्रभू देवा म्हणाला.

महत्त्वाचं म्हणजे लेकीसोबत अधिक वेळ व्यतीत करता यावा म्हणून प्रभू देवाना कामाचा व्याप देखील कमी केला आहे. याबद्दल प्रभू देवा म्हणाला, ‘मी माझं काम आता कमी केलं आहे. मला असं वाटलं मी खूप काम करत आहे.. सतत धावत आहे.. आता काम भरपूर झालं… मला आता माझ्या कुटुंबासोबत वेळ व्यतीत करायचा आहे…’

हे सुद्धा वाचा

मिळालेल्या माहितीनुसार, ‘मायकल जॅक्सन’ म्हणून स्वतःची ओळख निर्माण केलेला प्रभू देवा कायम स्वतःचं खासगी आयुष्य गुपित ठेवतो. २०२० मध्ये प्रभू देवाने गुपचूप दुसरं लग्न केलं होतं. दोघांच्या लग्नाबद्दल कोणाला देखील कल्पना नव्हती. प्रभू देवा जेव्हा पत्नीसोबत बालाजीच्या दर्शनाला आला होता तेव्हा दोघांना पहिल्यांदा कॅमेऱ्यात कैद करण्यात आलं होतं.

पण तेव्हा प्रभू देवा याच्या दुसऱ्या पत्नीने मास्क लावला होता. त्यांची दुसरी पत्नी हिमानी सिंग आहे. हिमानी डॉक्टर असल्याची चर्चा रंगत आहे. प्रभू देवा याचं पहिलं लग्न १९९५ मध्ये रामलता हिच्यासोबत झालं होतं. रामलता एक प्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगना आहे. मुस्लीम धर्मातील असलेल्या रामलातने प्रभूसोबत लग्न करण्यासाठी हिंदू धर्म स्वीकारला. मात्र, लग्नाच्या 16 वर्षांनी प्रभू आणि त्यांची पत्नी रामलत यांचा घटस्फोट झाला. प्रभू यांना पहिल्या पत्नीपासून तीन मुले आहेत.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.