प्राजक्ता माळी मुख्यमंत्र्यांना म्हणते शिवजयंतीनिमित्त तुम्ही रंगकर्मींना आनंदी बातमी द्या; आम्हालाच तेवढा वेगळा नियम का? प्राजक्ताचा सवाल

मुंबईः अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी आता चित्रपटगृह आणि नाट्यगृहे पूर्णक्षमतेने चालू करावी यासाठी थेट मुख्यमंत्र्यांनाच विनंती केली आहे. सध्या नाट्यगृहे (Theater) आणि चित्रपटगृहे सोडून सगळ्या प्रकारे व्यवहार पूर्ण क्षमतेने सुरू झाले आहेत मग यामध्ये चित्रपटगृह आणि नाट्यगृह तेवढी बंद का असा सवाल करुन नाट्यगृहे आणि चित्रपटगृह चालू करण्यासाठी मुख्यमंत्री (Chief Minister) उद्धव ठाकरे यांना विनंती […]

प्राजक्ता माळी मुख्यमंत्र्यांना म्हणते शिवजयंतीनिमित्त तुम्ही रंगकर्मींना आनंदी बातमी द्या; आम्हालाच तेवढा वेगळा नियम का? प्राजक्ताचा सवाल
Follow us
| Updated on: Feb 13, 2022 | 6:50 PM

मुंबईः अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी आता चित्रपटगृह आणि नाट्यगृहे पूर्णक्षमतेने चालू करावी यासाठी थेट मुख्यमंत्र्यांनाच विनंती केली आहे. सध्या नाट्यगृहे (Theater) आणि चित्रपटगृहे सोडून सगळ्या प्रकारे व्यवहार पूर्ण क्षमतेने सुरू झाले आहेत मग यामध्ये चित्रपटगृह आणि नाट्यगृह तेवढी बंद का असा सवाल करुन नाट्यगृहे आणि चित्रपटगृह चालू करण्यासाठी मुख्यमंत्री (Chief Minister) उद्धव ठाकरे यांना विनंती केली आहे. गेल्या कित्येक दिवसापासून नाट्य आणि चित्रपटगृह पूर्ण क्षमतेने चालू नव्हती त्यामुळे कलाकार आणि चित्रपटनिर्मात्यांना (Film Producer) तोटा सहन करावा लागला आहे.

चित्रपट आणि नाट्य निर्मात्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्याने अनेक कलाकारांनी थिएटर चालू करण्याची मागणी केली आहे.  नाट्यगृह आणि थिएटर पूर्णक्षमतेने चालू करण्याची मागणी प्राजक्ता माळी यांच्याबरोबरच अनेक कलाकारांनी केली आहे. यामुळे तयार असलेली नाटक आणि चित्रपट थिएटरशिवाय तसेच पडून आहेत. कोट्यवधींची गुंतवणूक असलेले अनेक चित्रपट फक्त पूर्णक्षमतेने थिएटर चालू नसल्यामुळे प्रदर्शनाशिवाय ते पडून आहेत.

कोरोनामुळे मोठे संकट ओढवले

प्राजक्ता माळी यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे की, येणाऱ्या शिवजयंतीनिमित्त शिवप्रेमी, नाट्य, चित्रपटनिर्माते आणि रंगकर्मी यांना चित्रपट आणि नाट्यगृह चालू करुन तुम्ही आनंदाची बातमी द्या असं सांगण्यात आले आहे. कारण नाट्य आणि चित्रपटसृष्टीवर कोरोनामुळे मोठे संकट ओढवले आहे. अनेक नाटकांचे प्रयोग रद्द करावे लागल्याने त्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे.

शिवजयंतीनिमित्त शिवप्रेमींना आनंदाची बातमी द्या

चित्रपटनिर्मात्यांनीही कोट्यवधींची गुंतवणूक करुनही थिएटर पूर्ण क्षमतेने चालू नसल्यामुळे त्यांची गुंतवणूक ही फायदा देणारी ठरली नाही. प्राजक्ता माळी यांनी व्हिडिओमध्ये नाट्य आणि चित्रपटगृहाबद्दल आपली भावना व्यक्त करताना त्या म्हणाल्या की, सगळे व्यवहार सुरळीत चालू असताना फक्त थिएटरच तेवढी बंद का करण्यात आली आहेत. त्यामुळे येणाऱ्या शिवजयंतीनिमित्त शिवप्रेमींसर नाट्य आणि चित्रपटनिर्मात्यांना तुम्ही आनंदाची बातमी देऊन थिएटर चालू करावी अशी विनंती केली आहे.

थिएटरसाठी वेगळा नियम का

राजकीय मेळावे, हॉटेल्स, पार्ट्या हे सगळं सुरळीत चालू आहे, मग थिएटरला तेवढीच 50 ‘टक्के अशी का परवानगी आहे असा सवाल कलाकार आणि निर्माते करत आहेत. 50 टक्क्यानी थिएटर चालू असली तरी त्यातून फायदा होतो असे होत नाही त्यामुळेच प्राजक्ता माळीनी थेट मुख्यमंत्र्यांनाच थिएटरसाठी साद घातली आहे.

संबंधित बातम्या

राजश्री खरात होय तिच, फँड्रीतील साधी भोळी शालू, आता नव्या लूकमध्ये बघाल तर विश्वास बसणार नाही…

राजकीय मेळाव्यांना खच्चून गर्दी होते, रेस्टॉरंट, पब्ज सुरू आहेत, मग चित्रपटगृह का सुरू होत नाही?; मनसेचा सवाल

Reaction : कंगनाच्या निशाण्यावर आता दीपिका पादुकोण, म्हणाली कचरा विकू नकोस…, वाचा नेमका वाद काय?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.