Prasad Oak: “..असं असेल तर मग मी हिंदीत का काम करावं?”; प्रसाद ओकची रोखठोक भूमिका

मराठी आणि हिंदी कलाविश्वातील मानधनात असलेला फरक हा अनेकदा चर्चेचा विषय ठरला आहे. यावर आता अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) व्यक्त झाला आहे. प्रसादने 'दिया और बाती हम' या हिंदी मालिकेत भूमिका साकारली होती. या मालिकेनंतर त्याने हिंदीत पुन्हा काम केलं नाही.

Prasad Oak: ..असं असेल तर मग मी हिंदीत का काम करावं?; प्रसाद ओकची रोखठोक भूमिका
Prasad OakImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 13, 2022 | 8:54 AM

मराठी आणि हिंदी कलाविश्वातील मानधनात असलेला फरक हा अनेकदा चर्चेचा विषय ठरला आहे. यावर आता अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) व्यक्त झाला आहे. प्रसादने ‘दिया और बाती हम’ या हिंदी मालिकेत भूमिका साकारली होती. या मालिकेनंतर त्याने हिंदीत पुन्हा काम केलं नाही. “मराठी इंडस्ट्रीत (Marathi Industry) मी खूश आहे आणि हिंदीत काम करण्याची सध्या तरी काही इच्छा नाही”, असं तो म्हणाला. यामागचं कारण विचारलं असता प्रसाद म्हणाला, “हिंदी टीव्ही इंडस्ट्रीत (Hindi TV) मराठी कलाकारांचा आर्थिकदृष्ट्या कमी विचार केला जातो. एखाद्या भूमिकेसाठी ते हिंदी कलाकारांना मराठी कलाकारापेक्षा जास्त मानधन देतील. हिंदी टेलिव्हिजनवर मराठी कलाकारांना मात्र कमीच मानधन मिळतं.”

“..मग मी हिंदीत का काम करावं?”

मानधनातील या फरकाबद्दल सांगताना तो पुढे म्हणाला, “मानधनात इतका फरक का आहे, याचा मी विचार केला. यापेक्षा जास्त मानधन तर मला मराठीत मिळत आहे, मग मी हिंदीत का काम करावं? हिंदी शोजपेक्षा मला मराठी टीव्ही शोजमध्ये अधिक मानधन मिळू लागलं. आर्थिकदृष्ट्या मी माझं नुकसान का करून घ्यावं? मी कमी पैशात काम करतो, ही बाब मला पसरवायची नव्हती. खरं सांगायचं झालं तर हिंदी टीव्हीमधून मला फार काही ऑफर्स आल्या नाहीत. त्यामागचं कारण मला माहित नाही. मी त्याबद्दल कधी इतका विचारसुद्धा केला नाही. मला ते महत्त्वाचं वाटत नाही. हिंदी इंडस्ट्रीत काम करण्यासाठी मी उत्सुक आहे, अशीही गोष्ट नाही. मी माझ्या भाषेत काम करून खूश आहे आणि त्यासाठी मला लोकांकडून खूप प्रेम मिळतंय.”

असं असलं तरी भविष्यात एखादी चांगली ऑफर आली आणि त्यांनी मला माझ्या कुवतीनुसार मानधन दिलं तर मी नक्की ती ऑफर स्वीकारेन, असंही प्रसादने यावेळी सांगितलं. “हिंदी शोजमध्ये काम करण्यापेक्षा मी हिंदी चित्रपटात छोटी भूमिका साकारण्याला प्राधान्य देईन. मला हिंदी चित्रपट किंवा शोजचं दिग्दर्शन करायलाही आवडेल”, असंही तो म्हणाला. प्रसादने हिरकणी, कच्चा लिंबू यांसारख्या मराठी चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. लवकरच त्याचा ‘चंद्रमुखी’ हा चित्रपटसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून तो या चित्रपटावर काम करतोय.

हेही वाचा:

Mulgi Jhali Ho: अजय पूरकर यांनी ‘मुलगी झाली हो’ मालिकेचा घेतला निरोप

‘तुझ्या माझ्या संसाराला..’मध्ये रेवाच्या एण्ट्रीमुळे सिड-अदितीमध्ये रंगणार चुरस

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.