‘काय सहन करावं लागलंय’; प्रतीक बब्बरच्या पत्नीचे सासरे राज बब्बरवर गंभीर आरोप
प्रतीक बब्बर आणि प्रिया बॅनर्जी यांच्या लग्नात प्रतीकचे वडील राज बब्बर आणि कोणीच कुटुंबिय उपस्थित नव्हते. पण त्यांना न बोलवण्यावरून दोघांनाही फार ट्रोल करण्यात आलं होतं. पण नेमकं यामागे काय कारणे आहेत. याबद्दल अखेर प्रिया आमि प्रतिकने सगळंच काही बोलून टाकलं.

प्रतीक बब्बर आणि प्रिया बॅनर्जी यांचे लग्न 14 फेब्रुवारी 2025 रोजी मुंबईत झालं. हे लग्न प्रतीकच्या दिवंगत आई स्मिता पाटील यांच्या घरी झालं. प्रतीकचे वडील, ज्येष्ठ अभिनेते आणि राजकारणी राज बब्बर, सावत्र भाऊ आर्य बब्बर आणि बहीण जुही बब्बर लग्नाला उपस्थित राहिले नाहीत. प्रतीकने कोणत्याही कुटंबातील व्यक्तीला लग्नासाठी बोलावलं नाही. यामुळे सोशल मीडियावर बरीच चर्चाही झाली. प्रतीक आणि प्रियाचे जवळचे मित्र तेवढे उपस्थित होते. त्यानंतर प्रतीक आणि प्रियाला याबद्दल अनेकदा विचारणाही झाली आहे. पण तेव्हा त्यांनी जी काही उत्तरे दिली नव्हती. पण आता राज बब्बरला लग्नाला आमंत्रित न करण्याबद्दल हे दोघेही एका मुलाखतीत उघडपणे बोलले आहेत.
प्रियाने सांगितलं राज बब्बर यांना लग्नाला न बोलवण्याचं कारण
एका मुलाखतीत जेव्हा प्रतीक बब्बरला त्याचे वडील राज बब्बर यांना लग्नाला आमंत्रित न करण्याबद्दल विचारलं असता त्याची बायको प्रियाने मध्यस्थी केली अन् म्हणाली “नाही, अजिबात नाही. आम्हाला त्याबद्दल बोलायचं नाही. आणि ते आमचे ठिकाण नाही. हे सर्व ऑनलाइन आहे. हे सर्व इंटरनेटवर आहे. लोक जाऊन काही लेख वाचू शकतात आणि एखाद्याच्या आयुष्यात काय घडले ते जाणून घेऊ शकतात.”
“आम्ही आनंदी आहोत….”
प्रिया पुढे म्हणाली, “कोणीही कोणावर सहज चुकीची कमेंट करू शकतात का? त्यांची एक चुकीची कमेंट एखाद्याचा अख्खा दिवस वाईट करू शकतात.कोणालाही कोणाबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. जर प्रतीक गप्प बसू इच्छित असेल, मला गप्प बसायचं असेल, तर ते केवळ डिग्निटीसाठी. बस्स, आम्हाला त्याबद्दल बोलायचे नाही कारण आम्ही आनंदी आहोत.”असं म्हणत तिने प्रतिक आणि त्यांच्या वडिलांच्या नात्यावर कोणीही बोलू नये अशी विनंती केली आहे.
“ते कुटुंब कधीच नव्हतं….”
तसेच प्रतीकला असेही विचारण्यात आलं की त्याचे कुटुंबाशी असलेले नाते बदलेल का? तेव्हा ही प्रियानेच उत्तर देत म्हटलं “बदलण्यासारखे काहीही नाही. तिथे कधीच काहीही नव्हते. म्हणून, जेव्हा लोक ‘तू हे कोणाशी तरी केलेस’ अशा टिका करतात तेव्हा मी गोंधळून जाते. पण नाही, ते कुटुंब कधीच नव्हतं, ती व्यक्ती (राज बब्बरकडे इशारा करत) त्याच्या आयुष्यात कधीच नव्हती. म्हणून, 30 वर्षांनंतर आता हा प्रश्न का उपस्थित केला जात आहे हे मला समजत नाही. आपल्याला आनंदी राहावे लागेल. आपल्याला संपूर्ण जगाला स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. आपण येथे कोणालाही उत्तर देण्यासाठी नाही आहोत. कोणीही आपले बिल भरत नाही.”
“लहानपणीच आई गमावल्यावर मुलाला काय सहन करावं लागलं….”
प्रियाने राज बब्बर आणि त्यांच्या कुटुंबासोबतचे तिचे नाते गुंतागुंतीचे असल्याचं म्हटलं आहे. “हे एखाद्याच्या आयुष्याबद्दलची गोष्ट आहे. एखाद्याने 30 वर्षांपासून दुःख सहन केले आहे. लहानपणीच आई गमावल्यावर मुलाला काय सहन करावे लागते हे फार कमी लोकांना समजेल, बरोबर ना? ट्रोल करणाऱ्या आणि प्रश्न विचारणाऱ्या सर्वांना मी हा प्रश्न विचारू इच्छितो. तुम्ही दोन आठवड्यांचे असताना तुमची आई गमावली का? आणि जर नसेल तर मला वाटत नाही की तुम्हाला येथे टिप्पणी करण्याचा अधिकार आहे.”
“सध्या परिस्थिती खूप गुंतागुंतीची आहे”
त्यानंतर प्रतीक बब्बर म्हणाला की, “सध्या परिस्थिती खूप गुंतागुंतीची आहे आणि प्रियाने म्हटल्याप्रमाणे, जेव्हा मी अशा गोष्टींबद्दल बोलण्यास तयार असतो ज्यांबद्दल मी यापूर्वी कधीही बोललो नाही आणि ज्यांबद्दल बोलण्याची गरज आहे, तेव्हा ते केवळ माझ्यासाठीच नाही तर सर्वांसाठी, अगदी त्या कुटुंबाचीही परिस्थिती स्पष्ट करेल”. प्रिया आणि प्रतिक बब्बरच्या बोलण्यावरून ते राज बब्बर आणि एकंदरितच संपूर्ण कुटुंबावर फारच नाराज असल्याचं आणि त्यांच्यात असलेला दुरावा स्पष्ट झाला आहे.