Dilip Kumar | दिलीप कुमार यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करा, सायरा बानो यांचे चाहत्यांना आवाहन

हिंदी चित्रपट जगातील प्रसिध्द अभिनेते दिलीप कुमार आणि सायरा बानो यांचे 54 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. चित्रपट सृष्टीतील कलाकारांचे काही वर्षांत लग्न मोडण्याच्या घटना आपण पाहतो. मात्र दिलीप कुमार आणि सायरा बानो यांची जोडी अशा कलाकारांसाठी एक उदाहरण आहे.

Dilip Kumar | दिलीप कुमार यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करा, सायरा बानो यांचे चाहत्यांना आवाहन
Follow us
| Updated on: Dec 07, 2020 | 3:15 PM

मुंबई : हिंदी चित्रपट जगातील प्रसिध्द अभिनेते दिलीप कुमार आणि सायरा बानो यांचे 54 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. चित्रपट सृष्टीतील कलाकारांचे काही वर्षांत लग्न मोडण्याच्या घटना आपण पाहतो. मात्र दिलीप कुमार आणि सायरा बानो यांची जोडी अशा कलाकारांसाठी एक उदाहरण आहे. आता दिलीपकुमार हे 98 वर्षांचे आहेत आणि अशा परिस्थितीत त्यांची काळजी घ्यावी लागते. आणि आजकाल त्यांची तब्येत व्यवस्थित राहत नसल्याची माहिता सायरा बानो यांनी दिली आहे. (Pray for Dilip Kumar’s health, Saira Bano’s appeal to fans)

टीओआई माहितानुसार सायरा म्हणाली की, दिलीपकुमारची प्रकृती ठीक नाही, त्यांची खूप काळजी घ्यावी लागत आहे. दिलीपकुमार यांच्यामध्ये रोगप्रतिकारशक्तीचा अभाव असल्याचे त्यांनी सांगितले.

दिलीप कुमारच्या चाहत्यांना सायराने केले आवाहन

दिलीप कुमार यांची तब्यत दिवसेंदिवस खालावत जात आहे. याची काळजाी सारा बानो यांना वाटत आहे. त्यांनी दिलीप कुमार यांच्या चाहत्यांना आवाहन केले आहे की, त्यांच्या तब्येतीसाठी तुम्ही सर्वजण प्रार्थना करा…

दिलीप कुमार यांच्या दोघा भावांना कोरोनाची लागण झाली होती. एहसान खान आणि असलम खान यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यामुळे दिलीप कुमार यांना क्वारंटाईन करण्यात आलं होत.  असलम खान यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्या दोघांना डॉक्टर नितीन गोखले यांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांची कोरोना चाचणी केली असता, त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्या दोघांना अतिदक्षता कक्षात ठेवण्यात होते. दिलीप कुमार यांचे वय 98 आहे. तर त्यांचे भाऊ एहसान खान यांचे वय 90 असून असलम खान यांचे वय त्यापेक्षा थोडे कमी आहे. त्यांना हृदयविकार आणि रक्तदाबाचाही त्रास होता. त्यावेळी दिलीप कुमार यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले होते. याआधी बॉलिवूडच्या अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबियाला कोरोनाची लागण झाली होती. अमिताभ बच्चन यांच्यासह मुलगा अभिषेक बच्चन, सून ऐश्वर्या बच्चन, नात आराध्या बच्चन या चौघांना कोरोना झाला होता. मात्र आता सर्व बच्चन कुटुंबिय कोरोनामुक्त होऊन घरी परतले होते.

संबंधित बातम्या : 

Durgamati | बिन रांझे की ‘हीर’ हुई मैं…या भूमी पेडणेकरच्या गाण्याने चाहत्यांची मने जिंकली

Anupam Kher | ‘शेतकऱ्यांचे आंदोलन राजकीय हेतूने सुरू असल्याचे वाटते’,अनुपम खेर यांचे धक्कादायक विधान

(Pray for Dilip Kumar’s health, Saira Bano’s appeal to fans)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.