प्रिती झिंटाच्या लहान मुलीसोबत अज्ञात महिलेनं केलेल्या ‘त्या’ कृत्यावर भडकले बॉलिवूड कलाकार

या पोस्टच्या अखेरीस प्रितीने तिची बाजू ठामपणे मांडली. ‘सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे माझी मुलं कोणत्याची पॅकेड डीलचा भाग नाहीत किंवा ते कोणाचा शिकार बनण्यासाठी नाहीत. त्यामुळे कृपया माझ्या मुलांना एकटं सोडा."

प्रिती झिंटाच्या लहान मुलीसोबत अज्ञात महिलेनं केलेल्या 'त्या' कृत्यावर भडकले बॉलिवूड कलाकार
Preity ZintaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 09, 2023 | 11:51 AM

मुंबई : अभिनेत्री प्रिती झिंटाने तिच्या मुलीसोबत घडलेल्या घटनेविषयी तीव्र संताप व्यक्त केला. इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित तिने दोन प्रसंग सांगितले. यातील एका घटनेत अज्ञात महिलेनं प्रितीच्या लहान मुलीचा बळजबरीने किस घेतला होता. प्रितीच्या या पोस्टनंतर आता बॉलिवूड इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींनी तिला पाठिंबा दिला आहे. अभिनेत्री प्रियांका चोप्रा, हृतिक रोशन, अर्जुन रामपाल आणि मलायका अरोरा यांनी प्रितीच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे. ‘माझी मुलं म्हणजे कोणत्याही पॅकेज डीलचा भाग नाहीत’, असं म्हणत प्रितीने पापाराझींनाही फटकारलं. त्याचसोबत तिच्या मुलांच्या जवळ न येण्याचा आणि त्यांना स्पर्श न करण्याचा इशारा तिने दिला.

प्रितीच्या पोस्टवर हृतिक रोशनने लिहिलं, ‘खूप चांगलं केलंस प्रिती.’ तर अभिनेता अर्जुन रामपालने पुन्हा असं काही घडल्यास थेट त्याला कॉल करण्याचा सल्ला दिला. ‘पुढच्या वेळी थेट मला कॉल कर. मी त्यांचा चांगला समाचार घेईन.’ अभिनेत्री मलायका अरोराने लिहिलं, ‘हे स्पष्ट आणि ठामपणे तू बोललीस ते बरं झालं.’

प्रितीने सोशल मीडियावर भलीमोठी पोस्ट लिहित दोन घटनांविषयी सांगितलं. त्याचप्रमाणे प्रितीने त्या व्हिडीओमागील सत्यदेखील सांगितलं, ज्यामध्ये एक दिव्यांग व्यक्ती पैशांसाठी तिच्या कारच्या मागे व्हिलचेअरवर धावताना दिसत आहे. संबंधित घटनेत नेमकं काय घडलं याविषयी तिने सविस्तर पोस्ट लिहिली आहे. यातील एक घटना तिची लहान मुलगी जियाशी संबंधित आहे. जियाला एका अज्ञात महिलेनं बळजबरीने किस केलं होतं.

हे सुद्धा वाचा

‘या आठवड्यात दोन अशा घटना घडल्या, ज्यामुळे मी खूप घाबरले होते. यातील पहिली घटना माझी लहान मुलगी जियाशी संबंधित आहे. एका अनोळखी महिलेनं तिचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला. आम्ही तिला प्रेमाने तसं न करण्यास सांगितलं तेव्हा ती तिथून निघून गेली. पण नंतर अचानक ती समोर आली आणि बळजबरीने तिने माझ्या लहान मुलीला उचलून घेतलं. नंतर ती जियाच्या चेहऱ्यावर किस करून तिथून पळाली. तुझी मुलगी खूप क्युट आहे, असं बोलून तिने तिथून पळ काढला. ती महिला एका पॉश इमारतीत राहते आणि ती त्याच बागेत होती, जिथे माझी मुलं खेळत होती. जर मी सेलिब्रिटी नसते तर मी कदाचित खूप वाईट प्रतिक्रिया दिली असती, परंतु मी शांत राहिले. कारण मला तिथे कोणताच तमाशा करायचा नव्हता’, असं प्रितीने एका घटनेविषयी लिहिलं.

“माझी मुलं कोणत्याही पॅकेज डीलचा भाग नाहीत”

प्रितीने पुढे लिहिलं, ‘मला वाटतं की आता लोकांनी हे समजलं पाहिजे की मी आधी एक माणूस आहे, नंतर एक आई आणि त्यानंतर एक सेलिब्रिटी आहे. मला माझ्या यशाबद्दल सतत माफी मागण्याची आणि त्यामुळे त्रस्त होण्याची काहीच गरज नाही. कारण मी आज जिथे आहे तिथे पोहोचण्यासाठी मी खूप मेहनत केली आहे. मला या देशात जगण्याचा समान अधिकार आहे. त्यामुळे कृपया माझ्याबद्दल कोणतंही मत बनवण्याआधी विचार करा. कृपया प्रत्येक गोष्टीसाठी सेलिब्रिटींना दोष देणं थांबवा. प्रत्येक कथेच्या दोन बाजू असतात.’

“माझ्या मुलांना स्पर्श करू नका किंवा त्यांचे फोटो काढू नका”

या पोस्टच्या अखेरीस प्रितीने तिची बाजू ठामपणे मांडली. ‘सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे माझी मुलं कोणत्याची पॅकेड डीलचा भाग नाहीत किंवा ते कोणाचा शिकार बनण्यासाठी नाहीत. त्यामुळे कृपया माझ्या मुलांना एकटं सोडा आणि त्यांचे फोटो काढण्यासाठी किंवा त्यांना स्पर्श करण्यासाठी येऊ नका. ती लहान मुलं आहेत, सेलिब्रिटी नाहीत. त्यामुळे त्यांना लहान मुलांसारखंच वागवलं पाहिजे. मला आशा आहे की जे फोटोग्राफर आम्हाला फोटो, व्हिडीओ आणि साऊंड बाईट्ससाठी (प्रतिक्रिया) विचारतात, त्यांच्यात इतकी तरी माणुसकी आणि समज असेल की पुन्हा अशा घटनांना शूट करण्याऐवजी ते मदत करायला धावतील.’

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.